Video : 52 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी बस चालक आणि वाहकाचं अखेर निलंबन

| Updated on: Jul 13, 2021 | 9:04 PM

एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालत्या प्रकरणी आता एसटीचा चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Video : 52 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या एसटी बस चालक आणि वाहकाचं अखेर निलंबन
रायगडमध्ये पुराच्या पाण्यात एसटी बस
Follow us on

रायगड : मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातून एसटी बस घालणं चालक आणि वाहकाच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. रायगडमधील महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. अतिव्रुष्टीमुळे नागेश्वरी बंधांरा पाण्याखाली गेला आणि पाणी ओव्हरफ्लो होऊन खाडीपट्टयात जाणारा रस्ताही बुडाला. असं असताना एसटी चालकाने केलेले धाडस अगांशी येण्याचीही शक्यता होती. मात्र एसटी चालकाने सुखरुप रस्ता पार केल्याने अति घाई सकंटात नेयी, अशी परिस्थीती होती. दरम्यान, प्रवाशांचा जीव धोक्यात घालत्या प्रकरणी आता एसटीचा चालक आणि वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Suspension action taken against the driver and conductor of ST bus)

कोकणामध्ये 5 दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याने दिला आहे. 11 जुलै पासुन कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुरुड, रोहा, अलिबाग, श्रीवर्धनमध्ये अनेक ठिकाणी नदीनाले तुडूंब भरुन वाहु लागले आहेत. 11 जुलै रोजी रात्री अलिबाग-मुरुड मार्गावरील काशिद जवळ छोटा ब्रिज कोसळुन मुख्य मार्ग बंद होऊन मुरुड तालुक्याचा जवळचा सपंर्क तुटला होता. तर महाड परिसरात 11 आणि 12 जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.

रायगड जिल्हा परिवहन मंडळाची कारवाई

अशावेळी 12 जुलै रोजी पिंपरी-चिंचवड डेपोची MH-14 BT-4578 क्रमांकाच्या एसटी बस चालक विजयकुमार रामचंद्र जाधव आणि वाहक अशोक लक्ष्मण दराडे यांनी 52 प्रवाशी असलेली वेळास-रत्नागिरीकडे जाणारी एसटी महाड तालुक्यातील रेवतळे फाटा इथून वेळासकडे जाताना पाण्यातून घातली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे ही बाब समोर आलीय. त्यानंतर रायगड जिल्हा परिवहन मंडळाच्या विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी बसचे चालक आणि वाहक यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली.

इतर बातम्या :

नांदेडमध्ये ढगफुटी, कोकणतल्या नद्यांना पूर, जळगावात हतनूरमधून पाण्याचा विसर्ग, राज्यात पावसाची स्थिती कशी?

Video | मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर, चरायला गेलेल्या जाफराबादी म्हशी गेल्या वाहून, एकीचा मृत्यू

Suspension action taken against the driver and conductor of ST bus