
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला आहे. झिशान सिद्दिकी यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि शिवसेना नेते अनिल परब यांना मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं. झिशान सिद्दिकी यांनी आपल्या निवेदनात वडिलांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. ज्यात भाजप नेते मोहित कंबोज आणि अनिल परब यांचं नाव आहे. तर दुसरीकडे अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पश्चिम बंगालमधून एका महिलेला अटक केली आहे. आरोपी शहजाद याच्या ओळखीची ही महिला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता या महिलेच्या चौकशीतून कोणती गोष्ट बाहेर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
केजरीवाल आणि अखिलेश यादव यांचा ३० जानेवारीला रिठाळा विधानसभेत रोड शो होणार आहे. अखिलेश यादव यांच्यासोबतच अनेक सपा खासदारही आपचा प्रचार करताना दिसतील. कैरानाच्या खासदार इक्रा हसनही आपचा प्रचार करणार आहेत.
जम्मूमध्ये वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या बस आणि ट्रकमध्ये धडक झाली आहे. या अपघातात आतापर्यंत 13 जण जखमी झाले आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, खासगीकरण आणि कंत्राटी नोकऱ्या हे गरिबांचे हक्क हिरावून घेण्याचे हत्यार आहेत.
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांची आई, पत्नी आणि मुलगा यांच्या विनंतीवरुन मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी एक घोट पाणी घेतले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक उपोषण करणाऱ्या दोन जणांची तब्येत खालावली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून जरांगे यांचे अंतरवाली सराटीत सामूहिक आमरण उपोषण
धाराशिवमध्ये मराठा बांधवांनी आक्रमक होत स्वत:ला जिल्हाधिकारी कार्यालयात कोंडून घेत घोषणाबाजी केली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा बांधवाचे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.
पुण्यातील GBS आजाराचा मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. पुण्यात GBSचे 111 रुग्ण आढळले आहेत. पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शासकिय रुग्णालयात उपचारांची विशेष व्यवस्था निर्माण करण्याते आदेश दिले आहेत तसेच औषधे सुद्धा उपलब्ध करण्यात आल्याच फडणवीसांनी सांगितलं आहे. तसचे सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. पाण्याचं प्रदूषण ही महत्वपूर्ण समस्या असून त्याबाबत सरकार योग्य पद्धतीन काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच टँकर पाणी पुरवठा करतात त्याचे मॉनिटरी व्हावी असही फडणवीसांनी म्हटलं आहे.
गोंदियामध्ये शालेय विद्यार्थ्यांकडून एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला. या शालेय विद्यार्थ्यांनी रस्ता वाहतूक अभियानात चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे वाहतूक पोलिसांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. एवढच नाही तर, जे चालकांनी हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर केला होता त्यांचेही विद्यार्थ्यांनी स्वागत केलं. वाहतूक पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा स्काऊट अँड गाईड विद्यार्थ्यांच्या उपक्रम होता.
भाजप नेते किरीट सोमय्या परभणीत दाखल होणार असून 2 वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. परभणीत बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची करणार मागणी करण्यासाठी किरीट सोमय्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
एस टी महामंडळाने भाडेवाढ केल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एसटी बसेस अडवल्याने काही वेळ वाहतूक खोळंबा झाला होता. प्रशासनाने एसटीच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. एसटी भाडेवाढ तात्काळ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आलं. मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची काम करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे. एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एसटीची भाडे वाढ करायची. एसटीचे भाडे वाढ ही सर्व सामान्यांचे कंबरडे मोडणारे असल्याच म्हणत या भाडेवाडीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून बुलढाणा मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात तपास केला आहे. त्यानुसार दोषारोपपत्र दाखल केले आहे. तरीही झिशान सिद्दीकी याचं समाधान होत नसेल तर सरकार त्यांचे आहे, पोलिसांनी पुन्हा तपास करावा, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
मंत्री धनंजय मुंडे हे आज कॅबिनेट बैठकीसाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरोधात पुरावे सादर केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्या विषयी फैसला होणार अशी चर्चा होत आहे.
