
सोमवारी सकाळी नांदेड ते मेडचल रेल्वे गाडीला आग लागली आहे. शौचालय जवळ असलेल्या कचऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळीच आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग विझवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे. परळीत खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विष घेऊन एकाने आपले जीवन संपवले आहे. देविदास एकनाथराव शिंदे वय 55 वर्ष यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. दहा हजार रुपयांचे पाच लाख रुपये दे नाहीतर शेती नावावर कर असा तगादा खाजगी सावकार करायचा… याच प्रकरणात संभाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोघाजणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोंदियात आज देशी-विदेशी मद्य विक्री बंद राहणार. आदिवासी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले. तर आदिवासी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आले. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन केलं आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज नुकत्याच जाहीर झालेल्या प्रभाग रचना व नगरपालिका तसेच नगरपरिषद आरक्षण सोडतीनंतर बैठकीला विशेष महत्त्व आहे. या सर्व विषयांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांना फोन केला. तसेच या घटनेचा निषेध केला. असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
PM Modi says, “Spoke to Chief Justice of India, Justice BR Gavai Ji. The attack on him earlier today in the Supreme Court premises has angered every Indian. There is no place for such reprehensible acts in our society. It is utterly condemnable. I appreciated the calm displayed… pic.twitter.com/79XjOyx7oh
— ANI (@ANI) October 6, 2025
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर जन सूराज्यचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले, “बिहारमध्ये बदलासाठी आणि आपण येथे ज्या स्वप्नासह आलो आहोत त्याची सुरुवात करण्यासाठी मतदान केले जाईल. पुढील 10 वर्षांत बिहारला देशातील टॉप 10 राज्यांपैकी एक बनवणे. बिहारच्या लोकांनी बदलासाठी आपले मन बनवले आहे. यावेळी, बिहारच्या लोकांनी फक्त योग्य व्यक्तीच जिंकेल याची खात्री करण्याचा संकल्प केला पाहिजे.”
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने मेट्रो जिन्यासाठी लागणारी 133 मीटर जागा 1600 मीटर असल्याचा खोटा दावा केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. ही जागा महापालिकेच्या आराखड्यात सेवा रस्त्यासाठी आरक्षित असून ती पूर्वीच ताब्यात घेतली जाणे अपेक्षित होती. मात्र, मोबदल्याची मागणी करून कंपनीने 23 ते 30 कोटी रुपयांचा भु-संपादन खर्च सरकारवर टाकण्याचा प्रयत्न केला. वाद टाळण्यासाठी जिन्याचे स्थान नाल्यावर हलवले, तरी कंपनीने तिथली जागाही आपली असल्याचे सांगून काम रोखले. हा सगळा प्रकार म्हणजे सरकारी निधीचा गैरवापर आणि जनतेच्या पैशांची लूट असल्याचा काँग्रेसचा गंभीर आरोप आहे
2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर, काँग्रेस खासदार राजीव शुक्ला म्हणाले की, बिहारमध्ये काँग्रेस-राजद सरकार निश्चितच सत्तेत येईल आणि बदल येईल. नितीश कुमार यांचे सरकार जाईल.
आमदार फोडताना जसं पॅकेज दिले जातं तसं शेतकऱ्यांना चांगलं पॅकेज द्या, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच उद्या कॅबिनेट बैठक आहे. तर पंतप्रधान परवा महाराष्ट्रात असणार आहेत. शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावी आणि कर्जमाफी करावी. राज्याने आणि केंद्राने ही मागणी पूर्ण केली पाहिजे, अंसही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून आज समृद्ध उर्दू साहित्य पासून ते उत्कट कवितेपर्यंतचा उर्दू शायरींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम मुंबईतील वरळी डोक या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाला शायर सुरेंद्र शर्मा, शेखर सुमन, जावेद अत्तर, सचिन पिळगावकर, राजेश रेड्डी , अवजत आझमआजमी, अनुप जलोटा, साबरी ब्रॅदर्स, शकील आजमी, कमर सिद्दिकी, झेलम सिंह, शबाब साबरी, शिका अवधेश, प्रिया मलिक, इम्तियाज खलील, अली असगर, रुमी जाफरी, नईम शेख, मशहर अफ्रीदी इत्यादी शायर उपस्थित असणार आहेत.
