
गेल्या काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता थेट ग्राहकांना बसला आहे. सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फरसबी, शेवग्याच्या शेंगा, गवार आणि मटार यांसारख्या भाज्यांची किंमत शंभरी पार गेली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्या या शंभरी पार गेल्या आहेत. यामुळे गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. सध्या लाल भोपळ्याव्यतिरिक्त इतर अनेक भाज्यांचे दर ५० रुपयांपेक्षा जास्त आहेत. यामुळे दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे दरात वाढ झाली आहे.
फरसबी: १६० रुपये
गवार: १६० रुपये
तोडली: १६० रुपये
पापडी: १२० रुपये
मटार: १६० रुपये
शिमला मिरची: १६० रुपये
भेंडी: ८० रुपये
बीट: ६० रुपये
लिंबू: २० रुपयाला ३ नग
तर दुसरीकडे गोकुळ दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार, पुणे आणि मुंबईत म्हशीचे दूध प्रतिलिटर ७४ रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रात ६८ रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे. तसेच गायीच्या दुधातही २ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यात ५८ रुपये आणि उर्वरित राज्यात ५० रुपये प्रतिलिटर दर पाहायला मिळत आहेत.
एवढंच नाही तर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा आर्थिक झटका बसला आहे. बेस्ट प्रशासनाने बसचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च महागला आहे. दरम्यान वाढलेली महागाई आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर खर्चाचा ताण पडत आहेत. भाज्यांचे वाढलेले दर आणि दुधाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. तर बेस्टच्या दरवाढीमुळे प्रवासाचा खर्च वाढणार आहे.