
आज बकरी ईद असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केले आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तर येवला येथे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या गोमांस असलेला मालवाहू ट्रक येवला पोलिसांनी पकडला आहे. यावर बकरी ईदच्या दिवशी मोठी कारवाई करण्यात आली आहे. गोरक्षकांच्या मदतीने 18 ते 20 मूक प्राण्यांची सुटका झाली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ अपघात झाला आहे. कारने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. वाहनचालक सध्या पसार आहे. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
मुंबईसह उपनगरातील जवळपास 95 हजार झाडांची छाटणी पूर्ण झाली आहे. सर्वेक्षणानुसार मुंबईत रस्त्यावर 1 लाख 86 हजार झाडे असून त्यातील 1 लाख दहा हजार झाडांची छाटणी आवश्यक होती. झाडे पडून अपघात होण्याची शक्यता टाळण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 95 हजार झाडांची छाटणी केली. तसेच खाजगी – शासकीय जागेतील 10 हजारहून अधिक संस्था , सोसायट्यांना झाडे छाटण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. नवीन धोरणानुसार महापालिका खाजगी जागेतील झाडे छाटणी देखील करणार आहे.
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात गोळीबार सराव करण्याची घोषणा केली आहे. यासाठी भारताने 8 जून ते 11 जून 2025 या कालावधीत NOTAM (विमानचालकांना सूचना) जारी केली आहे. हा नौदल सराव गोवा आणि कारवार दरम्यानच्या समुद्री क्षेत्रात आयोजित केला जाईल. हा नौदल गोळीबार सराव सुमारे 96000 चौरस किलोमीटरवर पसरलेला असेल, ज्याची कमाल लांबी 600 किलोमीटरपर्यंत असेल.
हेरगिरीच्या आरोपाखाली 4 जून रोजी अटक करण्यात आलेल्या युट्यूबर जसबीर सिंगला मोहाली कोर्टाने 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. त्याचे वकील मोहित म्हणाले की, पोलिसांनी 7 दिवसांच्या रिमांडची मागणी केली होती. आम्ही कोर्टामार्फत पोलिसांना विचारले की त्यांनी 3 दिवसांत काय केले. आज 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
ठाण्यात टोइंग वॅन संदर्भात नागरिक आक्रमक झाले आहेत. ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकरांनी टोइंग व्हॅन विरोधात चक्काजाम केला. वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर एक चार चाकी वाहन आणत रस्त्यावर उभी केली. ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा तीन हात नाका येथे नागरिकांनी टोइंग वॅन विरोधात चक्काजाम केला. सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी गाडीवर tow me if you can but do it legally…. पोस्टर लावले आहे.
छत्तीसगडमध्ये शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बिजापूरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.
अकोला जिल्ह्यातील शीतल बोरडे यांची आज नियोजित शस्त्रक्रिया काही कारणास्तव होऊ शकली नाही, याचे दुःख त्यांना आहे, अशी प्रतिक्रिया शीतल यांनी दिली. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा हा अनुभव त्यांच्यासाठी अविस्मरणीय होता, असेही त्यांनी सांगितले. मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात होणारी ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून शीतल बोरडे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना धीर दिला. शस्त्रक्रिया न झाल्यामुळे, शीतल बोरडे यांना त्यांच्या गावी अकोल्याला परतण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या मदतीसाठी शिंदे सरकारच्या तत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती आली.
ठाण्यातील टोइंग व्हॅनच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज (शुक्रवार, ७ जून २०२५) ठाणे वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर ठाणेकरांनी टोइंग व्हॅनच्या विरोधात ‘चक्काजाम’ आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, संतप्त नागरिकांनी एक चारचाकी वाहन थेट वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर आणून रस्त्यावर उभी केली. ठाण्यातील तीन हात नाका या महत्त्वपूर्ण आणि वर्दळीच्या ठिकाणीही नागरिकांनी टोइंग व्हॅनविरोधात चक्काजाम आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी आपल्या गाडीवर “Tow me if you can but do it legally” असे पोस्टर लावून वाहतूक पोलिसांना कायदेशीर कारवाईचे आव्हान दिले, जे सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या म्हणाल्या आहेत की ” ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपाला अडचण येणार नाही. भाजपा हा मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाला काहीच अडचण येणार नाही”.
पुण्यातील पिंपळे गुरवमध्ये मुलगी झाली म्हणून एका विवाहितेचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून सुनेला उपाशी ठेवून तिचा मानसिक छळ आणि शारीरिक छळ करण्यात आला.सासरच्या 4 जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे हिंजवडीत पाणी साठलं आहे. या परिस्थितीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था आहे की नाही अशी शंका येत आहे. येथील नालेसफाईसारखी कामे वेळेत होण्याची गरज आहे.” असं म्हणत सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला.
