
झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. तसेच विधानपरिषद निवडणुकीत जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या जिंकून आलेल्या 11 सदस्यांना थपथ देतील. तर दुसरीकडे सांगलीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सांगलीत नरसिंहवाडी आणि कुरुंदवाड शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे. तसेच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
मी जरांगेबद्दल काही बोलत नाही. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात चालू आहे. तो अजून मिटलेला नाही. सगेसोयरे हे कायदेशीर मार्गात बसत नाहीत. 55 लाख कुणबीचे दाखले इश्यू केले आहेत. ते चुकीचे दाखले रद्द करा. Ncp पक्षाची भूमिका शरद पवारांनी मांडावी अशी मागणी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली.
महाराष्ट्रावर आज इतके मोठे संकट आहे. त्याला सामोरे जाणे हे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. जनतेला विश्वासात घेणे हे सरकारचे काम आहे. मात्र, लोकांना दिलासा द्यावा असे राज्यकर्त्यांना कधी वाटले नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय अशी चिंता वाटायला लागलीय अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि आयोजक पूर्वेश सरनाईक यांच्यावतीने ठाण्यात बाबूंराव सरनाईक प्रो गोविंदा सामना जिमनेस्टिक सेंटर येथे पार पडत आहे. प्रो गोविंदामध्ये 32 संघ सहभागी झाले आहेत. यापैकी 16 गोविंदा पथक अंतिम सामना डोममध्ये असणार आहे. मागील वर्षी जोगेश्वरी जय जवान पथक यांनी बाजी मारली होती. यंदाही जय जवान यांनी 7 थर लावले. पहिल्या फेरीमध्येच जय जवान पथकाने सर्व थर लावले. 18 ऑगस्ट रोजी अंतिम सामना मुंबई डोम येथे पार पडणार आहे.
नवी मुंबईची निर्मिती पवार साहेबांनी केली. मुंबई ठप्प झाली होती तेव्हा पवार साहेबांनी मुंबई पुन्हा सुरू केली. येथील विमानतळ पवार साहेबांनी केले. महाराष्ट्र आता अशांत व्हायला लागला आहे. काठावर असलेल्या लोकांना कुबड्या देऊन हे सरकार चालवले जात आहे. समाजा समाजात तेढ निर्माण करून सत्तेची खुर्ची गरम करणारी मंडळी महाराष्ट्राने पाहिली आहेत अशी टीका आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
राज्याची माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष समित कदम यांचे नाव घेऊन आरोप केले होते. त्याला समित कदम यांनी उत्तर दिले आहे. अनिल देशमुख हे त्यावेळी गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. त्यांनी बोलावले होते म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो असे समित कदम यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक रणनीतीकार आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत किशोर यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त पक्षाची औपचारिक घोषणा करणार आहेत.सध्या जन सुराजच्या माध्यमातून बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत.
नेमबाज मनू भाकरने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे पदक खाते उघडले. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक जिंकले. नेमबाजीत भारताने 12 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकले आहे . ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. या कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिचं अभिनंदन केलं.
A historic medal!
Well done, @realmanubhaker, for winning India’s FIRST medal at #ParisOlympics2024! Congrats for the Bronze. This success is even more special as she becomes the 1st woman to win a medal in shooting for India.
An incredible achievement!#Cheer4Bharat
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2024
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी जपानमधील टोकियो येथे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री म्हणाले की आमचा द्विपक्षीय अजेंडा सतत पुढे जात आहे. प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही व्यापक चर्चा झाली. उद्या होणाऱ्या चतुर्भुज परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यास उत्सुक आहे.
दिल्लीतील करोलबाग मेट्रो स्टेशनवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पुरामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ जुन्या राजेंद्र नगरमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुण्यात मनसे ८ जागांवर विधानसभा लढणार आहे. राज ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यंदा हडपसरमध्ये मनसेचा आमदार होईल राज ठाकरे यांनी आदेश दिला की मी निवडणूक लढवणार आहे. राज ठाकरे आज पुरस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या भाषेत ते सत्ताधारी आणि प्रशासनाचा समाचार घेतील, असं साईनाथ बाबर यांनी म्हटलं आहे.
विशाळगडावर शिवभक्तांच्या विरोधात झालेल्या कारवाईच्या विरोधात आणि शिवभक्तांच्या समर्थनात पुण्यात हिंदू संघटनांचं आंदोलन सुरु आहे. पुण्यात हिंदू जन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलंय. विशाळगडावर अतिक्रमण हटवताना झालेल्या कारवाईत हिंदू लोकांना विनाकारण त्रास दिल्याचा हिंदू संघटनांचा आरोप आहे.
उद्या ग्रामसेवकपदाची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होणार आहे. आज केंद्रावर पोहोचण्याच्या आधीच विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत. जळगावच्या विद्यार्थ्याला कोल्हापूर सेंटर देण्यात आले होते. सेंटरवर पोहोचण्याच्या पूर्वी त्याला आता कॉल आला की त्याचे सेंटर सांगली करण्यात आले आहे. ग्रामविकास विभागाच्या परीक्षेचा खेळखंडोबा झालाय. आयबीपीएस कंपनीला परीक्षेचं काम दिलं आहे.
सोलापुरात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पेन्शन आक्रोश मोर्चा सुरु आहे. सुट्टीच्या दिवशी राज्य शासनाचे कर्मचारी रस्त्यावर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी विविध सरकारी विभागातील कर्मचारी एकत्र आलेत. राज्य सरकार पेन्शन देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे गट न पडतात. सरसकट राज्य सरकार कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत जो पक्ष आम्हाला जुनी पेन्शन लागू करेल, त्याच पक्षाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मतदान करण्याचा निर्धार आहे.
धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास संस्थेच्या वतीने मुलुंड भागात आज आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला स्थानिक मुलुंडकरांचा सहभाग आहे . मुलुंड येथे जवळपास 7500 प्रकल्प बाधित घर बांधणार येणार असल्यामुळे मुलुंडकरांच्या मूलभूत सोयींवर ताण येणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
दोन वर्षांपूर्वी अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले. पण त्यापूर्वी त्यांनी काय घडामोडी घडल्या. ते कसे दिल्लीला वेष बदलून आणि नाव बदलून जात होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कशी भेट घेत होते, याचा खास किस्सा सांगितला आहे.
कृष्णा नदीची पाण्याची पातळी चाळीस फुटावर स्थिर असून सांगली कर्नाळ रोड अद्याप ही पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. सांगली ते कडेगाव पलूस तालुक्याला जोडणारा हा करणार रस्ता गेली तीन दिवस झालं नागरिकांना वाहतूक करण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांचा शपथविधी सुरु आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या सर्व विजयी उमेदवारांना शपथ देत आहेत.
पंकजा मुंडे – भाजप
योगेश टिळेकर – भाजप
अमित गोरखे – भाजप
परिणय फुके – भाजप
सदाभाऊ खोत – भाजप
भावना गवळी – शिंदे शिवसेना
कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रज्ञा सातव – काँग्रेस
11- मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष
अमित शहा यांच्या वर जो आरोप आहे ते आम्हाला बोलायला लावू नका. शरद पवार हे सत्यच बोलले आहे . अमित शहा यांच्यावर सर्व खटले मोदी सत्तेत आल्यावर काढून टाकले. तडीपारची नोटीस आणि गुजरात मध्ये येण्याची बंदी होती का नाही अमित शहा तुरुंगात होते की नाही अमित शहा यांच्यावर कुणाचा कट केला होता तो गुजरातच्या बाहेर चालवावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश होते पियुष गोयल यांनी खोटं बोलू नये लोक त्यांच्यावर हसतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
आज 28 जुलैपासून ३ ऑगस्टपर्यंत नक्षलवाद्यांचा सप्ताह आहे. नक्षल संघटना हा आठवडा साजरा करीत असते. नक्षल सप्ताहाच्या सुरुवातीला एका वरिष्ठ महिला नक्षलवाद्यांनी केले आत्मसर्पण यांनी केले. आत्मसर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यावर एकूण आठ लाख रुपयांचे बक्षीस होते. रीना नरोटे असे आत्मसमर्पण नक्षलवाद्याचे नाव असून 2005 पासून ती नक्षल चळवळीत होती.
वर्धा येथील समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला आलेल्या पुरात तीन जण अडकले… समुद्रपूरकडून लाहोरीकडे जाताना वाघाडी नदीच्या पुरात तीन जण अडकल्याची प्राथमिक माहिती… पुरात अडकलेल्यांनी झाडांचा घेतला सहारा… समुद्रपूर पोलिस घटनस्थळी दाखल… पुरात अडकलेल्यांना बचावासाठी समुद्रपूर पोलीसांकडून मदतकार्य सुरू
खडकवासला धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होणार… दुपारी तीन वाजता पाच हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जाणार… धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने होणार पाण्याचा विसर्ग… 2 दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता बंद
महाराष्ट्रात रंगमंच, नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठ-मोठे कलाकार दिले आहेत… असं वक्तव्य संजय राऊत यंनी केलं आहे.
शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे… विधानसभेनंतर शिंदे, फडणवीस, दादा नाही तर, वेगळंच नाव समोर येईल… विधानसभेनंतर सीएम म्हणून वेगळचं नाव समोर येईल – संजय राऊत
नाशिक – राष्ट्रवादीची जनसमान यात्रा आज नाशिक जिल्ह्यात
– राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात
– मंत्री छगन भुजबळांच्या येवल्यात सन्मान यात्रा सभेचे आयोजन
– सुनील तटकरे यांच्यासह रूपाली चाकणकर ,समीर भुजबळ ही राहणार उपस्थित
– यात्रेच्या निमित्ताने सुनील तटकरे दोन दिवस नाशिक दौऱ्यावर
– आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार बैठका
– जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदार संघात बैठकांचे आयोजन
Maharashtra News LIVE : विधानसभा निवडणुकी अगोदर आमदार हिरामण खोसकर यांची डोकेदुखी वाढली
इगतपुरी त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रंगणार आयात विरुद्ध स्थानिक संघर्ष….
स्थानिक भूमिपुत्रांच्या आढावा बैठकीत घेतला गेला निर्णय
आयात उमेदवार दिल्यास त्यास सर्व ताकतीनिशी पाडून बाहेरचे पार्सल परत पाठवू
कोणत्याही पक्षाने तिकीट देताना स्थानिक उमेदवारालाच तिकीट देण्याची मागणी
बैठकीत माजी आमदारांसह इगतपुरी त्रंबकेश्वर मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश
Maharashtra News LIVE : महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती, सी. पी. राधाकृष्णन नवे राज्यपाल
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती, झारखंडचे राज्यपाल स्वीकारणार पदभारhttps://t.co/iXyzZHuz10 #maharashtra #newgovernor
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2024