AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Juhi Chawla : हवेत जळालेल्या इंधनाचा वास, जुही चावलानं प्रदूषणावर व्यक्त केला संताप, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले, अच्छे दिन…

मुंबईत दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात प्रदुषणात वाढ झाली आहे. त्यातच अभिनेत्री जुही चावला हिने तिला मुंबईत येणाऱ्या एका विचित्र वासाबद्दल पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टमुळे मुंबईकरांमध्ये त्या वासाबद्दल कुतुहल निर्माण झाली आहे.

Juhi Chawla : हवेत जळालेल्या इंधनाचा वास, जुही चावलानं प्रदूषणावर व्यक्त केला संताप, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी, म्हणाले, अच्छे दिन...
JUHI CHAVLA Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 13, 2026 | 5:22 PM
Share

मुंबईकरांना सध्या हवेच्या प्रदुषणाचा त्राल सहन करावा लागत आहे. दिवाळीनंतर शहरातील हवेची गुणवत्ता खाल्यावल्याची चर्चा सुरू असतानाच आता मुंबईच्या हवेत एक विचित्र वास देखील पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेत जळक्या इंधनासारखा वास येत आहे. अशी पोस्ट जुही चावला यांनी केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे मुंबईकरांमध्येही या वासाबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

जुही चावला  नेमकं काय बोलली?

जुही चावला हिने 12 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली. त्यात तिने लिहिलं आहे की, हवेत हाँ विचित्र जळक्या इंधनाचा वास नेमका कशामुळे येतोय, हे कोणीतरी सांगू शकेल का? हाँ वास रॉकेल किंना डिझेल जळल्यासारखा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वास मला येतोय. दिवसभर हा वास येत असतो. तुम्हालाही हा वास जाणवतोय का? असा प्रश्नही जूहीने मुंबईकरांना विचारला आहे.

जुही चावला हिने हा प्रश्न उपस्थित केला, त्याचवेळी मुंबईतील वायुप्रदुषणाचा मुद्दा देखील चर्चेत आहे. दिवाळीनंतर शहरातील हवेची गुणवत्ता खालावली होती. 9 नोव्हेंबर मुंबईची हवा गुणवत्ता निर्देशांक AQI 171 होता. तर मागील वर्षी हा आकडा 134 वर होता. शहरातील आठ हवा गुणवत्ता मोजणी केंद्रावर हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवण्यात आली होती.

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्येही वाढ झाली. 6 ते 9 नोव्हेंबर दरम्यान मुंबई अग्निशमन दलाला एकूण 282 आगीसंबंधीचे कॉल आले, त्यापैकी 200 कॉल फटाक्यांशी संबंधित होते. 8 नोव्हेंबर रोजी तर एका दिवसात 142 कॉलपैकी 137 कॉल फटाक्यांमुळे लागलेल्या आगीचे होते. दरम्यान जुही चावला हिने सांगितलेल्या विचित्र वासाचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हा वास प्रदुषणामुळेच येत आहे,असंही निश्चित झालेलं नाही.

नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

जुही चावलाने ही पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांचा त्यावर संताप पाहायला मिळत आहे. कोणी म्हणतंय की विकास रोस्ट होतोय मॅडम, हे प्रदुषण आहे तर दुसऱ्याने म्हटलंय की हा मोदी करत असलेल्या विकासाचा वास आहे. तर तिसऱ्याने लिहिलंय की तुम्ही जर याविरोधात काही बोलू शकत नसाल तर गप्प् बसा हा तुम्हाला हव्या असणाऱ्या अच्छे दिनचा वास आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप