
मुंबईसह राज्यात पावसाचा यलो आणि रेड अलर्ट. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत रिमझिम पाऊस. गेल्या काही दिवसा पासून राज्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. गेला दोन दिवसापासून समुद्राला देखील हाय अलर्ट देण्यात आला होता. यामुळे कालपर्यंत 4.8 मिटर उंच लाठा उसळत होत्या. मात्र आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाची कर वसुलीची मोहीम मागील काही दिवसापासून सुरू आहे. मात्र जालना शहरातील नागरिक याकडे कानाडोळा करून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. जालना शहरातील मालमत्ता धारकांकडे अजूनही 110 कोटी रुपयांचा कर थकीत असून गेल्या महिनाभरात पालिका प्रशासनाने केवळ 1.16 कोटी रुपयांचा कर वसुली केल्याने कर वसुली मोहिमेत पालिका प्रशासन अपयशी ठरले. मार्च 2026 पर्यंत पालिकेला 110 कोटी 75 लाखांपेक्षा अधिक कर वसुलीचे उद्दिष्ट आहे.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील दूधपुरी या गावासह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसान हजेरी लावली, या पावसाचा येथील शेकऱ्यांच्या फळबागांना मोठा फटका बसला आहे.
माथेरानमध्ये सध्या पर्यटकांचा हंगाम सुरू आहे, विविध राज्यातून पर्यटक फिरण्यासाठी माथेरानमध्ये येत आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास माथेरान येथील अमन स्टेशन जवळ पर्यटकांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या वादाचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर लोणावळ्याच्या जवळ डांबरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. लोणावळ्याजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झालं होतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून या भागात डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्यातील दगडूशेठ मंदिर परिसरात असणाऱ्या रोडवर मधोमध बसून भीक मागण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. रस्त्याच्या मधोमध बसल्याने वरदळीचा रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी होऊन देखील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांनी आरोप केला आहे. महाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 25 लाख रुपयात जेसीबी खरेदी ठरली. त्यानुसार प्रशांत एलवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये शशांक याला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये शशांकला देत होता. शशांकने हफ्ता भरला नसल्याने बँकेने जेसीबी जप्त केला. शशांक हा जेसीबी सोडवून आणला मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत. ही रक्कम 11 लाख 70 हजार रुपये होती. बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप ही प्रशांत एळवंडे यांनी केला आहे.
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 मोजण्यात आली. पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली नोंदवले गेले आहे. पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:06:56 वाजता जाणवले.
रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये ससून सर्वोपचार रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक अजय तावरे याचा सहभाग असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं. तस्च त्याला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैष्णवी हगवणे प्रकणात मोठी माहिती समोर येत आहे. हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकर यांना मोठा दणका बसला आहे. नाशिक संभाजीनगर येथील कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढून टाकण्यात आला आहे.
पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवले. 16 मे रोजी ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना अटक केली. आता त्यांना 14 दिवलांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाकिस्तानचा गुप्तहेर शकूर खान याला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानमध्ये तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
सोलापुरातील पनाश आपार्टमेंट बेकायदा बांधकाम प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या आजी-माजी 11 अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. पनाश अपार्टमेंटचा बांधकाम परवाना आणि जागा हस्तांतरण प्रकरणात महापालिकेचे नुकसान केल्याचा ठपका दोन अधिकार्यांच्या चौकशी समितीने ठेवला.
पुण्यातील वैष्णवी हगवणेप्रकरणात आणखी एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार विविध वस्तूंनी आरोपी आणि पती शशांक हगवणे याने तिला आठ दिवस मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर मानकोली ते पिंपळास या दरम्यान रस्त्यावरील डोंगर खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी दगड कोसळल्याने या मार्गावर 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्याचे आठ पदरी काँक्रिट करणाचे काम सुरू असल्याने रस्त्यातील उंच डोंगर भाग सपाट करण्यासाठी खोदकाम सुरू असल्याने ढिगारा कोसळला.
जळगावच्या चोपडा तालुक्यात रस्त्यावर आदिवासी महिलेच्या प्रसूतीच्या घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. प्रसूतीसाठी महिलेला रुग्णवाहिका का पुरवली नाही, किंवा डॉक्टर का गेले नाही असे प्रश्न विचारत वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी यांनी चांगलीच झाडाझडती घेतली.
