AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तीन टप्प्यांमध्ये करेक्ट कार्यक्रम…’, मनोज जरांगेंनी सांगितला विधानसभेचा संपूर्ण प्लॅन

मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांनी निवडणुकीचं नियोजन नेमकं कसं असणार याबाबत माहिती दिली आहे.

'तीन टप्प्यांमध्ये करेक्ट कार्यक्रम...', मनोज जरांगेंनी सांगितला विधानसभेचा संपूर्ण प्लॅन
| Updated on: Oct 22, 2024 | 5:37 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे उमेदवार उभे करायचे आणि जिथे निवडून येण्याची शक्यता कमी आहे, तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल त्याला पाठिंबा द्यायचा अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी झालेल्या बैठकीत मांडली. दरम्यान त्यांनी आता विधानसभेचं नियोजन नेमकं कसं असणार याचे तीन टप्पे सांगितले आहेत.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

आपले तीन टप्पे आहेत. एक जिथे उमेदवार निवडून येतील आपण तिथेच उमेदवार देणार आहोत. दोन एस.सी, एस.टी मतदार संघामध्ये जे आपल्या विचाराचे लोक आहेत, जे आपल्या मागणीशी सहमत आहेत, त्या मतदान संघातील मराठा समाजाची मतं त्यांना दिली जाणार आहेत, मग तो उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो,आणि त्याला निवडून आणले जाणार आहे. राखीव मतदार संघात दोन्ही आले नाही तर, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार दिला जाईल. आणि त्याला मराठा, मुस्लिम आणि दलितांचे बळ दिले जाणार आहे. त्याला निवडून आणत त्या दोघांना पाडणार आहोत. तीसरा टप्पा ज्या ठिकाणी आमचा उमेदवार नाही अशा ठिकाणी आम्ही आधी त्या उमेदवाराकडून आमच्या मताशी सहमत असल्याचं लिहून घेणार आहोत, आणि मगच त्याला मराठा समाज मतदान करणार आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही फक्त अर्ज भरू नका, आपल्याला समाजाची ताकत दाखवायची आहे. बॉण्ड आम्हाला डायरेक्ट आणून देऊ नका तर त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा. सगळी समीकरण बघावी लागणार आहे, समीकरणाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. जिथे एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरले असतील तिथे ऐनवेळी फक्त एक उमेदवार दिला जाईल बाकीच्यांनी आपले अर्ज काढून घ्यायचे आहेत. जो आपली उमेदवारी मागे घेणार नाही तो मॅनेज झाला असं आम्ही समजू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...