उद्धव ठाकरेंची डिलिमिटेशनवरून मोठी खेळी! 6 बंडखोर खासदारांची झोप उडाली, मोदी सरकारचंही टेन्शन वाढणार

डिलिमिटेशन विधेयकावरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच मतदारसंघ पुनर्रचनेवर प्रश्न उपस्थित केले. सहा खासदार शिंदे गटात गेले असले तरी नऊ खासदारांना व्हीप बजावल्याचा दावा त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंची डिलिमिटेशनवरून मोठी खेळी! 6 बंडखोर खासदारांची झोप उडाली, मोदी सरकारचंही टेन्शन वाढणार
Uddhav Thackeray Delimitation Bill
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 4:47 PM

महिलांच्या नावाखाली घाणेरडं राजकारण सुरु आहे. देशहिताचा विचार करुन या बिलाला विरोध केला पाहिजे. मतदारसंघ पुनर्रचना कशी करणार, कोणत्या आधारे करणार, महिला विधेयकाला आम्ही आधीच पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या हितापेक्षा आपण देशहिताला पाठिंबा देत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेतून ठाकरेंनी मोठी खेळी केल्याचंही समोर आलं आहे. पक्षातील बंडखोर खासदारांनाही आपण व्हीप बजावला असल्याचं समोर आलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेतून 9 खासदारांना व्हीप बजावला आहे, असा पुनरुच्चार केला आहे. ठाकरे गटाच्या 9 खासदारापैंकी 6 जणांनी आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ठाकरेंकडे तीनच खासदार आहेत, असं असताना त्यांनी 9 खासदारांना व्हीप बजावला आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता मोदी सरकारचं टेन्शन वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय म्हणाले ठाकरे?

आम्ही आमच्या 9 खासदारांना व्हीप जारी केलाय, पक्षादेश दिला आहे. मतदान कसं करायचं ते त्यांना सांगितलं आहे.त्याप्रमाणे ते मतदान करतीलच पण आणखी एक गोष्ट अशी आहे की, जागावाढ केली पाहिजे, मग तसा मुंबई महापालिकेचा विचार केला. तर आधी १७० होती, आता २२७ आहे. लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी वाढले पाहिजे, हे समजू शकतो, आम्ही २३६ केले होते.निवडणूक आयोगानेही त्याला मान्यता दिली होती. पण यांनी सरकार पाडलं, ते सर्व पुसून टाकलं, २०१७ च्या जागावाढानुसार सीमाकनानुसार निवडणूक घेतली. ही त्यांनी रंगीत तालिम त्यांनी केली. मुंबई महापालिका जिंकली, तसं आता हे उघड उघड विरोधी पक्षाचा मतदार कापणार आणि जिंकून येणार, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Loading...

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने बजावलेला व्हीप हा न मानल्यास म्हणजेच पक्षविरोधी भूमिका घेणे आणि डिलिमिटेशन बीलाच्या बाजूने संसदेत मतदान केल्यास हे खासदार परिच्छेद 2(1)b नुसार अपात्र ठरतील, असं वकील असिम सरोदे यांनीही म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सहा खासदारांनी डिलिमिटेशन बिलाच्या विरोधात मतदान करावे, अशी स्पष्ट सूचना देणारा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतंय याकडे लक्ष लागलेलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us