Shivsena UBT News: उद्धव ठाकरे गटाकडून खासदारांना जारी केलेल्या व्हीपमध्ये थेट इशारा, पण डिलिमिटेशनवर अजून भूमिका ठरलेली नाही,

२९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीत संसदीय पक्षाची दिल्लीत बैठक होणार आहे.  सर्व लोकसभा खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे अनिवार्य आदेश देण्यात आले आहेत.  या बैठकीमध्ये १३२ वी घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होणार आहे. 

Shivsena UBT News: उद्धव ठाकरे गटाकडून खासदारांना जारी केलेल्या व्हीपमध्ये थेट इशारा, पण डिलिमिटेशनवर अजून भूमिका ठरलेली नाही,
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 28, 2026 | 10:08 PM

Shivsena UBT News:  केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडले जाणार असून भाजपने या विधेयकाला मंजुरी मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. दुसरीकडे राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या विधेयकाला जोरदार विरोध केला आहे. एकीकडे ठाकरेंची या विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट झालेली नसतानाच आता पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदारांसाठी व्हिप जारी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभेतील खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे.  २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दिल्लीत संसदीय पक्षाची दिल्लीत बैठक होणार आहे.  सर्व लोकसभा खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे अनिवार्य आदेश देण्यात आले आहेत.  या बैठकीमध्ये १३२ वी घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होणार आहे.

Loading...

३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.  दोन्ही विधेयकांबाबत पक्षाची भूमिका आणि रणनीती ठरणार आहे.  बैठकीला अनुपस्थित राहण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  व्हीपचे उल्लंघन करणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्याकडून तीन ओळींचा व्हीप जारी करण्यात आला आहे.

संजय राऊत यांचा विरोध, राष्ट्रवादीला सुनावले!

शिवसेना ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाविरोधात थेट भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. यावरुनच संजय राऊत यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे महाराष्ट्रद्रोही, राष्ट्रद्रोही विधेयक असल्याचे सांगत या विधेयकायाला पाठिंबा देणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे ते म्हणालेत. तसेच भविष्यात आम्ही राष्ट्रवादीला धडा शिकवू असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, या विधेयकाला पाठिंबा दिल्यावरुन संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला होता. “तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी तुम्ही अनिल देशमुखांची माफी मागितली पाहिजे. भाजप आणि शहामुळे ते तुरुंगात गेले. तुम्ही नवाब मलिक यांचीही माफी मागितली पाहिजे. तेव्हा मलिक महत्त्वाचे नेते होते. हे दोन्ही नेते अमित शाह आणि मोदींच्या प्रवृत्तींविरोधात लढत होते. त्यांच्यामुळे या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावे लागले, असं संजय राऊत म्हणालेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us