डिनो मोरियाच्या मिठी नदी घोटाळा प्रकरणावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरेंवरही टीका केली आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यात जेलवारी करू शकतो. डिनो मोरिया कोणासोबत उठतो-बसतो हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे डिनो मोरिया मातोश्रीची सून असं म्हणायला हरकत नाही” असं धक्कादायक वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुळ्यात बैठक होणार आहे. माजी मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील मनभावना हॉटेल येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 10 तारखेला होणाऱ्या मेळाव्यासाठी आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील बालेवाडी येथे राज्यस्तरीय वर्धापन दिन मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या नियोजनासाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात थोड्याच वेळात होणार मुरकुटे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मुरकुटे यांच्यासह विदर्भ शिक्षक संघटनेचे पदाधिकारी,श्रीरामपूर, लातूर, शहापूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत सामाजिक कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला आहे. तसेच या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा गोंधळ पाहायला मिळाला. मंदिर प्रशासन विरोधात सामाजिक संघटनांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मंदिर समिती बरखास्त करा, अशी मागणीही करण्यात आली. BVG कंपनीला दिलेले मनुष्यबळ पुरवठा ठेका रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. ठेका देऊन कोट्यवधी खर्च करण्यापेक्षा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या वारकऱ्यांना सेवक म्हणून संधी द्यावी,अशी मागणीही करण्यात आली.
मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून मुंबईत पुढील ३ तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 यावर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेकडून करण्यात आलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांना सत्तेची मस्ती, आपण कुणावर टिका करतोय याचं त्यांना भान नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरिक्षण करावं, एवढी मतं कशी आली ते त्यांनी सांगावं असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सर्व प्रमुख वृत्तपत्रात निवडणूक आयोगावर टीका करणारा लेख आला आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली आहे.
श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
यवतमाळमध्ये एक धक्क्दायक घटना घडली आहे. यवतमाळवरून अमरावतीकडे जाणाऱ्या बसमधील चालकावर चार ते पाच युवकांनी हल्ला केला. एसटीला साइट देत नसल्याने चालकाने हाॅर्न वाजवून साइट मागितलं. त्यानंतर हाॅर्न का वाजविला असे म्हणत त्यांनी गाडी थांबवली आणि चालकाला मारहाण केली. नेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळ्यातील प्रभाग क्रमांक दोनमधील देवपूर भागात पाणीटंचाई सुरु झाली आहे. पोतदार शाळेजवळ मुख्य पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शाळेच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान ही पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे पोलिस ठाण्यात लक्ष्ण हाके यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर सातत्याने खालच्या पातळीला जाऊन लक्ष्मण हाके टीका करत असल्यामुळे लोकांच्या भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण होत आहे असे म्हटले आहे.
चिपळूण कराड मार्गावर कुंभार्ली घाटात संरक्षक कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका वाढला आहे. रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती आहे. खोल दरी असलेल्या ठिकाणी असलेली संरक्षक भीत कोसळून रेलिंग देखील निखळले आहे.
अमरावतीमध्ये उध्दव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या शिवसेना-मनसे युतीचा विजय असो अशी घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अमरावतीमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांनी इच्छा वर्तवली. मुंबईत युती झाल्यास पहिले फटाके अमरावतीमध्ये फुटणार असा निर्धार मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
लासलगावमध्ये गेल्या मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले. तर यंदा शेती पीक बियाण्यांच्या दर वाढीचे शेतकर्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. मका, कांदा बियाण्यांच्या दारात अडीचशे ते साडे तीनशे रूपयांची वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या बियाण्यांचे दर स्थिर झाले. तर सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला बाजार भाव नसल्याने सोयाबीनच्या बियाणे दारात दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.
दाजी पणशीकर यांच्या पश्चात पत्नी, दोन कान्या, मुलगा, जावई व सुन असा परिवार..त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक विश्वातील एक उज्वल दीप मालवला असून गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास जपणारे एक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना राज्यभरातून व्यक्त होत आहे. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांच्याकडून मिळालेल्या हिंदू धर्मग्रंथ आणि परंपरांचा ठेवा त्यांनी अधिक सखोलतेने पुढे नेला. देश-विदेशात त्यांनी सुमारे २,५०० हून अधिक व्याख्याने दिली.
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण असून अचानक पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“महाराष्ट्रनंतर आता बिहारमध्येही मॅच फिक्सिंगची तयारी सुरू आहे.” या त्यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय धुरळा उडवून दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठी गडबड झाल्याचा पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आरोप केला. संध्याकाळी अचानक ईव्हीएमचे मतदान कसे वाढले असा सवाल यापूर्वी राहुल गांधी यांनी विचारला होता.
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हगवणे माय लेकासह इतर चार आरोपींना ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार आहे.
“सामनात आलेला फोटो मी पाहिलेला नाही. पक्षाला काय फायदा होईल, तसा विचार करावा लागतो. युतीचा विषय अद्याप माझ्या हातात नाही. युती संदर्भात काही भाष्य करणार नाही. वरिष्ठ पातळीवरील चर्चेची मला माहिती नाही” असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सह आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला आज बावधन पोलिस न्यायालयासमोर हजर करणार आहेत. निलेश चव्हाणची आज पोलीस कोठडी संपलेली आहे. एक वाजता बावधन पोलीस निलेश चव्हाणला न्यायालयासमोर हजर करतील. निलेश चव्हाणला आज न्यायालयीन कोठडी होण्याची शक्यता.
शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना न्यायालयीन कोठडी. हगवणे माय लेकासह इतर चार आरोपींना ही न्यायालयीन कोठडी. आता हगवणे माय लेकांची येरवडा कारागृहात रवानगी होणार.
“स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीमध्ये जागा वाटप व्यवस्थित होईल असं वाटत नाही” असं शरद पवार म्हणाले. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेत काय परिस्थिती असेल? यावर शरद पवार म्हणाले की, “आतापर्यंतचा अनुभव असा आहे, राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते मात्र मते भेटत नाहीत. उद्धव ठाकरेंना मात्र मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश येते” असं शरद पवार म्हणाले.
“ठाकरे बंधु एकत्र आलेत, तरी राजकारणात काही होणार नाही. उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांचा वैचारिक वारसा नाही. राज ठाकरेंच्या मुलाला उद्धव ठाकरेंनी पाडलं. उद्धव ठाकरेंनी नेत्यांना स्टेजवरुन खाली उतरवलं. उद्धव ठाकरेंचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे” अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली.
पुणे शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासद आणि आजी-माजी पदाधिकारी यांच्यासोबत भेटीगाठी त्यांनी घेतल्या आहे.
ठाण्यातील घोडबंदरपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मेट्रो मार्गीकीचं काम सुरू आहे. या मार्गिकेसाठी पिलरवर गर्डर टाकण्याचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस रात्री 11 ते पहाटे सहा वाजेपर्यंत वाहतूक मध्ये बदल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रात्रभर गडचिरोलीत मुक्काम होता. आता पोलीस विश्रामगृहातून थोड्याच वेळात ते नागपूरसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या शहीद स्मारकावर जाऊन ते आदरांजली वाहणार आहे.
प्रेम प्रकरणातुन युवकाची हत्या झाली आहे. ही घटना यवतमाळच्या संकट मोचन रोड येथे घडली आहे. सूरज घटाळे असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रियसीच्या आधीच्या प्रियकराने मित्रांच्या मदतीने काटा काढला. हत्येच्या घटनेचा थरार cctv कॅमेरात कैद झाला आहे. यवतमाळ शहरात 72 तासात दोन हत्या झाल्या आहेत.
शशांक आणि लता हगवने या माय लेकासह जेसीबी फसवणूक प्रकरणातील प्रणव साठे आणि तीन एजंट यांची आज खेड न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे. जेसीबी फसवणूक प्रकारात एकूण सहा आरोपी अटक करण्यात आली आहे. सकाळी 10.30 वाजता या सहा जणांना खेड न्यायालयात आणण्यात येणार आहे.
दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद दिवशी शिवसेनेचं ‘घंटा नाद’ आंदोलन – शिंदेच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर ठाकरे गट देखील आक्रमक… दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईद दिवशी शिवसेनेचं ‘घंटा नाद’ आंदोलन… शिंदे गटाच्या आंदोलनानंतर ठाकरे गटही मैदानात – परिसरात वाढला तणाव… 35 वर्षांपासून मंदिर बंद ठेवण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं आंदोलन सुरू… पोलिसांचा मोठा बंदोबस्त, बॅरीगेटिंग ओलांडण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न
धुळे येथे बकरी ईद निमित्त मुस्लिम धर्मीय बांधवांचे सामूहिक नमाज पठण… शहरातील ईदगाह मैदानावर पार पडणार सामूहिक नमाज पठण… सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम धर्मीय बांधवांची गर्दी होण्यास सुरुवात… ईदगाह मैदान परिसरात पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त … देशाच्या शांतता आणि सुरक्षेसाठी मुस्लिम धर्म बांधवांकडून प्रार्थना….