
महायुतीच्या उमेदवार हिना गावित याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार येथे सभा होणार आहे. सकाळी 11.30 वाजता ही सभा होणार असून या सभेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. आदिवासी भागातील मतदार संघ असल्याने मोदींच्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयाच्या हत्या प्रकरणात परवेज तक दोषी ठरला आहे. मुंबई सेशन कोर्टाने हा निर्णय दिला. हत्येच्या 14 वर्षांनंतर परवेजला कोर्टाने दोषी ठरवले, तब्बल ४० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. मेट्रोच्या कामात जलवाहिनी फुटल्याने फोर्ट परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिकेच्या ए विभागात चर्चगेट जवळील जीवन बीमा मार्गावर मेट्रो ३ चे काम सुरु असताना १२०० मिली मीटर च्या जलवाहिनीला गळती लागली. या जलवाहिनीची शनिवारी ११ मे रोजी दुपारी ३.३० ते ११.३० या ८ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार असून यामुळे कुलाबा,कोळीवाडा आणि नौदल परिसरात ८ तास पाणी बंद राहणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.