दिवाळीच्या तोंडावर पथविक्रेत्यांना महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व सुरक्षा रक्षक त्रास देत असल्याने भाजपचे आमदार संजय केनेकर हे हॉकर्सना घेऊन पोलीस आयुक्तालयावर धडकले. विक्रेते हे पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या मांडून बसले होते. आम्ही निवेदन करण्यासाठी नव्हे तर इशारा देण्यासाठी आलोय हिंदू पथविक्रेत्यांवर जर अन्याय झाला तर पुढील काळात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी दिला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ला दुर्दैवी आहे. या घटनेचा निषेध करतो. महाराष्ट्रातील एक नेतृत्व सरन्यायाधीश म्हणून काम करत, यामध्ये असा हल्ला होणे हे निषेधास पात्र आहे. या हल्ल्याची आम्ही निंदा करतो. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही. त्यांच आरक्षण काढून घेतलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. ओबीसी समाजामध्ये गैरसमज पसरवला जातो आहे. ओबीसीवर देखील कुठलाही अन्याय होणार नाही. ही भूमिका मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.
नाशिकमध्ये महाविद्यालयीन तरुणाने instagram वर पोस्ट टाकत जीवन यात्रा संपवली आहे. 17 वर्षीय आयुष चव्हाण याने निरशेतून आणि मानसिक तणावातून आत्महत्या केली आहे. त्याने गंगापूर रोड परिसरात असलेल्या खाजगी महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
मुंबईत दादरच्या इंदू मिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारले जात आहे. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 350 फूट उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’ उभारला जात आहे.या पुतळ्याचा पहिला भाग आज मुंबईत दाखल झाला आहे. हा भाग ६० फुट लांब आहे. ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं आहे. त्यास पाहण्यासाठी मोठ्या संख्येत अनुयायी गर्दी करत आहेत.
बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी हे टप्पे पार पडतील तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला प्रकरणात त्यांचे बंधू डॉ. राजेंद्र गवई यांनी आंबेडकरी जनतेने शांत राहावे असे आवहन केले आहे.
महायुतीमध्ये आम्ही पालिका निवडणूक लढू आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये विराजमान करण्याचा निर्णय मुंबईकरांनी केला आहे असे भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटले आहे.
राज्यात अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत चैन स्नेचरला फिल्मी स्टाईल अटक करण्यात आली आहे. आरोपी सलमानला इराणीला पकडतांना थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या पिसे, पांजरापूर येथील विद्युत केद्रात वीज मीटर्स अद्यावतीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोन्याच्या दरात तब्बल 1 हजार 500 रुपये तर चांदीच्या दरात तब्बल दोन हजारने वाढ झाली आहे. सोन्याचे दर विना जीएसटी 1 लाख 19 हजार 500 रुपयांवर तर चांदीचे दराने विना जीएसटी 1 लाख 51 हजाराचा आकडा गाठला आहे
अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री बल्लाळेश्वर पाली या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राकडे जाणारा मार्ग सध्या पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. वाकण ते पाली या मार्गावर असंख्य खड्ड्यांमुळे भक्तांना अक्षरशः खड्ड्यांतूनच प्रवास करत मंदिर गाठावे लागत आहे.
नागपुरात मंत्री बावनकुळेंची दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट दिली. महसूल मंत्री बावनकुळेंकडून कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. “अनियमीत पद्धतीने रजिस्ट्री होत असल्याच्या, पैसे घेण्याचे प्रकार होत असल्याच्या काही तक्रारी आल्यामुळे मी अचानक दुय्यम निबंधक कार्यालयाला भेट दिली, आणि मला पैसेही आढळून आले” असं मंत्री बावनकुळेंनी सांगितलं आहे. त्यामुळे आता ते काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची दीड तास चौकशी करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. “प्रांजल खेवलकरांनी कधीही अंमली पदार्थाचे सेवन केले नाही” असं रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
येवल्याचा अलिबाबा आणि परळीच्या टोळीला नवी भिडू भेटलाय, वडेट्टीवार , असं वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे. त्यावरून आता छगन भुजबळ यांनी जरांगेच्या शिक्षणावरून टोला लगावला. त्यावर जरांगेंनी पलटवार करत म्हटलं ,” मी आहे अडाणी, आता काय माझी शाळा घेणार का? मुळात यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत” असं जरांगेंनी म्हणत छगन भुजबळांवर टीका केली.
मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. मुंबईचा महापौर मराठी आणि भगव्या रक्ताचाच असेल असंही राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.
भोकरदन शहरात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून मोठ्या संख्येने भोकरदन शहरात शेतकऱ्यांची यात उपस्थिती आहे.
शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासह इतर नेते उपस्थित आहेत.
हिंगोली- मराठवाड्याचा हंबरडा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा 11 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चाच्या अनुषंगाने शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आढावा बैठक पार पडली .
