Maharashtra Breaking News LIVE : उमरग्यात शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्याने पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : उमरग्यात शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्याने पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 20, 2025 | 9:14 AM

15 तारखेपासून सुरू झालेले ओला-उबर चालकांचे सलग 5 व्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) अनेक भागांतून चालक सहभागी झाले असून आज पासून संपूर्ण MMR मध्ये सर्व अ‍ॅप आधारित कॅब बंद पाडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. सध्या मिळणारे 8-10 रुपये प्रति किमी कमी असल्याने किमान 32 रुपये प्रति किमी भाड्याची मागणी साठी हे आंदोलन सुरू आहे. तर ‘स्वच्छ सर्वेक्षणात’ नाशिकचा देवळाली कॅन्टोन्मेंट देशात द्वितीय असून देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाला 12 हजार 550 पैकी 10 हजार 255 गुण मिळाल्यामुळे देशात दुसरा आहे. वृक्षांची छाटणी करताना ठाण्यामध्ये 40 हून अधिक पक्षांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ठेकेदाराच्या मनमानीच्या कारभारामुळे निसर्गाची हानि झाली. वृक्ष छाटणी करून पक्षी मारल्याने ठेकेदारासह सोसायटी कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह देश-विदेश, राज्य, क्रीड, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांतील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Jul 2025 08:53 PM (IST)

    इराणमध्ये बस अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू

    दक्षिण इराणमध्ये बस उलटून झालेल्या अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त शनिवारी राज्य माध्यमांनी दिले. प्रांतीय राजधानी शिराझच्या दक्षिणेस झालेल्या या अपघातात 34 जण जखमी झाल्याचे फार्स प्रांताच्या आपत्कालीन संघटनेचे प्रमुख मसूद आबेद यांनी सांगितले.

  • 19 Jul 2025 08:53 PM (IST)

    बिहारमध्ये मला भीती नाही, तरुण आमच्यासोबत आहेत: प्रशांत किशोर

    बिहारमध्ये प्रचार करणारे जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणाले की, आम्हाला कोणतीही भीती नाही. मी गेल्या 3 वर्षांपासून सुरक्षेशिवाय चालत आहे. बिहारचे तरुणही सुरक्षेशिवाय चालतात, बिहारचे तरुण आमच्यासोबत आहेत.

  • 19 Jul 2025 08:52 PM (IST)

    मोदींनी ॲापरेशन सिंदूरबाबत सभागृहाला माहिती द्यावी यावर विरोधक ठाम

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ॲापरेशन सिंदूर दरम्यान सभागृहात उपस्थित रहावं यावर विरोधक आग्रही आहेत. मोदींनी ॲापरेशन सिंदूर बाबत सभागृहाला माहिती द्यावी यावर विरोधक ठाम आहेत. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षांनी असा सूर लावला.  मोदींनी सभागृहात माहिती द्यावी यावर आज चर्चा झाली.  विरोधक सभागृहात करणार चर्चेची मागणी करणार आहेत.  इंडिया आघाडी पहेलगामचे दहशतवादी अजून का पकडले नाहीत यावर मोदी सरकारला घेरणार आहेत.

  • 19 Jul 2025 08:18 PM (IST)

    वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीत मंत्री गिरीश महाजन सपत्नीक झाले सहभागी

    जळगावच्या जामनेर मध्ये काढण्यात येथे वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीत मंत्री गिरीश महाजन सपत्नीक  सहभागी झाले. डोक्यावर टोपी, हातात टाळ घेत वारकऱ्याच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले. मंत्री गिरीश महाजन यांनी केला विठ्ठलाचा गजर केला.  या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पालखी खांद्यावर घेतली, तर साधना महाजन यांनी हातात भगवा झेंडा धरला होता.

  • 19 Jul 2025 08:08 PM (IST)

    रायगडमध्ये गॅस पाइपलाइनचे नुकसान, आग लागली

    महाराष्ट्रातील रायगडमधील पेण शहरातील महानगर गॅस कंपनीच्या गॅस पाइपलाइनला आग लागली आहे. नवीन पाइपलाइनसाठी खोदकाम सुरू असताना अचानक पाइपलाइन फुटली आणि आग लागली. यामुळे पेण शहरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 19 Jul 2025 08:06 PM (IST)

    उमरग्यात शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्याने पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले

    परभणीतील उमरग्यातून मोठी बातमी समोर आली आहे. फोटो न छापल्याने पालकमंत्र्याच्या स्वागतासाठी लावलेले बॅनर शिवसैनिकांनीच फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरग्यात पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते. मात्र शिवसैनिकांनीच हे बॅनर फाडलेत. शहरात विविध ठिकाणी लावलेले 8 ते 10 बॅनर फाडल्याचे समोर आलं आहे.

    शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड यांचे बॅनरवर फोटो नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती आहे.

    शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भगवान देवकाते यांनी हे बॅनर लावले होते. दरम्यान बॅनर कुणी फाडले याचा उमरगा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

  • 19 Jul 2025 07:58 PM (IST)

    इंडिया आघाडीच्या ऑनलाइन बैठकीला महाराष्ट्रातील 2 प्रमुख नेते उपस्थितीत

    इंडिया आघाडीच्या ऑनलाइन बैठकीला महाराष्ट्रातील 2 प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ऑनलाइन बैठकीला उपस्थित आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित असल्याने आजच्या बैठकीत मोठी चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळातं लक्ष लागून आहे.

  • 19 Jul 2025 07:45 PM (IST)

    ओला उबेर आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

    मोठी बातमी समोर आली आहे. ओला उबेर आंदोलनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ओला उबेर ॲपवर बुकिंग केले तरी मीटर भावाने पैसे घेणार असल्याचा संघटनेचा निर्णय झाला आहे. आझाद मैदानावर आमरण उपोषण तसेच सुरू राहणार आहे. मात्र बंद असलेल्या ओला उबेरच्या गाड्या रस्त्यावरती धावणार आहेत. संघटनेने मंगळवार पर्यंत सरकार ला वेळ दिला आहे. त्यानंतर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवार पासून पुन्हा बंद करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी ओला उबेर गाड्यांमध्ये संघटने कडून मीटरचे स्टिकर लावले जाणार आहेत. तसेच www.onlymeter.in या वेबसाइटवर प्रवासी व चालक आपले भाडे सरकारी मीटर दराने ठरवू शकतात.

  • 19 Jul 2025 07:03 PM (IST)

    इंडिया आघाडीची ७ वाजता ऑनलाइन बैठक

    राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीला संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. ही बैठक ऑनलाइन होणार आहे. बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी असणार उपस्थित असणार आहेत. या बैठकीला राहुल गांधी हे देखील उपस्थित असणार आहेत. संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अजेंडा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • 19 Jul 2025 06:55 PM (IST)

    विधानभवनात झालेली घटना दुर्दैवी – सुप्रिया सुळे

     

    विधानभवन परिसरात झालेल्या राड्यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘विधानभवन परिसरात झालेली घटना ही दुर्दैवी आहे. याची चर्चा संपूर्ण भारतात झाली. सत्ताधारी लोकांनी यासंदर्भात तारतम्य बाळगलं पाहिजे.’

     

  • 19 Jul 2025 06:40 PM (IST)

    कल्याणमध्ये बिबट्याचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    कल्याणमध्ये बिबट्याचं दर्शन झालं आहे. आंबिवलीच्या एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास फिरत होता. एका नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे. एनआरसी स्कूल परिसरात हा बिबट्या आढळल्याने विद्यार्थ्यां, पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

     

  • 19 Jul 2025 06:25 PM (IST)

    बुलढाणा: गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून गुरांची खरेदी विक्री बंद

    बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा गुरांचा बाजार हा देऊळगाव राजा येथे भरतो. मात्र आज जमीयत उल कुरेशी कमिटीने अचानक गुरांची खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी ही संकटात सापडले आहे. राज्य सरकारने गोवंश बंदी कायदा रद्द करावा, गोरक्षकापासून होणारा त्रास तसेच गोरक्षकांना आळा बसावा अशी मागणी करत आज गुरांच्या आठवडी बाजारात गुरांची खरेदी विक्री बंद ठेवण्यात आली होती.

  • 19 Jul 2025 06:09 PM (IST)

    डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल – शिवेंद्रराजे भोसले

    सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, ‘लवकरच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली जाणार आहे, डिसेंबर पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल. इंदापूर माणगाव संगमनेर या भागातील काही काम अपूर्ण आहे ते लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल.

  • 19 Jul 2025 05:55 PM (IST)

    नागपूर शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

    – नागपूर शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पोलिसांनी केली अटक

    – या सराईत चोरट्यांकडून तब्बल २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत

    – नागपूर पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने केली कारवाई..

    – करण जाधव आणि आकाश ऊर्फ गोगा वर्मा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे…

    – दोन्ही आरोपींवर नागपूरात २९ गुन्हे केल्याची नोंद आहे. चोरट्यांकडून १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय

    – राजेश सुतार यांची दुचाकी लकडगंज परिसरातून चोरट्यांनी चोरी गेली होती. लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल करत केल्यावर ही टोळी अटकेत

  • 19 Jul 2025 05:33 PM (IST)

    क्लासवन ऑफिसर असल्याचे सांगून अनेक तरुणींची फसवणूक

    जळगावच्या धरणगाव येथील तरुणाने नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर अल्याचे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलं आहे.

    धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे असे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे,
    मॅट्रिमोनियल साइटवरून तरुणींचे संपर्क क्रमांक मिळवून त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे
  • 19 Jul 2025 05:31 PM (IST)

    अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तत्काळ दखल; पंकजा मुंडेंकडून पाहणी

    अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तत्काळ दखल; पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला

    अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश

  • 19 Jul 2025 03:57 PM (IST)

    सोन्याने पुन्हा एक लाखाचा टप्पा ओलांडला

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या दराने पुन्हा एक लाखांचा टप्पा पार केला आहे. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 1 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

  • 19 Jul 2025 03:40 PM (IST)

    अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट केल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी सकल धनगर समाजाने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

  • 19 Jul 2025 03:30 PM (IST)

    धाराशिवमध्ये मराठा बांधवांनी पालकमंत्र्यांना अडवले

    जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी उशीर होत असल्यामुळे मराठा बांधवांनी धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांना अडवले आहे.

  • 19 Jul 2025 02:55 PM (IST)

    बदलापुरमध्ये चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानावर टाकला दरोडा

    बदलापुरमधील दत्तवाडी परिसरातील मराठा ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. बदलापूर पूर्व पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • 19 Jul 2025 02:45 PM (IST)

    शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आलं; वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

    एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी केला आहे. हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत फेटाळले होते. पण सरकार व विरोधकांकडे याबाबत मोठी माहिती आहे. त्याचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट आम्हाला तिकीट लावावे लागेल. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे सरकाही नाशिकच्या सीडीमुळेच आले होते असे वडेट्टीवार म्हणाले.

  • 19 Jul 2025 02:28 PM (IST)

    शुटिंगदरम्यान मोठा अपघात, शाहरुख खान गंभीर जखमी

    बॉलिवूड अभिनेता किंग या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. दरम्यान, त्याचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये शाहरुख खान गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी तो अमेरिकेला गेला आहे.

  • 19 Jul 2025 02:18 PM (IST)

    फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक

    विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला पोलिसांच्या गाडीची धडक बसली. या धकडेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या हिरडामालीजवळ हा अपघात झाला आहे. रवी चव्हाण असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • 19 Jul 2025 01:59 PM (IST)

    बीडमध्ये एका मोठ्या गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई

    बीड पोलीस अधीक्षकांनी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस स्टेशन हद्दीत हत्येचा प्रयत्न, दरोडा, जाळपोळ, अवैध उत्खनन, अवैध शस्त्र बाळगणे, वाळू चोरी आणि वाहतूक अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या सुरज विठ्ठल ढाकणे या गुंडावर MPDA अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला होता. त्यावर आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपीची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

  • 19 Jul 2025 01:53 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची घोषणा

    “महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले होते, म्हणून आम्ही त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल. जर एकनाथ शिंदेंसारखं काही दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी केलं, तर आम्ही त्यांचाही विचार करू. जे विरोध करतात ते विरोध करतात, पण काम करणाऱ्याचेच नाव लिहिले जाते.” असं अविमुक्तेश्वरानंद महाराज म्हणाले.

  • 19 Jul 2025 01:31 PM (IST)

    प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे तानाजी सावंत यांची पाठ

    मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्याकडे पुन्हा आमदार तानाजी सावंत यांची पाठ तर पालकमंत्री प्रताप सरनाईकांनीही सावंतांच्या मतदार संघात जाणं टाळलं. नाराज सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांसह समर्थकही पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. हरित धाराशिव मोहिमेला विशेष निमंत्रित असतानाही तानाजी सावंतांची दांडी.

     

  • 19 Jul 2025 01:16 PM (IST)

    दुबे यांनी आम्हाला शिकवू नये – मनसे

    “राज ठाकरे यांनी मीरा रोडच्या सभेमध्ये सांगितलं होतं की निशिकांत दुबे यांना डुबो डुबो के मारेंगे. असं वक्तव्य राज साहेबांनी केलं होतं. आम्ही नक्की तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे त्यांना कळत नाही. आमचा हिंदीला विरोध नाही. आमचा हिंदी सक्तीला विरोध आहे. राज ठाकरे उत्तम प्रकारे हिंदी बोलतात. त्यामुळे दुबे यांनी आम्हाला शिकवू नये” असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

  • 19 Jul 2025 12:45 PM (IST)

    शाळेचे भिंत कोसळून चार विद्यार्थी जखमी

    नांदेड याठिकाणी  शाळेचे भिंत कोसळून चार विद्यार्थी जखमी… नांदेडच्या देगलूर तालुक्यातील भायेगाव येथील प्रकार… छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयांची भींत कोसळी… दहावी शिक्षण घेणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी… खेळाचा तास असल्याने विद्यार्थी होते वर्गाबाहेर, सुदैवाने मोठी हानी टळली.

  • 19 Jul 2025 12:35 PM (IST)

    सलग पाचव्या दिवशी ओला-उबर चालकांचा आझाद मैदानात आंदोलन सुरू

    पंधरा तारखेपासून ओला-उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू; असलेले आंदोलनात मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) अनेक भागांतून चालक सहभागी…  आज पासून संपूर्ण MMR मध्ये सर्व अ‍ॅप आधारित कॅब बंद पाडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला आहे… विमानतळ, रेल्वे स्थानक व कार्यालयीन प्रवाशांना कॅब न मिळण्याची शक्यता… जे चालक सेवा देत राहतील त्यांना चार जणांच्या गटाने जाऊन थांबवण्याचा इशारा; देखील आंदोलन करताना देण्यात आले आहे… नालासोपाऱ्यात एका चालकाने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केल्यानंतर आंदोलनाला वेग…

  • 19 Jul 2025 12:14 PM (IST)

    शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करणे हा मूर्खपणा आहे – विनायक राऊत

    शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करणे हा मूर्खपणा आहे. हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोटतिडकीने आवाज पाठवत आहेत. देशात कुठेही हिंदी सक्ती नाही, मात्र महाराष्ट्रात हा घोळ घालत आहेत. केवळ मतांवर डोळा ठेवून करत होते… असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलं आहे.

  • 19 Jul 2025 11:58 AM (IST)

    बीडच्या नेकनूर येथील शेतकऱ्याने मेथी रस्त्यावर फेकली

    बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. यानंतर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवला मात्र बाजारपेठेत आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भाजीपाला व्यापाऱ्यांकडून घेतला जात नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत दिलेला भाजीपाला परत आणावा लागतोय. तर अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
    बीडच्या नेकनूर येथील जितेंद्र शिंदे या शेतकऱ्याने 70 हजार रुपये खर्च करून मेथी पिकवली होती. मेथी केजच्या बाजारपेठेपर्यंत घेऊन गेले मात्र व्यापाऱ्याने ती खरेदी न केल्याने परत आणली. अनेक लोकांना वाटप केल्यानंतर उर्वरित मेथी अक्षरशः रस्त्याच्या कडेला फेकून द्यावी लागली. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

  • 19 Jul 2025 11:50 AM (IST)

    बीडमध्ये विद्यार्थ्यांचा शाळेसाठी धोकादायक प्रवास

    बीडच्या धारूर तालुक्यातील धुनकवाड येथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करत जावे लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. धुनकवाड येथील भंडारे वस्तीवर राहत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दीड किलोमीटरचे अंतर डोंगराळ भागातून मार्ग काढत पार करावे लागत आहे. पाऊस झाल्यावर या मार्गावर ओढा असल्याने ओढ्याला पाणी आल्यास या विद्यार्थ्यांना शाळेत देखील जाता येत नाही. कुठलीही दुर्घटना होण्याआधी या याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी धनुकवाड येथील नागरिकांकडून केली जात आहे.

  • 19 Jul 2025 11:40 AM (IST)

    केशव उपाध्यय यांची ठाकरेंवर टीका

    नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत बघा. त्यांना काय म्हणायचंय हेच कळलं नाही. गोंधळलेल्या स्थितीत ती मुलाखत आहे, असा टोला भाजपचे केशव उपाध्यय यांनी लगावला. लोकसभा निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगावर शंका घेत नाहीत. मात्र विधानसभेला अपयश आलं की सर्व गोष्टीची मागणी करतात. अशा प्रकारे विरोधाभास असणारे वाक्य ठिकठिकाणी पाहायला मिळाले, असे उपाध्याय म्हणाले.

  • 19 Jul 2025 11:30 AM (IST)

    गोशाळेतील धक्कादायक प्रकार, वासराचा मृत्यू

    पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कडून गोवंशाचे जतन संवर्धन करण्यासाठी चालवण्यात येणाऱ्या गोशाळेतील एक धक्कादायक सीसी टीव्ही व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या गोशाळेतील मंदिर समितीच्या कर्मचार्यांनी गाईच्या वासराचे एका भांड्यात तोंड घातल्याचे दिसत असून वासरू दूध पित नाही म्हणून त्याला आपल्या मांडीत दाबून अन् मान धरून भांड्यात तोंड घातले आहे. यानंतर काही वेळेत आई समोरच त्या वासराने प्राण सोडल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे.

  • 19 Jul 2025 11:09 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या सभेची बातमी आहे का?

    राज ठाकरे यांच्या मीरा-भाईंदर येथील सभेची बातमी सामनामध्ये आहे का, असा सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारला. खरा शकुनीमामा मातोश्रीवर बसला आहे, असा खोचक टोला ही त्यांनी लगावला.

  • 19 Jul 2025 11:00 AM (IST)

    आमदार देवेंद्र कोठे यांचा स्तूत्य उपक्रम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून वैद्यकीय कक्षाला देणगी देण्यात आली. आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून सीएम रिलीफ फंडाला 5 लाख 55 हजार, 555 रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्त केले.

  • 19 Jul 2025 10:57 AM (IST)

    अजित पवार यांचा जनता दरबार

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळपासूनच विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग या ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. जनता दरबारासाठी बारामती तालुक्यातील नागरिकांनी गर्दी झाली आहे.

  • 19 Jul 2025 10:42 AM (IST)

    गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष आज ठरणार

    गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. अध्यक्षपदी सहकार पॅनलच्या संचालकाची वर्णी लागणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नावांवर शिक्कामोर्तब झाले असले तरी त्याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.

  • 19 Jul 2025 10:26 AM (IST)

    सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांचे उपोषण

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. लॉच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीदेखील कॅरी ऑन पद्धत लागू करून विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा, या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे.

  • 19 Jul 2025 10:10 AM (IST)

    पीएमपीच्या बससेवेला प्रतिसाद

    पीएमपीकडून सुरू केलेल्या लोणावळा, एकवीरा देवी पर्यटन बस सेवेच्या पहिल्याच दिवशी तीन बस मार्गस्थ झाल्या. पीएमपीच्या पर्यटन बससेवेला पहिल्या तीन बसमधून ९९ पर्यटकांनी बुकिंग केले होते.

  • 19 Jul 2025 09:58 AM (IST)

    गुंडांना पक्षात घेणार नाही , फडणवीसांनी जीआर काढावा – संजय राऊत

    गुंडांना पक्षात घेणार नाही , फडणवीसांनी जीआर काढावा – संजय राऊत

  • 19 Jul 2025 09:52 AM (IST)

    अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपचा महत्वाचा निर्णय

    अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी 500 कोटींच्या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून त्यामाध्यमातून नातेवाईकांना तत्काळ मदत पुरवली जाणार आहे.

  • 19 Jul 2025 09:48 AM (IST)

    बीड – तलवारीने केक कापणाऱ्या चौघांवर कारवाई

    बीड –  वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. वाढदिवस एकाचा पण तलवार तिघांच्या हातात, तलवारीने केक कापतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल चौघांवर कारवाई करण्यात आली.

  • 19 Jul 2025 09:25 AM (IST)

    धाराशिव – जीवे मारण्याची धमकी दिल्याचा स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी 10 दिवसांपासून बेपत्ता

    धाराशिव – जीवे मारण्याची धमकी दिल्याचा स्टेटस ठेवून ग्रामविकास अधिकारी दहा दिवसांपासून बेपत्ता.  कळंब तालुक्यातील डिकसळ गावचे ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणे यांना आथर्डी गावच्या एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

    ग्रामविकास अधिकारी केशव गव्हाणे यांचा मोबाईल दहा दिवसापासून बंद. मला सारख्या जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्यामुळे मीच आत्महत्या करतो असे स्टेटस ठेवून गव्हाणे यांनी मोबाईल केला बंद. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांच्या कुटुंबीयांनी कळंब पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

  • 19 Jul 2025 09:02 AM (IST)

    अभिनेत्री संगीता बिजलानीच्या फार्महाऊसमध्ये चोरी

    मावळ,पुणे – प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानीच्या पवना धरणाजवळ असलेल्या तिकोना पेठ गावातील फार्महाऊसमध्ये चोरी झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघडकीस आले. यासंदर्भात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    वडिलांच्या आजारपणामुळे संगीत बिजलानी ही चार महिन्यांपासून फार्महाऊसवर येऊ शकली नव्हती, मात्र काल ती तेथे आली असता,  फार्महाऊसचा मुख्य दरवाजा तुटलेला दिसला तसेच खिडक्यांचे गज तोडण्यात आले होते. आतमध्येही तोडफोड झाली होती. अनेक मौल्यवान वस्तू गायब होत्या. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून फोडण्यात आल्याचेही उघड झाले.

  • 19 Jul 2025 08:59 AM (IST)

    नाशिक – आमदार सरोज अहिरेंच्या घरात चोरी, 1 लाख चोरले; गुन्हा दाखल

    नाशिकमध्ये आमदार सरोज अहिरेंच्या घरात चोरी झाली असून मोलकरणीनेच कपाटातून 1 लाख रुपये चोरले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून चोरी करणाऱ्या मोलकरणीला अटकही करण्यात आली आहे.