मला काय साधू करतो का ? कार्यकर्त्याला राज ठाकरे असे का म्हणाले ?

मला काय साधू बनवतो का अशी राज यांनी केलेली कॉमेंट गंमतीचा भाग असला तरी कार्यकर्त्याची भावना महत्वाची होती.

मला काय साधू करतो का ? कार्यकर्त्याला राज ठाकरे असे का म्हणाले ?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 02, 2022 | 2:33 PM

नाशिक : आपल्या नेत्याला भेटून त्याचा सत्कार करावा, काहीतरी भेट वस्तू देऊन फोटो काढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते. त्यासाठी कार्यकर्ते वाट्टेल ते करायला तयारही होतात. त्यासाठी वेगवेगळी संकल्पना देखील लावतात. त्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सारखा नेता असेल तर मग कार्यकर्त्यांचा उत्साह विचारायलाच नको. नाशिकच्या निफाड (Nashik Niphad) तालुक्यातील चितेगाव येथील कार्यकर्त्याने केलेला सत्कार आणि त्यानंतर राज ठाकरेंची कॉमेंट चर्चेचा विषय ठरत आहे. निफाड तालुक्याचे माजी अध्यक्ष असलेल्या शैलेश शेलार यांनी राज ठाकरे यांच्या खांद्यावर भगवी शॉल टाकत हातात त्रिशूल (Trishul) देत फोटो काढला. त्रिशूल हातात घेतात राज यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आले होते. त्यांनी ते आवारतच मला काय साधू करतो का ? अशी कॉमेंट दिली. राज यांची ही कॉमेंट येताच सर्वानाच हसू आले होते.

मला काय साधू बनवतो का अशी राज यांनी केलेली कॉमेंट गंमतीचा भाग असला तरी कार्यकर्त्याची भावना महत्वाची होती.

शैलेश शेलार यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत हिंदू विरोधी प्रवृतीचा नाश करण्यासाठी राज साहेबांना त्रिशूल भेट दिली असल्याचे म्हंटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे देशविरोधी कार्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी त्रिशूल भेट दिल्याचे शेलार यांनी म्हंटलं आहे.

याशिवाय राज ठाकरे हे आज वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जात असल्याने भेट देण्याची वेळ चांगली होती म्हणूनच त्रिशूल भेट दिली आहे.

शैलेश शेलार हे निफाड तालुक्यातील चितेगाव येथील असून मनसेचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी राज ठाकरेंचा केलेला सत्कार चर्चेचा विषय ठरत आहे.