AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात; बड्या नेत्याचं मोठं भाकीत

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात असं भाकीत महायुतीमधील बड्या नेत्यानं वर्तवलं आहे, यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात; बड्या नेत्याचं मोठं भाकीत
| Updated on: Jul 20, 2025 | 5:21 PM
Share

पाच जुलैला विजयी मेळावा झाला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर आले. दरम्यान त्याननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होऊ शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक? 

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती होऊ शकते अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे, ही चर्चा सुरू असतानाच आता प्रताप सरनाईक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जसे एकत्र आले तसे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य सरनाईक यांनी केलं आहे, सरनाईक यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आमदारांचे वादग्रस्त व्हिडीओ समोर येत आहेत.  यावर देखील प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आमच्या पक्षातील आमदारांकडून काही विधानं करण्यात आले, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते, शिंदेंनी आमदारांना सक्त सूचना देखील दिल्या आहेत. आमच्याच आमदारांच्या तक्रारी आहेत असं नाही, सगळ्याच पक्षातील आमदार बोलतात, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता, जादूटोणा करून आमदार निवडून आले असं त्यांनी म्हटलं, त्यावर देखील सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  तुमचे आमदार निवडून आले हे काय जादूटोणा न करता आले? आणि आमचे जादूटोणा करून आले का? तुमचे लोकसभेला खासदार जादूटोणा करूनच निवडून आले होते  का? असा सवाल सरनाईक यांनी यावेळी केला.  एकनाथ शिंदे शिवसेनेचे ब्रँड आहेत. आमच्या पक्षाचा ब्रँड म्हणजे एकनाथ शिंदे, असंही यावेळी सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं