Amit Shah Maharashtra Visit: ‘गोुकळ’च्या संघर्षानंतर अमित शाह महाराष्ट्रात! कसा असेल 2 दिवसांचा दौरा? वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, गोकुळ दूध संघ निवडणुकीत झालेल्या नाट्यमय राडा अन् त्यानंतर महायुतीने उधळलेला गुलाल.. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Amit Shah Maharashtra Visit: गोुकळच्या संघर्षानंतर अमित शाह महाराष्ट्रात! कसा असेल 2 दिवसांचा दौरा? वाचा सविस्तर
Image Credit source: Google
| Updated on: Nov 13, 2026 | 5:28 PM

Amit Shah Maharashtra Tour:  केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, गोकुळ दूध संघ निवडणुकीत झालेल्या नाट्यमय राडा अन् त्यानंतर महायुतीने उधळलेला गुलाल.. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. नेमका कसा असेल अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा? जाणून घ्या.

कसा असेल अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा? 

Loading...

समोर आलेल्या माहितीनुसार,  केंद्रीय गृृहमंत्री अमित शाह १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात पुण्यात त्यांच्या उपस्थितीत विविध महत्त्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. उद्योग क्षेत्रातील भेटीपासून सहकार क्षेत्रातील उपक्रम, ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ, तसेच दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘मराठा इतिहास – डिजिटल आर्काइव्ह’च्या लोकार्पणाचा समावेश त्यांच्या दौऱ्यात आहे.

15 नोव्हेंबरला अमित शाह पुण्यातील मुंढवा परिसरातील भारत फोर्ज लिमिटेडला भेट देणार आहेत. दुपारी एक वाजता भारत फोर्ज लिमिटेडच्या मुंढवा औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पाला ते भेट देतील. यानंतर दुपारी ३.१५ वाजता तळेगाव दाभाडे येथील मुंबई-पुणे महामार्गावरील NHEC प्रकल्पात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. यावेळी ‘NHEC’ मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे भूमिपूजन, केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाच्या प्रादेशिक कार्यालयाचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात महाराष्ट्रासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेचा अधिकृत शुभारंभ अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे.

16 नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता अमित शाह भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयाला आणि शांतीलाल मुत्था फाउंडेशनच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. सेनापती बापट मार्गावरील भारतीय जैन संघटनेच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सकाळी ११.३० वाजता जिल्हा परिषद कार्यालय, यशवंतराव चव्हाण भवन येथे दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता अमित शाह भारत इतिहास संशोधक मंडळाला भेट देणार असून, यावेळी ‘मराठा इतिहास – डिजिटल आर्काइव्ह’चे लाँच करण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us