तुळजाभवानी मंदिरात कोरोना नियमांचं उल्लंघन, व्यापारी, पुजारी, भाविक विनामास्क, सॅनिटायझिंगही नाही!

| Updated on: Feb 23, 2021 | 10:54 AM

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. | Tuljabhavani mata Mandir

तुळजाभवानी मंदिरात कोरोना नियमांचं उल्लंघन, व्यापारी, पुजारी, भाविक विनामास्क, सॅनिटायझिंगही नाही!
तुळजा भवानी माता मंदिरात भाविकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन
Follow us on

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून मुख्यमंत्री यांचा आदेश पायदळी तुडवला जात आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून देखील भक्त नियम पाळताना दिसून येत नाहीत. (Tuljabhavani mata Mandir Devotee do Not Follow Corona Rules And Regulation)

कोरोना संसर्गा अधिक फैलावू नये म्हणून 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील मुलांसह नवजात बालकांना प्रवेश देण्यास मनाई आहे. मात्र असं असलं तरी या सगळ्यांना मंदिरात खुलेआम प्रवेश दिला जात आहे.

जवळपास 50 टक्के भाविक विनामस्क मंदिरात येत असले तरी स्थानिक प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. तसेच मंदिरात सॅनिटायझिंग किंवा इतर उपाययोजना करताना मंदिर प्रशासन दिसत नाहीत. व्यापारी, पुजारी, भाविक विनामास्क फिरत असून त्यांना लॉकडाउन नको आहे मात्र ते नियमही पळत नाहीत.

राज्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्य लक्षणीयरित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहे. अशा परिस्थितीत उस्मानाबाद आणि तुळजापूर प्रशासन कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर कारवाई का करत नाही?, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि त्यांची पत्नी प्रियांका गेल्या 2 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून तुळजापूर तालुक्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पर्याप्त उपाययोजना व नियम मोडणाऱ्यावर कारवाई केली जात नाही.

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 133 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यं 1 लाख 26 हजार 538 नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 17 हजार 165 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं. तर त्यापैकी 16 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. म्हणजेच  95.88 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे. तर या काळात 575 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. म्हणजेच जिल्ह्यात 3.35 टक्के मृत्यू दर राहिला आहे.

शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद

राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळू लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाविकांना आता इथून पुढचे काही दिवस दर्शन घेता येणार नाही.

सद्यस्थितीत राज्यभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसंच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणं शक्य नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

(Tuljabhavani mata Mandir Devotee do Not Follow Corona Rules And Regulation)

हे ही वाचा :

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!