AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर विश्वास नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेत यावं…; उद्धव ठाकरेंनी टोचले कान

uddhav thackeray on vishwas nangare patil : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर जाण्यावरून उद्धव ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांचे कान टोचले आहेत. यावेळी शिवसेनेच्या शाखेत येण्याचंही त्यांना आमंत्रण दिलं.

तर विश्वास नांगरे पाटलांनी शिवसेनेच्या शाखेत यावं...; उद्धव ठाकरेंनी टोचले कान
| Updated on: Jun 28, 2026 | 12:23 PM
Share

आयपीएस विश्वास नांगरे पाटील हे काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावर गेल्याने चर्चेत आले आहेत. नांगरे पाटील यांच्या आरएसएसच्या मंचावर जाण्यावरून राज ठाकरेंनी टीका केली होती. तर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नांगरे पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. आता या चर्चेवर उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी आता शिवसेनेच्या शाखेत यावं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कान टोचले.

उद्धव ठाकरे यांनी परभणीतील पत्रकार परिषदेत राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आयपीएस नांगरे पाटील यांचेही कान टोचले. चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी शिवसेनेच्या शाखेत यावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वल्लभभाई पटेल यांनी बंदी आणली होती. चंद्रकांत पाटील यांना इतिहास सांगावा लागेल. हे म्हणतात सरदार पटेल यांना पंतप्रधान करायला हवं होतं. पटेल खरंच पंतप्रधान हवे होते. कारण त्यांनी संघावर बंदी आणली होती’.

एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जो शिवसेनेशी इमान राखू शकत नाही, तो देवेंद्र फडणवीस यांच्याशीही इमान राखू शकत नाही’ . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ठाकरे म्हणाले, ‘ मी कर्जमुक्ती दिली होती. यांनी कर्जमाफी दिली आहे. माफी ही गुन्हेगाराला दिली जाते. शेतकऱ्यांना नाही. शेतकरी अन्नदाता आहे. त्याचं आपल्यावर ऋण आहे. कोणतीही अट न टाकता मी दोन लाखापर्यंतचं पीक कर्ज मुक्त केलं होतं. दोनच वेळा सेवा केंद्रावर गेल्यावर थेट खात्यात पैसे गेले होते. करोना सुरु झाला. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार देणार होतो. कोरोनामुळे झालं नाही, पण जेव्हा द्यायला सुरु केली, तेव्हा यांनी सरकार पाडलं’.

ठाकरेंनी यावेळी महाविकास आघाडीवरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘इंडिया आघाडीच्या बैठकीत मी ऑनलाईन होतो. लोकसभेनंतर आपण भेटतो. या बैठका वारंवार झाल्या पाहिजे. शिवसेना आणि भाजपची युती २५ वर्ष टिकली. त्यासाठी तळागाळातील कार्यकर्ता उभा राहिला होता. महाविकास आघाडी टिकवायची असेल तर एका पक्षाची जबाबदारी नाही. सर्वांची आहे. तसेच सर्वांचे कार्यकर्ते एकजूटीने कामाला लागले पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. मविआत स्थानिक पातळीवर एक वाक्यता पाहिजे’.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत