
साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामांवर दहा दिवसांत हातोडा चालवण्यात येणार आहे. या रिसॉर्टचा दुसरा मजला येत्या 10 दिवसांत पाडण्यात येणार आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात हमी दिली. दिलेल्या मुदतीत पाडकाम केले नसल्याने कोर्टाची माफी मागितली. पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मोठे नेते पुण्यात असून काल रात्री उशीरा महत्वाची बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण आणि भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थितीत होते. तिसऱ्या टप्प्यातील झालेल्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच चौथ्या टप्प्यातील मतदारसंघाबाबत चर्चा झाली. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.