
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा आणि मराठी नव वर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा… या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने मुंबईतील गिरगाव, डोंबिवली, ठाणे या परिसरातील शोभायात्रांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतंच नागपुरात दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
धनकवडी परिसरातील के के मार्केट येथे हॉटेलमध्ये सिलिंडरमुळे आगीची घटना
हॉटेलमधील साहित्य जळाले, दोन कापड दुकानांचं देखील नुकसान
आगीत हॉटेलमधील एका कामगाराचा दुर्देवी मृत्यू
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
मालेगावात २००८ मध्ये बॉम्ब स्फोट झाला होता. या बॉम्ब स्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह मालेगावात येणार होत्या. आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. साध्वी प्रज्ञासिंह यांची प्रकृती ठीक नसल्याने साध्वी यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. सविस्तर वाचा
रमजान महिन्यानिमित्त पुण्यातील कौसर बागेतील स्पेशल डिश करण्यात आली. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरचा मालपुवा पुण्यातील कोंढव्यात मिळत आहे. रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम आणि हिंदू बांधवांसाठी स्पेशल मालपुवा बनवला आहे. मुस्लिमांसाठी नॉनव्हेज तर हिंदूंसाठी व्हेज मालपुवा आहे.
कल्याण रेल्वे स्टेशनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन महापालिकेने बंद केली आहे. चार कोटी ४१ लाख पाणी पट्टी थकविल्याने महापालिकेने ही कारवाई केली.
डोंबिवलीत आज भव्य शोभायात्रेची उत्साहात सांगता झाली. हजारो डोंबिवलीकरांसह राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी या यात्रेत सहभाग घेतला. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सोहळ्यात ‘आता थांबायचं नाही’ या चित्रपटाची टीम, अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि सुरज चव्हाण यांनी विशेष सहभाग घेतला.
पुणे- 27 हजार उमेदवारांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची भरती प्रक्रिया रखडली आहे. महापालिकेकडून मागील वर्षी कनिष्ठ अभियंत्यांची रिक्त पदं भरण्यासाठी सरळसेवेने भरती प्रक्रिया राबवली होती. त्यासाठी तब्बल 27 हजार 789 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र मागील सव्वा वर्षापासून ही भरती रखडलेली आहे. आता अर्ज करणाऱ्या अनेक उमेदवारांच्या वयाची मर्यादा उलटून गेली असून या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची संधी देण्याची मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे.
पुणे विद्यापीठातर्फे विशेष सुरक्षा हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या गैरप्रकाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक विशेष सुरक्षा हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 तास सुरू राहणाऱ्या हेल्पलाइनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षा संबंधित तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तात्काळ उपायोजना विद्यापीठाकडून केली जाणार आहे.
राजधानी दिल्लीतही गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळतोय. महाराष्ट्र सदनात गुढी उभारण्यात आली आहे. निवासी आयुक्त आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुढीपाडवा साजरा करण्यात आला. पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्र सदनात गुढीचं पूजन झालं. यावेळी शासकीय अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि कर्मचारीही उपस्थित होते.
बीडच्या अर्धमसला गावातील एका मशिदीत स्फोट झाला आहे. दोन तरुणांकडून जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला भेगा पडल्या असून फरशीही फुटली आहे. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परिसरात शांतता राखण्याचं आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
साईभक्तांना आता पाच लाखापर्यंतचं विमा संरक्षण मिळणार आहे. शिर्डी साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणं बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचं विमा कवच संबंधितांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना मिळणार आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माहिती दिली.
नवीन मराठी वर्ष सुख समृद्धीच जावो हे भाविकांकडून अंबा मातेला साकडे… गुढीपाडव्याच्या निमित्ताने अंबामातेच्या मंदिरात उभारली गुढी… गुढीपाडव्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं अंबादेवी मंदिरात आयोजन..
पथसंचालनामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांच्या नातवाने ही सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळालं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात मंत्री गिरीश महाजन व त्यांचा नातू या पथक संचलनात सहभागी झाला… मंत्री गिरीश महाजन हे दरवर्षीच पथक संचलनात सहभागी होत असतात, यावर्षी त्यांचा नातू देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशात पथक संचालनात सहभागी झाला… जामनेर शहरातून पथसंचलन पार पडले ठिकठिकाणी पथसंचलनावर पुष्परुष्टी करण्यात येऊन स्वागत करण्यात आले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळ्वलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले. मोदींच्या भेटीवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीदरम्यान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात काही काळ चर्चा झाली.
कल्याण सांस्कृतिक मंच आणि इनरवर च्या पुढाकाराने यंदा कल्याण मध्ये 26 व्या वर्षी हिंदू नववर्षाचे स्वागत यात्रेला सुरुवात झालेली आहे. या संवाद यात्रेमध्ये ढोल पथक पाहायला मिळत आहे. तसेच लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज राणी लक्ष्मीबाई वेशभूषा करत सहभागी झालेले आहेत. तर रस्त्यावर रांगोळ्या देखील काढण्यात आलेले आहेत. या शोभायात्रेमध्ये डोक्यावर फेटे घातले आहेत. लेझीम पथक देखील, मराठमोळ्या पोशाखात , डोक्यावर पगडी घालून बाईक रॅली ,यात सहभागी झालेले आहेत श्रीराम लक्ष्मण माता सीता देवी श्री हनुमान यांच्यामध्ये लहान लहान मुलं देखील सहभागी झाले आहेत.
नागपूर – आज 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर असणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसपीजीचा ताफा शहरात दाखल झाला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नागपूरात चार हजार पेक्षा जास्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळावर येतील. 9 वाजता हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आगमन झाले.
यानंतर सकाळी 9.30 पंतप्रधान मोदी यांचं दीक्षाभूमी येथे आगमन झाले. 10 वाजता माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यानंतर सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला भेट दिली, दुपारी 1.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडसाठी रवाना होणार आहेत.