Maharashtra Breaking News LIVE : वरळी हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध बैठका पार पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर महाराष्ट्र राज्याला सर्वश्रेष्ठ कृषी राज्याचा पुरस्कार जाहीर झाला. हा कृषी पुरस्कार स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत. त्यासोबतच सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
शरद पवार गटाकडून इंदापुरात तुकाराम महाराजांच्या पादुकांना अनोख्या पद्धतीने साकडे
इंदापूर : शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर मिळावा यासाठी इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तुकाराम महाराजांच्या पादुकांना अनोख्या पद्धतीने साकडे घालण्यात आलंय. हातात कांदा, सोयाबीन, कापूस, दूध घेऊन तुकाराम महाराजांच्या पादुकांना साकडे घालण्यात आलेले आहे. सध्याच्या महायुतीच्या सरकारला जाग यावी आणि शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळावा सरकारला सदबुद्धी मिळावी यासाठी अनोख्या पद्धतीने इंदापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने साकडे घालण्यात आलेले आहे.
-
धुळ्यात पांझरा नदी पात्रात पोषण आहाराची शेकडो रिकामी पाकीटं
धुळ्यातील पांजरा नदीच्या पात्रामध्ये पोषण आहाराची हजारो रिकामे पाकीट फेकून देण्यात आले आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने गरोदर माता, स्तनदा माता आणि लहान बालकांनाही पाकीट दिली जात असतात. मात्र एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिटे सापडल्याने एकच खळवळ उडाली आहे. पोषण आहाराची विल्हेवाट लावून ही पाकीट फेकून देण्याचा संशय व्यक्त केला जात असून एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणी पाकीट फेकली? याची चौकशी करणे महत्त्वाचं आहे. महिला व बालविकास विभाग काय कारवाई करतो हे बघणं देखील महत्त्वाचा ठरणार आहे.
-
-
महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वीकारला
महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचे जनक राज्य आहे. शेतकऱ्यांचा सन्मान करणे ही आमची परंपरा आहे. मी पण एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे हा पुरस्कार माझ्या शेतकऱ्यांचा आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वोत्कृष्ट कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्यात केले. महाराष्ट्रातील शेतकरी नवीन तंत्रज्ञान कायम वापरतो. महाराष्ट्र राज्यात आम्ही बांबू मिशन सुरू केले आहे. ज्यामुळे 2 हजार प्रकारच्या वस्तू बनतात. रोटी, कपडा, मकान बनवण्याची ताकद बांबूमध्ये आहे ते यावेळी म्हणाले.
-
गणेश नाईक आणि मंदाताईं यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी
बेलापूर विधानसभा मतदारसंघात जिल्हाध्यक्ष आणि आमदाराचा जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटनाचा घाट घालण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये मागील अनेक वर्षापासून महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यावरून श्रेय वादाची लढाई सुरू आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे आमदार मंदा म्हात्रे आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी बेलापूर मतदार संघात कार्यालय उद्घाटनाचा घाट घातल्याने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
-
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सिंबाला दत्तक घेतले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून सिंबा नावाच्या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले. रामदास आठवले गेल्या 6 वर्षांपासून त्यांचा मुलगा जीतसाठी बिबट्या दत्तक घेत आहेत. यावेळीही तो आपल्या कामगारांसह बचाव केंद्रात गेले आणि त्यांनी सिंबा याला दत्तक घेतले.
-
-
जातीनिहाय जनगणना होण्यासाठी ओबीसीची मंडल यात्रा
ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी ओबीसी युवा अधिकार मंचच्यावतीने मंडल यात्रा काढली जाणार आहे. 7 ऑगस्टला नागपूरच्या संविधान चौकातून या यात्रेला सुरवात होणार आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात ही यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असेल. काही ठिकाणी चालत तर काही ठिकाणी वाहने घेऊन ही यात्रा केली जाणार आहे.
