VIDEO | अर्धा तास झाडावर चढाई, सापाकडून वटवाघळांची शिकार, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ

वडाच्या झाडावर असलेल्या वटवाघळांच्या पिलांची शिकार करण्यासाठी धामण सापाने थेट झाडावर चढाई केली.

VIDEO | अर्धा तास झाडावर चढाई, सापाकडून वटवाघळांची शिकार, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ
Follow us
| Updated on: Dec 09, 2020 | 4:53 PM

चंद्रपूर : सापाने वटवाघळांची केलेली शिकार कॅमेऱ्यात कैद झाली आहे (Snake Hunt Bat On Tree). चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्यातील य धाबा गावात हा प्रकार घटना घडली. वर्दळीच्या भागात असलेल्या वडाच्या झाडावर हे दृष्य पाहायला मिळालं. अर्धा तासाच्या सावध चढाईनंतर सापाला शिकार करण्यात यश आलं आहे(Snake Hunt Bat On Tree).

वडाच्या झाडावर असलेल्या वटवाघळांच्या पिलांची शिकार करण्यासाठी धामण सापाने थेट झाडावर चढाई केली. ही चढाई सावधपणे करताना त्याला अर्धा तास लागला. त्यानंतर मग घरट्यात असलेल्या वटवाघळांच्या पिलांची मोठ्या शिताफीने या सापाने शिकार केली. साधारणतः एक तास चाललेला हा शिकारीचा थरार गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील लोकांनी अनुभवला.

धामण जातीचा साप तसा तर बिनविषारी असतो. पडक्या घरात, गोदामात, लाकडांच्या राशीत हा साप हमखास आढळून येतो. धामण सापाचे आवडते खाद्य उंदीर आहे. मात्र, परिसरानुसार हा साप शिकारीत बदल करीत असतो. गोंडपिपरी तालुक्यातील धाबा गावातील शिवाजी चौकात भलेमोठे वडाचे झाड आहे. या झाडावर वटवाघळांनी डेरा टाकला. झाडातील एका पोकळीत वटवाघळांची पिल्ले होती. या पिलांवर धामण सापाची नजर गेली.

साधारणतः 20 ते 25 फूट उंचीवर असलेल्या वटवाघळांची शिकार करण्यासाठी सापाने झाडावर चढाई सुरु केली. अर्ध्या तासांनी तो वटवाघळांजवळ पोहचला आणि मोठ्या शिताफीने त्याने वटवाघळांची शिकार केली. वर्दळीच्या चौकातच हा थरार घडत असल्याने बघ्यांची एकच गर्दी उसळली. पण या गर्दीला जराही न घाबरता सापाने आपले सावज टिपले.

पाहा खास व्हिडीओ

Snake Hunt Bat On Tree

संबंधित बातम्या :

कुत्रे फिरवण्यासाठी तगडा पगार, वर्षाकाठी 29 लाखांची ऑफर, निवृत्तीनंतर पेन्शनही

राणीबागेतील प्राणीपाल नार्वेकरांच्या कामाची केंद्राकडून दखल, ‘प्राणिमित्र पुरस्‍कार’ देऊन सन्मान

नरभक्षक बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश, पाथर्डीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

बिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.