वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल

uddhav thackeray on sanjay jadhav : उद्धव ठाकरे यांनी परभणीत फुटीर खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव; उद्धव ठाकरे यांचा खासदार संंजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल
| Updated on: Jun 28, 2026 | 1:07 PM

उद्धव ठाकरे यांनी परभणीतील जाहीर सभेतून फुटीर खासदारांवर जोरदार निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत पाऊस आला, त्यावेळी वाघाचं कातडं पांघरलेलं हा गाढव होतं. त्यावेळी एक हात राहुल पाटील यांनी पकडला, तो हातात आहे. दुसरा पळाला. विकास करायला पळाला. विकास निधी कुणाचा. कुणाचा विकास निधी. खासगी विकास निधी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर हल्लोबाल केला.

६ खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभर दौरा आखला आहे. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे यांच्याकडून निशाणा साधला जात आहे. ठाकरेंनी परभणी येऊन खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली. लोकांच्या विकासापेक्षा स्वत:च्या खासगी विकास निधीसाठी पळाल्याची टीका ठाकरेंनी केली. फुटीर खासदारांच्या विमान प्रवासावर टीका करताना ठाकरे म्हणाले, व्हिडिओ फिरतोय तो विमानात फिरतोय. बदाम खातोय. शेतकरी असाच फिरतो. हे लगेच प्रायव्हेट विमानातून चालले. हे गाढवं. आपल्या इथला. बाजूचा. विदर्भातील. एक दलाल आहे. खरेदी विक्री कणारा. नाक्यावर उभे राहतात. तसे. जनाची मनाची नाही. लाजलज्जा शरम गुंडाळून ठेवलं. कुठून आला पैसा’.

उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे, असं मला म्हणतात. सर्वांनीच आत्मपरिक्षण केलं पाहिजे. टिकाकारानेही केली पाहिजे. आमची केस चार चार वर्ष प्रलंबित आहे. का आत्मपरिक्षण करत नाही, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

‘लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नाही. जनता आणि मतदार म्हणजे पक्ष आहे. दोन तृतियांश सभासद इकडे तिकडे गेले आणि विलीन झाले तर त्यांना कायदेशीर मान्यता मिळते का. उल्हास बापट म्हणतात, नाही. उल्हास बापट बुजुर्ग कायदेतज्ज्ञ आहेत. दोन तृतियांश प्रतिनिधी विलिनीकरणाचा निर्णय घेत नाही. कायद्याचं राज्य असेल तर ते बाद झाले पाहिजे. मला अजूनही लोकसभा अध्यक्षांवर विश्वास आहे. सुरुवात वरून झाली पाहिजे. लोकसभा अध्यक्षांनी कायदा पाळला पाहिजे. घटनेनुसार योग्य आहे ते लोकसभा अध्यक्षाने केलं पाहिजे. अधिकार आणि मर्जी यात फरक आहे. आम्ही अधिकार मानतो. मर्जी मानत नाही. त्यांना वाटत असेल सहावा आला म्हणजे झालं. ते होत नाही. कायद्याला जागणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा समज आहे. जे पदावर बसले आहेत. त्यांनी घटनेचं उल्लंघन करू नये. घटना तोडणारे अध्यक्ष म्हणून तुमची इतिहासात नोंद होऊ देऊ नका, असा जोरदार हल्लाबोल ठाकरेंनी केला.

Follow Us