अखरे ठाकरेंनी तो मोठा निर्णय घेतलाच, खासदार फुटीच्या चर्चेनंतर उचललं मोठं पाऊल, येत्या 22 तारखेला…

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार लवकरच आपला नवा गट स्थापन करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी मोठे पाऊल उचलले आहे.

अखरे ठाकरेंनी तो मोठा निर्णय घेतलाच, खासदार फुटीच्या चर्चेनंतर उचललं मोठं पाऊल, येत्या 22 तारखेला...
uddhav thackeray shiv sena mla meeting
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2026 | 6:15 PM

UBT MLA Meeting : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात मोठं बंड होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार थेट आपला वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. ही शक्यता खरी ठरली तर खासदारांचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे हे संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. असे असतानाच आता ठाकरे यांच्या पक्षाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार हे लवकरच आपला वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी हे खासदार लवकरच लोकसभा अध्यक्षांना भेटून त्याबाबत एक पत्र देऊ शकतात. दुसरीकडे ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय?

दुसरीकडे हे खासदार लवकरच वेगळा गट स्थापन करणार असल्याचे सांगितले जात असतानाच ठाकरे यांनी 14 जून रोजी आपल्या सर्व 9 खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला एकूण 5 खासदार अनुपस्थित होते. चार खासदार हे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते. परंतु उर्वरित पाच खासदार हे ऑनलाईन पद्धतीने बैठकीला हजर होते, असे ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते.

ठाकरे यांनी नेमका काय निर्णय घेतला?

दरम्यान, आता खासदार फुटीच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक येत्या 22 जून रोजी होणार आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शिवालयमध्ये दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आपल्या आमदारांमधील एकजूट दिसावी तसेच पक्षाबाबत मार्गदर्शन करता यावे, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता या बैठकीत नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us