नायजेरियावरून आला, साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक बनला, घराची झडती घेताच पोलीस हादरले

वसईच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका नायजेरीयन नागरीकाकडून तब्बल २२ किलो ८६५ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन ड्रग्स आणि ४८ ग्रॅम कोकेन असा ११ कोटी ५८ लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

नायजेरियावरून आला, साऊथ चित्रपटांमध्ये खलनायक बनला, घराची झडती घेताच पोलीस हादरले
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 07, 2025 | 7:37 PM

मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत. आमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे, मात्र तरी देखील अशा प्रकरणाला अजूनही पूर्णपणे आळा बसला नसल्याचं चित्र आहे. अमली पदार्थांची तस्करी सुरूच आहे. वसईमध्ये गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 11 कोटी 58 लाख रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वसईच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका नायजेरीयन नागरीकाकडून तब्बल २२ किलो ८६५ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन ड्रग्स आणि ४८ ग्रॅम कोकेन असा ११ कोटी ५८ लाखांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा चित्रपटांमध्ये देखील काम करत असल्याचं समोर आलं आहे.  त्याने काही हिंदी सिरिअल आणि चित्रपटांमध्ये तसेच काही साऊथ चित्रपटांमध्ये छोटीशी खलनायकाची भूमिका केल्याची माहिती समोर येत आहे.

५ एप्रिल रोजी  राञी १२.१० वाजता वसईच्या गुन्हे शाखा २ च्या युनिटला एव्हरशाईन सिटी येथे व्हिक्टर नावाच्या परदेशी नागरीकाकडे ड्रग्स असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली.

गुन्हे शाखा २ च्या युनिटने त्याच्या घरची झडती घेतल्यावर, त्याच्या घरी ४८ ग्रॅम वजनाचे कोकेन मिळून आले. त्याचसोबत  वरच्या रुमची चावी ही त्याच्या रुममधून पोलिसांना मिळाली. त्या घराची झडती घेतल्यावर तीथे पोलिसांना तब्बल २२ किलो ८६५ ग्रॅम वजनाचे एम.डी. ड्रग्स मिळालं आहे, तसेच ड्रग्स बनवण्यासाठी वापरण्यात येणारं केमिकल देखील मिळून आलं, आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे, या प्रकरणात आणखी कोणी आहे का? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनं खळबळ 

या घटनेनं खळबळ उडाली आहे, पोलिसांनी तब्बल  २२ किलो ८६५ ग्रॅम वजनाचे एम.डी. ड्रग्स जप्त केलं आहे, ज्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.