उद्धव ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा, म्हणाले एकनाथ शिंदे यांना पाच फोन केले तरी…

| Updated on: Feb 28, 2023 | 7:26 PM

माझ्या आयुष्यात शिवसेना पक्ष सोडण्याची वेळ माझ्यावर आणण्यात आली. त्यावेळी मी दुसऱ्या पक्षात गेलो. पण, त्यावेळी पक्ष सोडल्याच्या ज्या वेदना होत होत्या त्या कुणी जाणू शकणार नाही.

उद्धव ठाकरे गटाच्या या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले एकनाथ शिंदे यांना पाच फोन केले तरी...
CM EKNATH SHINDE AND UDDHAV THACKAREY
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट करून गुवाहाटी येथे गेले. त्यावेळी मला तुमच्यासोबत घ्या, तुमच्या गटात सामील करून घ्या असे निवेदन उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी दिले होते. त्यांनी एकनाथ शिंदे याना १०० वेळा फोन केले होते. पण, भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना घेतले नाही, असा मोठा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता. त्याला भास्कर जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

विधान भवनात पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, माझ्या आयुष्यात शिवसेना पक्ष सोडण्याची वेळ माझ्यावर आणण्यात आली. त्यावेळी मी दुसऱ्या पक्षात गेलो. पण, त्यावेळी पक्ष सोडल्याच्या ज्या वेदना होत होत्या त्या कुणी जाणू शकणार नाही. त्या वेदना माझ्या मनात जरूर आहेत. पण, माझ्या राजकारणाकरीता मी कुणाच्याही दरवाजात जाऊन उभा राहिलेलो नाही. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्या दारात कशाला जाऊन उभा राहू ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

भाजप नेते म्हणून जे कुणी मोहित कम्बोज की मोहित भारतीय आहेत त्यांना मी कधीही पाहिलेले नाही. मी एक सामान्य माणूस आहे. तत्वासाठी, ध्येयाकरता आणि एक भूमिका घेऊन लढणारा माणूस आहे.

तुमचे सरकार आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे इडी, एनआयए, सीबीआय, एसीबी आहे आणि सत्तेची मस्ती देखील आहे. सर्व तपास यंत्रणांना माझी चौकशी करायला सांगा पण मी माझ्या मतांवर ठाम आहे असे सांगितले.

तुम्ही कोणत्याही तपास यंत्रणेमार्फत माझी चौकशी करा. चौकशीत माझ्यावर एक जरी आरोप सिद्ध झाला तर मी राजकिय जीवनातून मुक्त होईन. एकनाथ शिंदे यांना १०० सोडा अगदी पाच वेळा जरी फोन केला असेल तरी मी माझ्या राजकिय जीवनातून मुक्त होईन, असे आव्हान त्यांनी दिले.

आधी जी चूक केली होती तशी चूक पुन्हा होणार नाही. मी माझ्या पक्षासोबत, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रामाणिक आहे असेही त्यांनी ठणकावून सांगितले.