Dawood Ibrahim : कोण होता हा फकीर इस्लाम बाबा ज्याला दाऊद इब्राहिम खूप मानायचा, त्याच्या परवानगीनंतरच प्रत्येक काम करायचा
Dawood Ibrahim : मुस्लिम राजे, सम्राट खासकरुन एखाद्या फकीराला मानायचे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं आयुष्य, त्याच्या नेटवर्क बद्दल अशीच एक गोष्ट समोर आली आहे. दाऊद इब्राहिम सुद्धा एका फकिराला विशेष मानायचा.

आपण आतापर्यंत अशा अनेक कथा ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत किंवा असे चित्रपट पाहिजे आहेत, ज्यात एखादा राजा कुठलही मोठं काम करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घेतो. हा ज्योतिष मग राजघराण्याचा गुरु किंवा फकीर असतो. मुस्लिम राजे, सम्राट खासकरुन एखाद्या फकीराला मानायचे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं आयुष्य, त्याच्या नेटवर्क बद्दल अशीच एक गोष्ट समोर आली आहे. माजी FBI एजंट कमरान फरीदी यांनी दाऊद बद्दल असाच दावा केला आहे. कमरान फरीदीनुसार, दाऊद इब्राहिमचा इस्लाम बाबा नावाच्या फकीरावर भरपूर विश्वास होता. दाऊद आणि त्याच्या डी कंपनीचे लोक कुठलही मोठं काम करण्यापूर्वी इस्लाम बाबाची परवानगी घ्यायचे. बाबाने परवानगी दिली तरच ते पुढे पाऊल टाकायचे.
कमरान फरीदीनुसार हा इस्लाम बाबा मूळचा मुंबईच्या डोंगरी भागात रहायचा. दाऊद इब्राहिम त्याची डी कंपनी दुबई, पाकिस्तानमध्ये गेली तरी त्याचा या इस्लाम बाबाशी संपर्क कायम होता. दाऊदने नंतर या इस्लाम बाबाला पाकिस्तानला बोलवून घेतलं. आपल्या घराजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. इस्लाम बाबाचं भारत-पाकिस्तान दोन्ही ठिकाणी भरपूर नावं होतं, असं फरीदीने सांगितलं. काही काळापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
रात्री कुठल्या कामासाठी जायचं असेल तर तो..
दाऊद इब्राहिम हा इस्लाम बाबा जे सांगायचा त्यावर विश्वास ठेवायचा. दाऊदला रात्री कुठल्या कामासाठी जायचं असेल तर तो आधी बाबाला विचारायचा. बाबाने मनाई केली तर दाऊद ती भेट रद्द करायचा. फरीदीनुसार डी कंपनीचे दुसरे सदस्य सुद्धा बाबाचा आदेश अशाच प्रकारे मानायचे. बाबाने एखाद्याला नाश्त्यामध्ये अंड खाऊ नको असं सांगितलं, तर ते अंड सुद्धा नाही खायचे.
दाऊदच्या पार्टीमध्ये सुद्धा जायचो
कमरान फरीदी FBI साठी पाकिस्तानातील दाऊदच्या नेटवर्क मध्ये घुसला व अंडरकवर म्हणून काम केलं. यावेळी तो दाऊदला अनेकदा भेटला. त्याला जवळून बघितलं. दाऊदच्या पार्टीमध्ये सुद्धा जायचो असा दावा फरीदीने केला.
इस्लाम बाबापर्यंत कधी पोहोचू शकले नाहीत
इस्लाम बाबापर्यंत काहीही करुन पोहोचायचं हा कमरान फरीदी यांचा प्रयत्न होता. त्याला ताब्यात घेऊन दाऊदवर दबाव टाकायचा अशी FBI ची रणनिती होती. बाबाच्या माध्यमातून दाऊद आणि त्याच्या नेटवर्कवर प्रभाव टाकता येईल अशी प्लानिंग होती. पण फरीदी इस्लाम बाबापर्यंत कधी पोहोचू शकले नाहीत.
फतवा कोणी जारी केलेला?
दाऊदचा पुतण्या अनसीच्या मुलाने कथितरित्या विचारलं होतं की, मुंबईत बॉम्ब स्फोटांसाठी फतवा कोणी जारी केलेला?. फरीदीच्या मते डी-कंपनीमध्ये कुठलही मोठं ऑपरेशन इस्लाम बाबाच्या मंजुरीशिवाय शक्य नव्हतं. 1993 बॉम्ब ब्लास्टसाठी सुद्धा बाबाची परवानगी घेतली होती असं बोललं जातं.