शरद पवार गट अजित पवार यांच्या गटात सामील झाला पाहिजे. अजित पवार यांच्या गटाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
राज्य सरकार नवीन सीबीएससी पॅटर्न राज्यात शैक्षणिक धोरणानुसार लागू करणार आहे परंतु याच दिल्लीच्या सीबीएससी पॅटर्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांचा इतिहास हा केवळ 68 शब्दांमध्ये मांडला आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व मराठ्यांच्या कर्तुत्वाचा अपमान आहे त्यामुळे सीबीएससी बोर्डाचा हा पॅटर्न महाराष्ट्र मध्ये आम्ही लागू होऊन देणार नाही राज्य सरकारने जर तो लागू केला तर ती सर्व पुस्तक आम्ही जाळुन टाकू आणि येणाऱ्या पिढीला छत्रपतींचा इतिहास व मराठ्यांचे कर्तृत्व सांगण्यासाठी प्रयत्न करू असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने सचिन आडेकर यांनी पत्रकार परिषद च्या माध्यमातून केले आहे.
शिवसेना आमदारा नंतर भाजप आमदार अजित पवारांवर नाराज झाल्याचे वृत्त आहे. धनगरांच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
अजित पवारां विरोधात पडळकर फडणवीसांना तक्रारीचे पत्र देणार.आहेत. निधीवरून सरकार मधील 3 पक्षात धुसफूस वाढताना दिसत आहे.
वैष्णवी हगवणे सोबत ते झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. असे प्रकार घडले नाही पाहिजेत. जो दोषी असेल, ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला कडक शिक्षा व्हावी,अशी माझी इच्छा आहे अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने व्यक्त केली.
हगवणे परिवाराने लग्न समारंभात बैलांसमोर गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच हगवणे परिवाराने सुनांना जनावराप्रमाणे मारहाण केली. त्याचसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नानंतर गौतमीने संताप व्यक्त केला.
एक मुलगी एक स्त्री आपलं सर्वस्व सोडून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाते, तिच्याशी चांगलं वागलं पाहिजे. जे झालं ते खूप चुकीचं झालं, ज्यांनी ही चूक केली आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे, असं ती म्हणाली.
नंदूरबार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसराला वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. तोरणमाळ घाटात मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने घाटमार्ग बंद आहे. कोठबांधणी ते कालापाणी या परिसरात सर्वाधिक घरांचे आणि वृक्षांचे नुकसान झाले असून वादळीवाऱ्यामुळे घाटमार्गात चिखलाचा खच साचला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायत शेतीला मोठा फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील सौंदरे गावातील ड्रॅगनफ्रुट बागेचं मान्सूनच्या पावसामुळे नुकसान. अति पावसामुळे ड्रॅगनफ्रुटच्या झाडाची पाने पिवळी पडली. मान्सूनमुळे सोलापूर जिल्ह्यातील बळीराजा अडचणीत आला आहे.
वैष्णवी हगवणेसोबत जे झालं ते दुर्दैवी आहे. मी तिच्या बाजूने आहे. मला कलाकार म्हणून त्या कार्यक्रमात बोलावलं होतं. आम्ही तिथं कला सादर करतो. मला त्या कार्यक्रमाचं पूर्ण मानधन मिळालं होतं. आम्हाला त्यात घेऊ नका, आम्ही फक्त तिथे कला सादर केली होती, असं गौतमी म्हणाली.
पुणे- वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी न्यायालयाने लता हगवणे, शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना काल एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. लता, शशांक, करिष्मा यांना आज पोलीस तीन वाजता कोर्टात सुनावणीसाठी हजर करणार आहेत. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील नुकसानग्रस्त गावातील अनेक भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी देखील संवाद साधला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धान्य देण्यास सुरुवात केली आहे, असं अजित पवार म्हणाले.
धुळे शहरात आणि जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने खड्डे बुजवणं आवश्यक होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टरने परभणीत दाखल झाले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं आगमन झालं आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी हेलिपॅडवर दाखल झाले आहेत. विकसित संकल्प अभियानाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
राहुल गांधी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही सुरक्षा पुरवू… ठाकरे गटाच्या नेत्याकडून राहुल गांधींना धमकी दिल्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक… सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल ठाकरे गटाच्या नेत्याने दिली होती राहुल गांधींना धमकी… राहुल गांधी नाशिक मध्ये आले तर काळं फासून दगडफेक करू असा दिला होता इशारा…
पुण्यातील डी पी रस्त्यावर रात्री उशिरा सुरू असलेल्या कॅफेच्या बाहेर तीन तरुणांनी कोयता, पालघन सारखी हत्याऱ्यांनी एका वाहनाची तोडफोड करत दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे…
नाशिक शहरातील सगळ्यात लांब पल्ल्याच्या उड्डाणपुलाची डागडुजी सुरू… प्रत्येक पावसाळ्यात उड्डाण पुलावरून पाणी गळत असल्याने होतात अपघात… उड्डाण पुलावर वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाच्या येतात नाकी नऊ… उड्डाणपुलाची दागडूची युद्ध पातळीवर सुरू… नाशिक मधला सर्वात लांब पल्ल्याचा उड्डाणपूल यंदा गळणार नाही अशी अपेक्षा..
पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. शंकर सर्जेराव धुमाळ (वय ४७) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सहकार नगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव तापकीर यांच्या धनकवडी परिसरातील घरात घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
सोलापूर ते लातूर महामार्गावर दोन ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला आहे. आशिव गावा जवळ झालेल्या या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जळगावात बदलीसाठी बनाव करणाऱ्या महसूल विभागातील तिघांची विभागीय चौकशी सुरू आहे. आई-वडील आजारी असल्याचे बनावट दाखले जोडत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांचा बनाव उघड झाला. या तिघा कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या कासारशिरशी भागात बनावट डीएपी खत विक्रीसाठी घेऊन जाताना कृषी विभागाने पकडले. साधारणता 80 पोती बनावट डिएपी खत टेम्पोमधून विक्रीसाठी नेण्यात येत होता.
सांगली जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा वारणा नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. म्हैसाळ येथील कृष्णा नदीवर असणारा बंधारा पाण्याखाली गेला असून या ठिकाणी मासे पकडण्यासाठी तरुणांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात ९ दिवस झालेल्या वादळासह पावसाचा ७५३ गावातील १७ हजार १५४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसाचा सर्वच तालुक्याना फटका बसला असून ७५३ गावांतील शेतकऱ्यांचे केळी आणि फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६ हजार ७५५ हेक्टर क्षेत्रावरची केळी आणि १ हजार ९२ हेक्टरवरच्या फळपिकांचे यासह एकूण १० हजार ६३२ हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले. मे महिना प्रचंड उकाड्यासाठी ओळखला जातो, यंदा मात्र उकाड्यासाठी मे महिना अपवाद ठरला आहे.
भारतामध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या विदेशी नागरिकांवर कारवाईचा जोर वाढत असताना गृह मंत्रालयाने राज्य, केंद्रशासित प्रदेश यांना आधार, मतदार ओळखपत्र तसेच रेशन कार्ड जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की कोणत्याही ओळखपत्र अथवा दस्तऐवज देण्यापूर्वी अर्जदाराचे नाव बेकायदेशीर स्थलांतरितांच्या डेटाबेसमध्ये आहे की नाही हे तपासावे.
तपासामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने तुळजापुरातून शुभम सुरेश नेपते या तरुणाला अटक. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 37 आरोपींचा सहभाग, तर 19 आरोपींना अटक. तामलवाडी पोलिसांकडून शुभमच्या अटकेची कारवाई. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील 18 आरोपी अजूनही फरार, नोटीस बजावलेल्या अनेकांचा तपास सुरू.
मुंबईसह राज्यात पावसाचा यलो आणि रेड अलर्ट; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत रिमझिम पाऊस. गेल्या काही दिवसा पासून राज्यात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या दोन दिवसापासून समुद्राला देखील हाय अलर्ट देण्यात आला होता. यामुळे कालपर्यंत 4.8 मिटर उंच लाठा उसळत होत्या. मात्र आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण आहे.