विरार:-विरारच्या अर्नाळ्यात एका कुटुंबावर घरात घुसून अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात घरातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जगन्नाथ गोवारी (वय 76 ), लीला गोवारी (वय 72) आणि नेत्रा गोवारी (वय 52 अशी जखमींची नावे असून त्यांना उपचारासाठी विरारच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चोरीच्या उद्देशाने हा प्राणघातक हल्ला केला असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी वर्तविला आहे. पोलिस याबाबत अधिकृत तपास करीत आहेत.
प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंनाही नोटीस. रोहिणी खडसेंची दीड तास अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी करण्यात आली.
प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस जारी झाली, दीड तासाच्या चौकशीनंतर रोहिणी खडसेंचा जबाब नोंदवण्यात आला.
“माझी भुजबळांसोबत कुठलीही गुप्त बैठक झाली नाही. देव झाल्यासारखं जरागेंना वाटतं. डोक्यात हवा गेलीये. आमच्या समाजावर अन्याय होतोय. आम्ही मराठा समाजाविरोधात नाही”, असं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं.
“तुम्ही गुप्त गेम करता आम्ही पण करणार. येवल्यात मी 2 वेळ आलो असतो ना तर तुझा भुगा झाला असता. प्रचंड जातीवादी आहे तो. नासका आहे, सगळ्यांना त्रास देतो,” अशा शब्दांत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार सिल्लोडमध्ये दाखल झाले आहेत. सरपंच मंगेश साबळे यांच्या उपोषणस्थळी रोहित पवार दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे उपोषणाला बसले आहेत. खासदार निलेश लंके आणि रोहित पवार हे मंगेश साबळे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.
“आम्ही मारामारी केली नाही, दगडफेक केली नाही. ज्या दिवशी करू त्या दिवशी तू सापडणार नाही. आम्ही मान खाली घालून सहन करणार नाही. आम्ही संयमाने आहोत. संयम सोडला तर तुम्हाला धरतीवर जागा मिळणार नाही,” असा इशारा मनोज जरांगेंनी छगन भुजबळांना दिला आहे.
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरचा फॉरेन्सिक रिपोर्ट TV9 च्या हाती लागला आहे. खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलरला 27 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर खेवलकरचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिकला पाठवण्यात आले होते. या तपासणीचे रिपोर्ट TV9 मराठीच्या हाती लागले आहेत.
प्रांजल खेवलकरने कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थाचे सेवन केले नसल्याचे या रिपोर्टमधून स्पष्ट केले आहे. याचसोबत गुन्ह्यातील अन्य चार पुरुष आणि दोन महिलांनीही ड्रग्सचे सेवन केले नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट केले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा आणि कोरची या दोन तालुक्यात जोरदार पावसाला सुरुवात. पावसाळ्याच्या शेवटच्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री व आज सकाळी अकरा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. कोरची तालुक्यातील काही भागात व सिरोंचा तालुक्यातील जवळपास सात गावांमध्ये पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात आणि कापसाच्या पिकाला याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.
कोर्टात झालेला संपूर्ण प्रकार मांडताना माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं की, त्यांना “जंगली रमी” खेळता येत नाही. मोबाईलवर “जंगली रमी” ची जाहिरात आली होती. ती जाहिरात बंद करण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागली. त्या दरम्यानचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी काढून ट्विटरवर शेअर केला. या संदर्भात मी माध्यमांसमोर जाऊन संपूर्ण स्पष्टीकरण दिले, तरीही रोहित पवार यांनी ट्विट करणे थांबवले नाही. संबंधित व्हिडिओ विधान परिषदेमधील आहे; विधान परिषदेचे सदस्य नसताना आमदार रोहित पवार यांच्याकडे तो व्हिडिओ कसा पोहोचला याची चौकशी व्हावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.
“मराठ्यांसाठी हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढला. पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा सातारा, औध संस्थानच्या आधारे गॅझेट निघतोय. कारण आमची प्रत्येक गोष्ट आधार घेऊन केलेली आहे, कितीही बोलू दे जीआरला, आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाही. मराठ्यांना काय द्यायचं म्हटलं की नियम लागतात. पण त्यांना द्यायचं म्हटलं की, नियम लागत नाही“ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार आहे, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “काढू दे ना मोर्चे. दमले पाहिजे ते पण, आयत खायला मिळालय. 16 टक्के मराठ्यांच आरक्षण खाल्लं. सरकार पण त्यांची मजा बघतय. त्यांच्या म्हणण्यानुसार, कायदा चालत नसतो. ते म्हणतील तसं होणार नाही. ते म्हणजे कायदा नाही”
ठाणे आणि नवी मुंबई मध्ये युतीमधील नेते एकमेकांवर वार-प्रतिवार करत असताना, वनमंत्री गणेश नाईक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, गडकरी रंगायतन येथे आपला चौथा जनता दरबार पार पडत आहे. युतीमध्ये असूनही गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांची भूमिका दिसून येत आहे. नाईक यांनी अनेकदा नाव न घेता ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर टीका केली आहे. विशेषतः रावण दहना वरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या जनता दरबारात नाईक नेमकं कोणावर टीका करतात आणि भविष्यात कोणाचे ‘रावण दहन’ करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
बंजारा समाजाला त्वरित अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज अहिल्यानगर येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात नगरमधील क्लेरा ब्रूस मैदानातून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार असून, तो थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. बंजारा समाजाच्या वतीने आरक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन मोर्चा काढण्यात येत आहे. आंदोलकांनी इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर हा लढा आणखी तीव्र करत पुढील मोर्चा मुंबईत काढला जाईल.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घायवळ यांच्या घराची झडती घेत असताना पोलिसांना जिवंत काडतुसे आढळली आहेत, ज्यामुळे त्यांच्यावरील आरोप अधिक गंभीर झाले आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला बळ मिळालं आहे.
मविआ आहेच. ते कुठेही सोडून गेलेले नाहीत. महाविकासआघाडीचे अस्तित्व कायम आहे. तिची भूमिका, काम आणि महत्त्वं कायम आहे. महापालिका निवडणुकीत कुठे आपण कोणाकोणला सामावून घेऊ शकतो. त्यानुसार फॉर्म्युला ठरेल : संजय राऊत
प्रत्येक महापालिकेची स्थिती ही वेगळी आहे. प्रत्येक महापालिका हद्दीत राजकीय इतर परिस्थिती वेगळी आहे. कुठे आरक्षण आहे, कुठे पॅनल सिस्टिम आहे, या सर्व गोष्टींवर आमची चर्चा होत आहे – संजय राऊत
भोकरदन शहरात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निघणार भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)भोकरदन जाफराबाद तालुक्याच्या वतीने मोर्चाचा करण्यात आले आयोजन.सकाळी 11 वाजता होणार आक्रोश मोर्चाला सुरुवात. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके यांच्यासह इतर नेतेही राहणार शेतकरी आक्रोश मोर्चाला उपस्थित
काढण्याच्या वेळेला सोयाबीनला शेंगाच भरल्या नसल्यानं शेतकऱ्यान सोयाबीन जाळल. आठ एकरातील सोयाबीन कापणी करून जाळल. उत्पादन होणार नसल्याचं लक्षात आल्यानं शेतकऱ्याचा निर्णय. उमरी येथील रुमदेव ठेंगणे यांच्या आठ एकरातील सोयाबीनचे अतिवृष्टी, सततच्या पावसाने मोठे नुकसान
रिल्स व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. गुन्हेगारीचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा अश्या कंटेंट च्या रिल्स व्हायरल. टोळक्यांकडून गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील्स तयार करून पोलिसांनाच दिले जात आहे आव्हान
पोलिसांनी सायबर पेट्रोलिंग वाढवावी नागरिकांची मागणी
इतर वेळेस 80 रुपये लिटर असणारे दूध आज शंभर रुपयांना. दुधासाठी पहाटेपासूनच गर्दी. आज चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून दूध ग्रहण करण्याची प्रथा. नाशिक मध्ये आज दुधाला प्रचंड मागणी
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील पुराडा येथील घटना.. मृतकामध्ये अभिषेक आचले वय 20 वर्ष ,आदित्य बैस वय 16 वर्ष, सारा राऊत वय 18 वर्ष अशी तीनही मृतकांची नावे
शहरातील अनेक सखल भागातील रस्त्यावर साचले पाणी… पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने झोडपले… आज नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट
जामिनावर सुटून आल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी सराईत गुंड दिनेश लंकेने हॉटेल चालकाला मारहाण केली. प्रतिउत्तर दिल्यावर चक्क हत्यार दाखवत दुकानदाराला हात जोडत पाया पडायला लावलं —संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण असून व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे ..
अंतिम प्रभाग रचनेनंतर महापौर सोडत व प्रभाग आरक्षण… प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यावर ९१ हरकती करण्यात आल्या होत्या दाखल… त्यांची सुनावणी होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर… अंतिम रचना जाहीर झाल्यावर महापालिका प्रशासनाकडून त्वरित महिला ओबीसींसह इतर आरक्षणांची काढली जाणार सोडत
छत्रपती संभाजीनगर शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील दोन जणांना क्रांती चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केले आहे. गांजाची डील होण्यापूर्वीच पोलिसांनी हा डाव उधळला. बाबा पेट्रोल पंप परिसरात ही कारवाई करण्यात आली असून अनिल अरिओ आणि रोहिदास ठाकूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.