
तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या चर्चेत आले आहे. सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजापुरात ड्रग्जमुळे दहशत पसरलेली दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 21 आरोपी फरार आहेत तर 14 आरोपी अटक आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणामुळे तुळजापूरमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या दहशतीमुळे तुळजापुरातून शंभर लोक गायब झाल्याची माहिती मिळत आहे. तुळजापूर शहरातील 200 जणांना ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी नोटीसा दिल्यावर हे लोक गायब झाल्याचं बोललं जातं आहे.
तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरण चांगलंच फोफावलं. गेली अडीच वर्षांमध्ये जवळजवळ जवळजवळ दोन अडीच वर्षापासून तुळजापूरमध्ये ड्रेस विक्री आणि सेवन हे सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या ड्रग्स प्रकरणांमध्ये 14 फेब्रुवारीला पोलिसांनी तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रग्जची पहिली कारवाई केली. त्यानंतर एक एकर तुळजापूरमध्ये आत्तापर्यंत 35 आरोपी ड्रग्ज प्रकरणांमध्ये निष्पन्न झाले. या निष्पन्न झालेल्या आरोपींमध्ये राजकीय पक्षाचे सदस्य असल्याने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीसोबतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याबरोबर ही या प्रकरणातील आरोपींचे फोटो वायरल झाले. राजकारण आणि ड्रग्जचा बाजाराने तुळजापुरात अक्षरशः खळबळ उडाली आहे.
एकंदरीतच तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणाची पसरलेली दहशत ही खळबळ उडवून देणारी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातूनच पोलीस कारवाईच्या दहशतीने गायब झालेल्या लोकांबाबत पुजाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. तुळजापुरात ड्रग्ज प्रकरणामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आरोपीसोबत आर्थिक व्यवहार झालेले लोक भीतीमध्ये आहेत. याच भीतीतून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.
तुळजापुरात युवक, उद्योजक यांना पोलिसांच्या नोटीस पाठवल्या जात आहेत. बँक व्यवहार झालेल्या लोकांना नोटीस, कोणत्या न कोणत्या कारणाने बँक व्यवहार झाला, आपलं ही नाव ड्रग्ज प्रकरणात येईल अशी लोकांना भीती आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आरोपींनी आर्थिक व्यवहार ऑनलाईन करताना इतर आरोपींचे नंबर दिले, त्यावर काही लोकांचे व्यवहार झाले, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत आर्थिक व्यवहार झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बँक ट्रांजेक्शनच्या आधारावर पोलीस विभागाकडून नोटीस काढल्या जात आहेत. यावर तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे. तुळजापुरात राहताना कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यवहार झालेला आहे. त्यामध्ये आपलं ही नाव येईल. ही लोकांमध्ये भीती आहे. समाजामध्ये नावाला प्रतिष्ठा आहे, तपासात निर्दोष सुटले तरी नाव बदनाम होईल ही भीती लोकांमध्ये आहे. तुळजापुरातून किती लोक गायब झाले हे सांगता येणार नाही असं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले.
पोलिसांकडून नोटीस दिलेल्या लोकांचा ड्रग्ज प्रकरणात नेमका रोल काय हे निश्चित झालेलं नाही. भीतीपोटी तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती आहे. तुळजापुरातून गायब झालेला लोकांचा ड्रग्स खरेदी विक्रीमध्ये सहभाग होता की ते फक्त आर्थिक व्यवहार झाल्यामुळे गायब आहेत हे पोलीस तपासात समोर येईल
15 फेब्रुवारी 2025 : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले. काही आरोपींना अटक केली.
फेब्रुवारी 2025 अखेर: तपासादरम्यान, ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली. जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले.
मार्च 2025: पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली. ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.