वेळ ठरली, आदेश आला! शिंदे गटात हालचाली वाढल्या, सर्व खासदारांना.. पक्षात मोठं काहीतरी घडणार?
शिवसेना शिंदे गटाने तातडीची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. खासदार आणि आमदारांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले. या बैठकीत नक्की काय निर्णय होणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

शिवसेना शिंदे गटाने राज्यात ऑपरेशन टायगर राबवले. याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फोडले. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. स्वतंत्र गट स्थापन केला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून विस्तार केला जाणार आहे, तश्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांपैकी दोघांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळू शकते, असे सांगितले जातंय. त्यातच काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचारी सुरू आहेत. पावसाळी अधिवेशनातच हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात हा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला.
त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने तातडीची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी नंदनवनवर शिवसेनेची तातडीची बैठक आहे. संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील आजी माजी आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात ही महत्त्वपूर्ण बैठक आहे. आता या बैठकीकडे सर्वांच्या नजरा या लागल्या आहेत.
बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील भविष्यातल्या जेनझीं मतदारांवर लक्षात ठेवून त्याबद्दलच्या सूचना देण्यात येण्याची शक्यता आहे. ही अत्यंत तातडीने बोलावण्यात आलेली बैठक असल्याचे सांगितले जातंय.
शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले 6 खासदार देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील आमदारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रिपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याचीही तूफान चर्चा ही रंगताना दिसत आहे.