ST तिकीट दरवाढी विरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाचा चक्काजाम आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक बाहेर ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
एसटी भाडेवावाढीच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. कल्याण विठ्ठलवाडी बसडेपोच्या गेटवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला. बस डेपो मधून बाहेर पडणारी बस रोखून धरली.
राज्याच्या मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक होत आहे. या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे येणार का? त्यांच्या राजीनाम्यावर या बैठकीत काही चर्चा होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागेल आहे.
पुण्यातील सुखसागरनगर परिसरातील ई लर्निंग स्कूलच्या इमारतीस २०१५ ला मान्यता मिळाली परंतु मागील ९ वर्षांपासून इमारतीचे काम संथ गतीने सुरू आहे. संपुर्ण कामकाज पुर्ण न झाल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे… महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे… स्थानिक नागरिकांकडून भीक मागून जमवलेले पैसे संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलन कर्ते देणार… महापालिकेकडून कात्रज व सुखसागर भागातील विकास कामांना कमी निधी दिला जात आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे.
रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातील भोकरपाडा भागातील एका मराठी कुटुंबाला परप्रांतीय कुटुंबाकडून सातत्याने त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भाडेकरू मराठी कुटुंबाचे येथील सोसायटी मधील रहाण्याचे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर घरमालकाने त्यांच्याकडील छोटं मुल असल्यामुळे त्यांना राहण्याची आणखी मुभा दिली होती. मात्र सोसायटीतील परप्रांतीय चेअरमन महिलेकडून रूम सोडण्यासाठी या कुटुंबावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. शिवाय या कुटुंबाशी भांडण करून मराठी माणसाची इथे राहण्याची लायकी नाही अशा स्वरूपातील वाद घालत त्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचं गायकवाड कुटुंबाचे म्हणणं आहे. या घटनेनंतर मनसेने या प्रकरणात उडी मारली आहे. शिवाय घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला जाब विचारला यासंदर्भात मराठी कुटुंबाची माफी मागण्यास या परप्रांतीय महिलेला भाग पाडलं.
शिवसेना ठाकरे गटाकडून एसटी तिकीट दरवाढी विरोधात निदर्शने सुरु… सोलापूर एसटी बस स्टँडच्या गेटवर ठाकरे गटाच्या वतीने निदर्शने… एसटीचे तिकीट दर वाढवल्याच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक… एसटीचे वाढवलेले तिकीट दर कमी करावे या मागणीसाठी निदर्शने करण्यात येत आहेत…
कोणत्याही आरोपीला whatsapp वरून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस बजावता येणार नाही… आरोपीकडे किंवा त्याच्या नातेवाईकाकडे किंवा घर बंद असल्यास घरावर नोटीस चिकटवावी लागणार… भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 नुसार आरोपीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस देता येणार नाही…
मोठी बातमी समोर आली आहे. कोणत्याही आरोपीला whatsapp वरून किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस बजावता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 35 नुसार आरोपीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नोटीस देता येणार नाही. आरोपीकडे किंवा त्याच्या नातेवाईकाकडे किंवा घर बंद असल्यास घरावर नोटीस चिकटवावी लागणार आहे.
नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला नवी मुंबई शहरामध्ये जोरदार धक्का बसला आहे. वरिष्ठ दखल घेत नसल्याने राजीनामा दिला असं म्हंटल जात आहे.
“आपल्या देशात न्यायाची अपेक्षा ठेवता येत नाही. न्यायाधीशच म्हणतात कोर्ट सरकारच्या दबावाखाली आहे. तसेच बीड प्रकरणावर सुरेश धस यांचा तांडव सुरुच आहे. सरकारच्या आशीर्वादाशिवाय सुरेश धस यांचा तांडव सुरु आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलीला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात इगतपुरीच्या 28 वर्षीय देविदास रावसाहेब मुसळे ठार झाला. ही घटना रायगड नगर जवळ वालदेवी पुलाजवळ घडली. जखमी युवकाला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ह्या घटनेमुळे नांदूरवैद्य आणि परिसरात शोककळा पसरली आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
20 पेक्षा जास्त याचिका दाखल आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज निर्णय अपेक्षित आहे. नवी प्रभाग रचना की जुनी प्रभाग रचना यावर सुप्रीम कोर्ट निर्देश देऊ शकतं. पंजाब राज्याप्रमाणे निवडणुक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्ट देणार का ?.
गुलेन-बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजारावरील उपचारांचा एकत्रित समावेश महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत केला गेला आहे. त्यामुळे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन थेरगाव रुग्णालय येथे या आजारावरील उपचार मोफत होत आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांनी दिली
मार्च अखेरपर्यंत सोलापूर ते गोवा तर मे अखेरपर्यंत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. सोलापूर विमानतळावर डीजीसीएच्या सूचनेनुसार काही प्रमाणात बदल सुरू असल्यामुळे मार्च अखेर पर्यंत विमान सेवा सुरू होणार. सोलापूर-मुंबई विमान सेवा उडान योजना अंतर्गत सुरू करण्यासाठी मे महिन्यापर्यंत लागणार वेळ.
ठाण्यातील कासारवडवली भागातील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती भीषण आग. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमनदल दाखल. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूय
ठाणे- माजी महापौर अशोक राऊळ यांचं निधन झालं आहे. दीर्घ आजाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. 1991 -92 मध्ये त्यांनी ठाण्याचं महापौरपद भूषवलं होतं. राष्ट्रवादीनंतर त्यांनी 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दिकी यांचा जबाब नोंदवला आहे. झिशान सिद्दिकी यांनी भाजपचे नेते मोहित कंबोज आणि शिवसेना नेते अनिल परब यांना मुंबई पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं. झिशान सिद्दिकी यांनी आपल्या निवेदनात वडिलांच्या डायरीचा उल्लेख केला आहे. ज्यात भाजप नेते मोहित कंबोज आणि अनिल परब यांचं नाव आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज आढावा बैठक घेणार आहेत. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा बैठक घेणार आहेत. आगामी कुंभमेळासंदर्भात सुरू असलेल्या तयारीचा देखील एकनाथ डवले माहिती घेणार आहेत. शहरातील विकास कामे आणि विशेष करून आरोग्य संदर्भात असलेल्या अडचणी जाणून घेणार आहेत. एकीकडे नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री ठरत नसताना पालक सचिव बैठक घेत असल्याने बैठकीला महत्त्व आहे.
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील टाकवडे गावातल्या स्वीट मार्ट कारखान्याला आग लागली. रवींद्र पोळ यांच्या आनंदी स्वीट मार्ट कारखान्याला लागलेल्या आगीत कारखान्यातील साहित्य जळून खाक झालंय. तर जवळपास 50 लाखांचं नुकसान झालंय. कारखान्यातील सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे. 22 जानेवारीला या प्रकरणी सुनावणी अपेक्षित होती. मात्र कार्यकालिकेमध्ये सदर प्रकरणाचा समावेश नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर 28 जानेवारी ही पुढील सुनावणीची तारीख दर्शवण्यात आली आहे. त्यामुळे आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
उद्या प्रयागराज येथे होणाऱ्या दुसऱ्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदावरी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. ज्या लोकांना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जाऊन स्नान करता येत नाही, असे हजारो भाविक उद्या गोदावरी नदीत पवित्र स्नान करणार आहेत. उद्या होणारी गर्दी लक्षात घेता गंगापूर धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्याची मागणी पुरोहित संघाकडून होतेय.
उद्या मौनी अमावस्या आहे, तसंच प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातील दुसरं शाही स्नान आहे. त्यामुळे दुहेरी योग्य आल्याने भाविक गर्दी करू शकतात.