वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घराची झडती, हाती काय लागलं?

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, पोलिसांकडून निलेश चव्हाणाच्या घराची झडती सुरू आहे. त्याला घेऊन पोलीस त्याच्या कर्वे नगरमधील घरी दाखल झाले आहेत.

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून निलेश चव्हाणच्या घराची झडती, हाती काय लागलं?
Nilesh Chavan and Vaishnavi Hagawane
Image Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2025 | 6:43 PM

पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती, तीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे, या प्रकरणात पोलिसांनी तीचा पती, सासरा, सासू, दीर आणि नणंद यांना अटक केली आहे. वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद हे न्यायालयीन कोठडीत आहेत, तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान याच प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता.

अखेर निलेश चव्हाण यांला पोलिसांनी नेपाळमधून शुक्रवारी अटक केली.  त्यानंतर आता निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरमधील घराची झडती पोलीस घेणार आहेत. निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरमधील घराची झडती घेण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस त्याला घेऊन त्याच्या घरी दाखल झाले आहेत. निलेश चव्हाणकडे असलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याच्या घराची झडती सुरू आहे. वैष्णवी हगवणे हिची सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल निलेश चव्हाणकडे असून,  ते जप्त करण्यासाठी पोलिसांकडून आता निलेश चव्हाण याच्या घराची झडती सुरू आहे.

काय आहे निलेश चव्हाणवर आरोप 

निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे, वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाण यांच्याकडे होतं, हे बाळ आणण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे, तसेच वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आधी पुण्याहून रायगडला पोहोचला, तेथून बायरोड त्याने दिल्ली गाठली. दिल्लीहून तो गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये पोहोचला. तेथून त्याने भारताची बॉर्डर क्रॉस केली आणि नेपाळला पोहोचला. तीने ते चार दिवस तो नोपाळ आणि भारत बॉर्डर भागातच होता. त्यानंतर तो भाताच्या हद्दीमध्ये येताच पोलिसांनी त्याला अटक केलं. दरम्यान वैष्णवीची सासू लता हगवणे आणि तिची नणंद करिष्मा हगवणे यांचा मोबाईल निलेश चव्हाणकडे आहे, हा मोबाईल जप्त करण्यासाठी पोलिसांकडून त्याच्या घराची झडती सुरू आहे.