जवळ जाऊन बसले, धीर देत म्हणाले जोपर्यंत…उद्धव ठाकरेंकडून पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट, काय आश्वासन दिलं?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगत गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं ठाकरे यांनी पूर्णेकरांच्या कुटुंबीयांना सांगितलंय.

जवळ जाऊन बसले, धीर देत म्हणाले जोपर्यंत...उद्धव ठाकरेंकडून पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट, काय आश्वासन दिलं?
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 2:59 PM

Pradip Purnekar Case : ठाण्यातील ठाकरे गटाची कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घनटेने महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शिंदे गटाच्या मिनाक्षी शिंदे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात आहे. या हत्येमागे मिनाक्षी शिंदे यांचाच हात आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. हे सर्व आरोप शिंदे यांनी फेटाळले आहेत. दरम्यान, काल (30 सप्टेंबर) आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी  पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना दिले.

राम पुर्णेकर यांच्यासोबत संवाद साधला

उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत आम्ही पूर्णेकरांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मिलिंद नार्वेकर, राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव हे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर यांच्यासोबत संवाद साधला. या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल झाली पाहिजे. मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचाही त्यात उल्लेख हवा. संजय राऊत आल्यामुळे FIRमध्ये त्यांच नाव आलं. अगोदर ते नाव घेत नव्हते, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

Loading...

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी

या प्रकरणातील आरोपांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच या घटनेत लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे. पूर्णेकर कुटुंबाला योग्य नाय मिळवून देणार, असे आश्वासनही यावेळी ठाकरे यांनी दिले. या संवादात पूर्णेकर कुटुंबीयांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित असताना न्याय हवा अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच पूर्णेकर अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या.

2 दुचाकी, 4 जण ताब्यात, चौकशी सुरू

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाणे क्राइम ब्रँचकडून 2 दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 2 महिला आणि 2 पुरुष चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. हे चौघे फरार आरोपी आणि अटक आरोपीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जातेय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us