
महायुतीत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा बेबनाव अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. आता पुन्हा एकाच पदासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार सोपवल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत काही आलबेल नाही असे उघड झाले आहे. राज्याच्या या दोन्ही सर्वोच्च पदावरील नेत्यात त्यामुळे समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगरविकास खात्याने एकाच दिवशी एकाच पदासाठी दोन आदेश पत्रे जारी केली आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यात काही समन्वय नसल्याचे उघड झाले आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरुन श्रीनिवास सेवा निवृत्त झाले आहे. त्यामुळे या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दोघांनी निरनिरळ्या अधिकाऱ्यांना दिल्याने गोंधळ उडाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त भार अश्विनी जोशी यांच्याकडे सोपवला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य प्रशासनाने बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदाचा कार्यभार आशीष शर्मा याच्याकडे सोपवण्याचे आदेश पत्राद्वारे जारी केले. दोन्ही आदेश एकाच दिवशी जारी झाल्याने गोंधळ उडाला आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार ५ ऑगस्ट रोजी दोन विविध अधिकाऱ्यांना देण्याचे पत्र निघाल्याने नक्की कोणी हा अधिभार स्वीकारयाचा अशी पंचाईत झाली आहे. अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतभेत असल्याचे अनेकदा पुढे आले आहे. तसेच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे पुढे आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यात लक्ष घालायला सुरुवात झाल्याने हे घडल्याचे म्हटले जात आहे.
हा सर्व प्रकार एकीकडे होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे वाढल्याने ते पक्षश्रेष्टींकडून आपल्याला आशीर्वाद असल्याचे वारंवार दाखवून देत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची अनेक प्रकरणे बाहेर येऊन सुद्धा त्यांच्यावर गंडांतर न येण्यामागे पक्षश्रेष्टींचा आशीवार्द आपल्या असल्याचे शिंदे दाखवून देत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजितदादा यांचे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला तर माणिकराव कोकाटे यांचे खातेबदलावे लागल्याने शिंदेचे पारडे जड मानले जात आहे.