-
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला
बिहारमध्ये आणखी एक पूल कोसळला आहे. सहरसाच्या महिशी ब्लॉक अंतर्गत कुंडा पंचायतीमध्ये असलेल्या प्राणपूरपासून NH-17 ते बलिया-सिमरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेला कल्व्हर्ट कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार सरकारमध्ये जेडीयू कोट्यातून मंत्री झालेल्या रत्नेश सदा यांच्या घरच्या पंचायतीत ग्रामीण बांधकाम विभागाने सुमारे 5 वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता.
-
मंत्री प्रल्हाद यांच्या पीआरओने केली आत्महत्या
मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या पीआरओ पूजा थापक यांनी आत्महत्या केली आहे. पूजा थापक मध्य प्रदेशच्या जनसंपर्क विभागात वर्ग-2 अधिकारी होत्या. गोविंदपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहत्या घरी आत्महत्या केली. पती निखिल विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात सहायक संचालक (नायब तहसीलदार) आहेत. पूजाचा पती निखिलसोबत वाद सुरू होता. वादानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पूजाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून दोघांना एक वर्षाचा मुलगा आहे.
-
बालविवाहावर बंदी घालण्याच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
देशात बालविवाहावर बंदी घालण्याच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने होणारे कार्यक्रम आणि व्याख्याने प्रत्यक्षात तळागाळात बदल घडवून आणत नाहीत. CJI DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्राला विचारले की FIR नोंदवणे हा एक पैलू आहे, पण सामाजिक स्तरावर काय करता येईल?
-
मुंबई पोलिसांना आरोपी मिहीरची 7 दिवसांची कोठडी मिळाली
मुंबईतील हिट अँड रन प्रकरणावर पोलीस कडक कारवाई करत असल्याचे दिसत आहे. आता मुंबई पोलिसांनी आरोपी मिहीर शाहला सात दिवसांची कोठडी न्यायालयाकडे मागितली आहे. 16 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
विधानपरिषद निवडणुकीआधी अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादीची बैठक
विधानपरिषद निवडणुकीआधी अजित पवारांच्या दालनात राष्ट्रवादीची बैठक सुरु आहे. १२ जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्याआधी ही महत्त्वाची बैठक होत आहे.
-
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. दोन्ही बाजुने जोरदार घोषणाबाजी होत आहे.
-
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पाऊसाचं पुन्हा जोरदार कमबॅक
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर सांगलीमध्ये पाऊसाचं पुन्हा जोरदार कमबॅक झाले आहे. सांगली शहरासह परिसरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दमदार असा पाऊस पडला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. दुपारनंतर जोरदार असा पाऊस पडला आहे. यामुळे चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी
वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहाला १६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी आज त्याला शिवडी कोर्टात हजर केलं होतं.
-
तपस बारवर मुंबई महापालिकेने कारवाई
जुहूतील तपस बारवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. बुलडोझरच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे. बारमधील अवैध बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.
-
सिटीलिंक बसच्या धडकेत पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
सिटीलिंक बसच्या धडकेत शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिक रोड परिसरात असलेल्या मालधक्का येथे आज दुपारच्या सुमारास घटना घडली आहे. सानवी सागर गवई असे बसच्या धडकेत मृत्यू झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीचं नाव आहे. आजोबांसोबत आजीच्या चहा टपरीवर जात असताना भरदा वेगात आलेल्या सिटीलींक बस चालकाने धडक दिली. गेल्या दोन दिवसात नाशिक शहरात अपघाताची तिसरी घटना आहे. घटनेत आजोबांना किरकोळ दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सदर बसचालक हा म्हणून मध्य धुंद अवस्थेत बस चालवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
-
अमरावती शहरात मुसळधार पावसाची हजेरी
अमरावती शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विनच्या परिसरात साचले पाणी;नेहमीच पाणी साचत असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास झाला. काही दिवसापूर्वी आलेल्या पावसामुळे आपत्कालीन विभागात पाणी शिरलं होतं. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रुग्णालयाच्या समोर पावसाचं पाणी साचतं.
-
मुंबई- गोवा महामार्गावर ब्लॉक
मुंबई- गोवा महामार्गावर कोलाडजवळ 11 ते 13 जुलैदरम्यान ब्लॉक असणार आहे. सकाळी 6-8 दुपारी 2-4 या वेळेत हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यावेळी पर्यायी मार्गावर प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
-
ठाण्यातील चालत्या दुचाकीला आग
ठाण्यातील पाचपाखाडी भागात एका चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला. बाईक स्वार आणि एक व्यक्ती प्रवास करत होते. गाडीला आग लागताच दोघांनी पळ काढला. कोणालाही दुखापत नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग विजवण्यात आली. मोठ्या प्रमाणात गाडीचं नुकसान झालं आहे.
-
सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या -मनोज जरांगे पाटील
विरोधक बैठकीला आले नाहीत हे कारण देऊन सरकार आमचे आरक्षण लांबवत आहात का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. तुम्ही त्यांची वाट पाहू नका आम्हाला आरक्षण देऊन टाका. सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा आरक्षण द्या. प्रवीण दरेकर तुम्ही मराठे आहात म्हणून तुमचा आदर करतो, याचा अर्थ तुम्ही काहीही बोलू नका नाहीतर आम्हाला पण बोलावे लागेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
-
तर आता पाऊस चांगला होणार
आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले ते चांगला पाऊस होण्याचा अंदाज, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला. किल्लारीमध्येही आधी भूकंप आल्यानंतर जोरदार पाऊस झाला होता. येणाऱ्या दिवसात परभणीमध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज डक यांनी वर्तवला आहे.
-
काश्मीर सहली बंद करा, काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाका : हिंदू महासंघ
काश्मीरच नव्हे तर जम्मू मधे सुद्धा अतिरेकी हल्ले वाढले आहेत. मागील 3 महिन्यात 20 हल्ले आणि 70 हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत, त्यात सैनिक सुद्धा ठरवून मारले जात आहेत. हे अतिरेकी हल्ले करणारे कोण आहेत, कोठे लपलेत हे सर्व स्थानिकांना माहित असते पण तेथील स्थानिक याबाबत गप्प राहतात. तिथल्या मुस्लिमांना हिंदू नकोच आहेत. तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा एवढ्या साठीच त्यांना हिंदू हवे आहेत.
-
उद्धव ठाकरे गटाचा रस्ता रोको
सोलापूर जिल्ह्यात राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळ निधी मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. मंद्रूप येथील तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात आला.
-
अमोल कोल्हे यांचा जनता दरबार
शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज जनता दरबार घेतला. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती जनता दरबार घेण्यात आला. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमोल कोल्हे मतदार संघात आले आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी 850 जनता दरबार घेतले आहेत. तर अमोल कोल्हे यांचा आज पहिलाच जनता दरबार आहे.
-
पुण्यात सव्वा कोटींची अवैध दारू जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. पुणे युनिटने तब्बल सव्वा कोटींची अवैध दारू जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या सुमारे 84 हजार बॉटल्स जप्त केल्या आहेत. हा माल एका ट्रकमधून अवैध मार्गाने महाराष्ट्रात दाखल झाला होता. जालन्याच्या दिशेने निघालेला हा ट्रक खेड शिवापुर टोल नाक्यावर पकडण्यात आला,याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन
जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीने धरणे आंदोलन केले. कापूस, केळीसह दुधाला अनुदान मिळावे. ज्वारीचे खरेदी केंद्र सुरू करावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
-
वडेट्टीवार यांचा सरकारवर मोठा आरोप
वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने काय लेखी आश्वासन दिले हे आम्हाला माहिती नाहीये.
-
ग्लोबल तपस बारवर कारवाई
मुंबईतील वरळी प्रकरणानंतर आता ग्लोबल तपस बारवर कारवाई केली जातंय. महापालिकेचे पथक बारवर पोहोचले आहे.
-
आदित्य ठाकरे यांनी केली मोठी मागणी
नुकताच आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, वरळी प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी.
-
विधानसभेत जोरदार गदारोळ
विधानसभेत जोरदार गदारोळ बघायला मिळतोय. विरोधक आणि सत्ताधारी आक्रमक झाले आहेत.
-
अमरावतीच्या तिवसा येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
मदर डेअरीची दूध संकलन करणारी गाडी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाडी अडवली. शेतकऱ्यांनी मदर डेअरीच्या गाडीतून दूध व आपल्या कडील दूध रस्त्यावर फेकले.
-
मनी लाँड्रींगप्रकरणी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला
नवी दिल्ली- मनी लाँड्रींगप्रकरणी अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे अर्ज निष्फळ ठरवत हा जामीन फेटाळला. अनिल देशमुख यांना 2022 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.
-
वसईहून महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
वसईहून महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वसई ते वसई फाटा, सातिवली जाणारा मुख्य महामार्ग ठप्प झाला आहे. वसई एव्हरसाइन सिटी सिग्नल, गोखीवरे, रेंज नाकापर्यंत पूर्णपणे वाहतूक कोंडी झाली आहे. मागच्या एक तासापासून वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत
-
वरळी हिट अँड रनप्रकरणी वाइस ग्लोबल तपस बारवर पलिकेकडून तोडक कारवाई
वरळी हिट अँड रनप्रकरणी जुहू परिसरात वाइस ग्लोबल तपस बारवर पलिकेकडून तोडक कारवाई करण्यात येणार आहे. तोडक कारवाईसाठी बुलडोझर, गॅस कटर हे साहित्य मागवण्यात आले आहेत. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसंच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
-
कोल्हापुरातील उत्तुरमध्ये आंबेओहोळ धरणग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन
कोल्हापुरातील उत्तुरमध्ये आंबेओहोळ धरणग्रस्त जलसमाधी आंदोलन करणार आहेत. नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी न लागल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. 300 हून अधिक प्रकल्पग्रस्त आज आंबेओहोळ धरणात उड्या घेणार आहेत. यामुळे आंबेओहोळ धरण परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची जरांगेंनी घेतली भेट
लातूर- मनोज जरांगे पाटील यांनी लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांना भेट दिली. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्ते अनिल गोयेकर आणि चंद्रकांत हजारे या दोन कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे.
-
वरळी हिट अँड रनप्रकरणी मराठी इंडस्ट्री गप्प का? राऊतांचा सवाल
वरळी हिट अँड रनप्रकरणात ज्या महिलेचा मृत्यू झाला, त्या कावेरी नाखवा या अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नातेवाईक आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सहकलाकाराच्या नातेवाईकाचा अशा पद्धतीने मृत्यू होतो आणि संपूर्ण इंडस्ट्री मूग गिळून गप्प बसते, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. कुठे गेली मराठी इंडस्ट्री? कसला टाळकुटेपणा ही मराठी इंडस्ट्री करतेय, असा सवाल राऊतांनी केला.
-
Maharashtra News : . आरोपीसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करा – संजय राऊत
“महाराष्ट्रात गुन्हेगारांना पाठिशी घालणार सरकार. अपघात झाल्यावर वडिल सांगतात पळून जा. आरोपीसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
-
Maharashtra News : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचे सरकारचे प्रयत्न – संजय राऊत
“आरोपीच्या वडिलांचे अंडरवर्ल्डशी संबंध. आरोपीला तीन दिवस लपवून ठेवण्यात आलं होतं. आरोपीच्या वडिलांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा. मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर संशय येतोय” वरळी हिट अँड रन प्रकरणात संजय राऊत यांचा आरोप
-
Maharashtra News : क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक भिती सत्ताधाऱ्यांना – संजय राऊत
“क्रॉस व्होटिंगची सर्वाधिक भिती सत्ताधाऱ्यांना. आम्हाला क्रॉस व्होटिंगची अजिबात भिती नाही. फडणवीसांना सत्ता यंत्रणेच्या बळावर घोडेबाजार केला. मविआचे तिन्ही उमेदवार विजयी होणार” असा दावा संजय राऊत यांनी केला.
-
Maharashtra News : काश्मीर सहली बंद करा, काश्मीरवर आर्थिक बहिष्कार टाका : हिंदू महासंघ
“काश्मीरच नव्हे तर जम्मूमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले वाढले आहेत. मागील 3 महिन्यात 20 हल्ले आणि 70 हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत. त्यात सैनिक सुद्धा ठरवून मारले जात आहेत. हे अतिरेकी हल्ले करणारे कोण आहेत? कोठे लपलेत? हे सर्व स्थानिकांना माहित असते. पण तेथील स्थानिक याबाबत गप्प राहतात. तेथील मुस्लिमांना हिंदू नकोच आहेत. तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा एवढ्या साठीच त्यांना हिंदू हवे आहेत” असं हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
-
मराठ्यांना त्रास दिल्यास सहन करणार नाही – जरांगे पाटील
मराठ्यांना त्रास दिल्यास सहन करणार नाही… मराठेही ओबीसीमध्ये जाणार… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
पुण्यातील नवीन टर्मिनल १४ तारखेपासून सुरु होणार
नवीन टर्मिनलमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं घडणार दर्शन… नवीन टर्मिनल काम जवळपास पूर्ण… १४ तारखेला दुपारी १ वाजता होणार उद्घाटन… नवीन टर्मिनलवर असणार इनलैंड बॅगेज सिस्टिम
-
वरळी हिट अँड रन प्रकरण दावण्याचा प्रयत्न केला – विजय वडेट्टीवार
वरळी हिट अँड रन प्रकरण दावण्याचा प्रयत्न केला… पोलिसांना आरोपी कुठे होता, हे माहिती होतं… आरोपीला वाचवण्यचा सरकारनं प्रयत्न केला… असा खुलासा विजय वडेट्टीवार यांनी केला…
-
सरकारनं लेखी आश्वासन दिल्यावर आता चर्चेची काय गरज? – विजय वडेट्टीवार
सरकारनं लेखी आश्वासन दिल्यावर आता चर्चेची काय गरज? मराठा – ओबीसी मुद्यावर अचानक सर्वपक्षीय बैठक बोलावली… अधिवेशन सुरु असताना बाहेर बैठक घेण्याची गरज काय? असा प्रश्न देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
-
मुंबईत चित्रपट निर्मात्याचं झाडावर चढून आंदोलन
मुंबईत चित्रपट निर्मात्याचं झाडावर चढून आंदोलन… ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने NOC त्या नाववर पैसे घेऊ नये, अशी मागणी… NOC त्या नाववर 30 हजार रुपये घेऊ नये, अशी आंदोलकाची मागणी
-
मुंबई उपनगरात पावसाला सुरुवात
कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव परिसरात आज पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे.
-
झिकाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ
शहरात झिकाचे नव्याने तीन रुग्ण आढळून आलेत… शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 15 वर… यामध्ये दोन गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश… पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे… 31 महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आलेत
-
Maharashtra News : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल सेवा उशीराने
Maharashtra News : आज पुन्हा मध्य रेल्वे विस्कळीत, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेस गाड्यांमुळे लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरु, आज पुन्हा चाकरमान्यांचे हाल पाहायला मिळत आहेत. शहाड, कल्याण, टिटवाळा या स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
-
Maharashtra News : पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाची हजेरी, पाणीसाठ्यात वाढ
Maharashtra News : पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये 30 मिलिमीटर होऊन अधिक पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. त्यामुळे धरण साठ्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुणेकरांवरील पाणी कपातीची टांगती तलवार दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
Maharashtra News : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; नांदेड, हिंगोलीसह संभाजीनगरही हादरले
Maharashtra News : मराठवाड्याच्या नांदेड, हिंगोली, वसमतसह छत्रपती संभाजीनगरात आज सकाळी 7:15 च्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. नांदेड आणि हिंगोलीत भूकंपाची तीव्रता अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. रिश्टर स्केलवर 4.0 इतक्या तीव्रतेचे हे भूकंपाचे धक्के असल्याचे नोंदवण्यात आले आहे. नांदेड आणि हिंगोलीतील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
-
Maharashtra News : विधानपरिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स, पक्षांकडून सावध पावित्रा
Maharashtra News : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची हॉटेलवारी, एकनाथ शिंदे आमदारांना वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवणार, तर अजित पवार गट फोर सीझन्स किंवा ललीत हॉटेलमध्ये आमदारांना ठेवणार, तसेच ठाकरे गट ITC ग्रँडमध्ये आमदारांना ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
Published On - Jul 10,2024 8:27 AM