व्हॅलेंटाईन डेची संधी, मतदारांनी लिहिली नेत्यांना चिठ्ठी, दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट

| Updated on: Feb 14, 2023 | 3:44 PM

मतदार राजाने आपल्या मनातील भावना व्हॅलेंटाईन डे ला व्यक्त केल्या आहेत. त्यासाठी मतपेटीत चिठ्ठी टाकली गेली आहे. या सर्व चिठ्ठ्या मतपेटी उघडल्यावर समोर आल्या आहेत.

व्हॅलेंटाईन डेची संधी, मतदारांनी लिहिली नेत्यांना चिठ्ठी, दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट
कोल्हापूर कारखाना निवडणूक
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

कोल्हापूर : जगभरात 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे (valentine day) तरुणाईंकडून जल्लोषात साजरा केला जातो. प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीला मनातील भावना कळवत असतो. मग त्यासाठी वेगवेगळे माध्यम वापरतो. आता हायटेकच्या युगात मोबाईलवर प्रेमळ संदेश पाठवला जातो. चिठ्ठी लिहून आपल्या मनातील भावना कळवली जाते. या दिवसाचा वापर करत मतदार राजाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. त्यासाठी मतपेटीत चिठ्ठी टाकली गेली आहे. या सर्व चिठ्ठ्या मतपेटी उघडल्यावर समोर आल्या आहेत. त्यानंतर त्याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. लोकशाही असली तरी उघडपणे मत व्यक्त करता येत नाही, मग त्यासाठी चिठ्ठीचा आधार मतदार राजाने घेतला आहे.

कुंभी कासारी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा येथे सध्या पणाला लागली आहे. कुंभी कासारी सहकारी कारखान्यात सध्या चंद्रदीप नरके यांची सत्ता होती. मात्र यंदा ही सत्ता हलवण्यासाठी आमदार पी. एन. पाटील यांनी देखील जोर लावला. यामुळे या निवडणुकीत चंद्रदीप तडके आणि पी. एन. पाटील या दोघांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती. जोरदार प्रचारामुळे यंदा मतदानाचा आकडा देखील वाढला. करवीर पन्हाळसह पाच तालुक्यातील 105 मतदान केंद्रावर ८२.४५ % मतदान झाले.

हे सुद्धा वाचा

व्हॅलेंटाईन डेला चिठ्ठ्या

कोल्हापूर कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी रमणमळा इथल्या शासकीय धान्य गोदामात सुरवात झाली. मतपेट्या उघडल्या आणि मतपत्रिकांबरोबर आपल्या नेत्यासाठी लिहिलेल्या चिठ्ठ्या देखील सापडल्या आहेत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आज जगभरात साजरा होत आहे. मग या निमित्ताने अनेक मतदारांनी आपल्या नेत्याला चिठ्या लिहिल्या आहेत.

काय म्हटले चिठ्ठ्यांमध्ये

साहेबांचे समर्थक, एक्स वाय झेड, अशा नावांनी चिठ्ठी लिहिली गेली आहे. नेत्याला सल्ला आणि विरोधकांना मेसेज त्यात लिहिले आहे. चिठ्ठ्यांमध्ये मतदारांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या विरोधकांना चिमटे देखील दिले आहेत.

“चंद्रदीप नरके यांची कारखाना चालवायची व सभासदांप्रती असलेली तळमळ विरोधी नेत्यांना नाही हे लोकांना माहीत आहे”.,

“पुढाऱ्यांनो सत्ता येते अन् जाते सर्वसामान्यांना त्रास देऊ नका, या राज्यात किती आले आणि गेले. तुम्ही ही कायमचे टिकणार नाही…

मागे काय घडले विसरू नका…दुसऱ्याला त्रास दिला की पुढचे दिवस वाईट… जैसे करनी वैसे भरीनी”

या पद्धतीचे अनेक प्रकारचे पत्र या मतदान पेटीत मिळत आहे. देशात लोकशाही असले तरी अनेक जण आपले मत उघडपणे व्यक्त करू शकत नाहीत. मात्र या निवडणुकीत मतदान पेटीद्वारे आपले मनातील भाव अनेक मतदारांनी समोर आणले आहे.