CHANDOLI NATIONAL PARK मध्ये झाडांची कत्तल, वृक्ष तोडीचा सूत्रधार कोण ?; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाची शक्यता

शिराळा (shirala) तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान (chandoli national park) वाढत्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नेहमी चर्चेत असतं. अभयारण्यात राजरोसपणे झाडांच्या कत्तली सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

CHANDOLI NATIONAL PARK मध्ये झाडांची कत्तल, वृक्ष तोडीचा सूत्रधार कोण ?; वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाची शक्यता
चांदोली राष्ट्रीय उद्यानImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:42 AM

सांगली – शिराळा (shirala) तालुक्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान (chandoli national park) वाढत्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नेहमी चर्चेत असतं. सध्या अभयारण्यात राजरोसपणे झाडांच्या कत्तली सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आर्थिक लाभापोटी मोठ्या प्रमाणात झाडांची तस्करी सुरु आहे.  तरी सुध्दा वनजीव विभाग दुर्लक्ष करीत आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली (sangli), सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर 314 चौरस किलोमीटर अंतरावर विस्तारीत आहे.  या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी, सरपटणारे जीव, विविध प्रकारची झाडे, झुडपे वनसंपदा असल्यामुळे या अभयारण्याला जागतिक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या परिसराची पाहणी आणि अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक व पर्यटक येत असतात.

chandoli

तोडण्यात आलेल्या झाडावरती खून केलेली दिसत आहे

कोणत्या अधिकाऱ्याच्या मर्जीने हे सुरू आहे ?

चांदोली राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे नेहमी चर्चेत असते. अभयारण्यातील बिबटे, गवे आसपासच्या गावातील पाळीव प्राणी शेती यांचे नुकसान करीत आहेत. सध्या अभयारण्यातच वृक्ष तोड सुरू असल्याचे समोर आले आहे. झाडे चोरट्यांनी पुरावा म्हणून काहीही शिल्लक ठेवलेले दिसत नाही. पाहणी दरम्यान फक्त तोडलेल्या झाडांचे बुंदे दिसून आले आहेत. झाडे तोडण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला झाडावरती खुणा दिसत आहेत. म्हणजेच चोरटे दिवसा खुणा करून रात्रीच्या अंधारात झाडे तोडून नेत असल्याचा संशय आहे. अभयारण्यात वाळक्या पाल्याला व लाकडाला हात लावायची सुध्दा परवानगी नाही. झाडे तोडून नेली कशी जातात ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. हे सगळं घडत असताना कोणत्याही अधिकाऱ्याला याची कल्पना कशी आली, की अधिकाऱ्यांच्या अर्शिवादाने हे सगळं सुरु आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

chandoli

जंगलात अनेक ठिकाणी अशी तोडलेली झाडं दिसत आहेत

नरक्या सदृश वनस्पती वृक्षाची तोड होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा

वृक्ष तोड झाल्याच्या खुणा निर्दशनास येत असल्याने अधिकारी व कर्मचारी एकमेकांवर ढकलत असल्याची माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच राखीव वन क्षेत्रात नरक्या सदृश वनस्पती वृक्षाची तोड होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. नरक्या वनस्पतीला बाजारात मोठी किंमत असल्याने या वृक्ष तोडी मागे मोठे अधिकारी गुंतले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची उच्च स्तरीय चौकशी व्हायला हवी. पर्यटन वाढीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत त्याचाच भाग म्हणून टायगर रिझर्व झोन करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली गतिमान आहेत. चांदोली धरणापासून कित्येक किलोमिटर आत अभयारण्यात मोजक्या व किमंती झाडांवरती कुर्‍हाड चालवली जात आहे. यादरम्यान अनेक चेक पोस्ट, अनेक कर्मचारी, सीसीटीव्ही कॅमेरे यांची पाळत असताना सुध्दा एवढा लवाजमा बाजूस ठेवत चोरटे आत पोचतात कसे ? असा अनेकांना प्रश्न पडलाय.

राज ठाकरेंच्या आदेशानं मनसेचा मेगा प्लान, तिथीप्रमाणं शिवजयंती साजरी करण्यासाठी जंगी तयारी

Russia Ukraine War : रशिया यूक्रेन युद्ध मिटण्याची चिन्ह! पुतिनसोबत चर्चेला तयार, झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य

Asani Cyclone : असानी चक्रीवादळामुळं अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, जोरदार वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर NDRF अलर्ट

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.