कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!

वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे.

कोरोनाचा कहर, शेगावचं गजानन मंदिर भाविकांसाठी बंद, प्रशासन अलर्ट मोडवर!
शेगावचं गजानन महाराज मंदिर

बुलडाणा :  राज्यभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस कोरोनाचे अधिक संख्येने रुग्ण मिळू लागलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून शेगावचं गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे भाविकांना आता इथून पुढचे काही दिवस दर्शन घेता येणार नाही. (Shegaon Gajanan Maharaj Mandir Closed Over Corona Virus)

कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यांतल्या अनेक मोठ्या शहरांत पाहायला मिळतो आहे तसा तो ग्रामीण भागांत देखील पाहायला मिळतोय. विदर्भात तर कोरोनाने गेल्या 10 दिवसांपासून कहर केला आहे. यवतमाळ, अकोला, नागपूर या भागांत कोरोनाचे अधिक रुग्ण मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण विदर्भ प्रशासन अलर्ट मोडवर गेलं आहे. गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. त्याचमुळे इथून पुढचे काही दिवस गजानन महाराज मंदिर भाविकासांठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पुढील आदेशापर्यंत गजानन महाराज मंदिर बंद

सद्यस्थितीत राज्यभरात कोरोना विषाणूचाा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विभागीय आयुक्त अमरावती तसंच जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या निर्देशानुसार गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणं शक्य नसल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येईल.

पुढील आदेशापर्यंत श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना बंदी करण्यात आलीय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत संस्थानने घेतला निर्णय असल्याचं संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व अटी-नियमांचं पालन संस्थान करत असल्याचंही संस्थान प्रशासनाने सांगितलं आहे.

पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिरंही दोन दिवस बंद

विठ्ठल रुक्मिणीमातेचे मंदिर आज आणि उध्या राहणार बंद आहे. कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर यंदाची माघी यात्रा रदद् केली आहे. उद्या माघी एकादशी असल्याने मंदिर आज आणि उध्या मंदिर राहणार बंद राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी दिली.

मंदिरं उघडल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ, राज्यात पुन्हा ‘देऊळबंद?’

कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील मंदिरे पूर्णपणे बंद होती. जवळपास दहा महिने देऊळ बंद होते. मात्र जसा संसर्गाचा वेग कमी होऊ लागला तेव्हापासून विरोधी पक्षाने आंदोलन करुन सरकारला मंदिरे उघडायला लावली. यासाठी काही सामादित आणि धार्मिक संघटना देखील आग्रही होत्या. मात्र मंदिरे उघडल्यानंतर काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

आता कोरोनाची दुसरी लाट आल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढची परिस्थिती पाहून आठ दिवसांचा अल्टिमेटम जनतेला दिला आहे. तसंच पुन्हा लॉकडाऊन करायचं का? असा सवालही जनतेला विचारला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील देवस्थाने पुन्हा एकदा बंद होतील, अशीही चर्चा आहे. तसा निर्णय शासन येत्या काही दिवसांत घेऊ शकतं.

विदर्भात कोरोनाचा कहर

विदर्भात कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. संसर्गाचा वेग कमी झालाय, अशी चर्चा असतानाच आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असं असलं तरी मृत्यूदरात मात्र घट पाहायला मिळतीये.

विदर्भात गेल्या 20 दिवसांत मृत्यूदरात घट आहे. 1 फेब्रुवारीला 2.54 टक्के असलेला मृत्यूदर आला 2.43 टक्क्यांवर आला आहे. कालच्या 20 फेब्रुवारीपर्यंत विदर्भात 235 कोरोना मृत्यूची नोंद झालेली आहे.

(Shegaon Gajanan Maharaj Mandir Closed Over Corona Virus)

हे ही वाचा :

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा, सामनातून मोदींवर हल्लाबोल

कोरोनाचा धोका वाढल्यामुळे केंद्र सरकार अलर्ट; राज्यांना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI