Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकनाथ शिंदे विरोधात जाणार त्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. पुण्याच्या जागेवर शिंदे सेनेने आधी मंगेश चिवटेंना उमेदवारी देऊन नंतर माघार घेतली. आता याच निवडणुकीसाठी वेगळी भूमिका घेतली आहे.

Eknath Shinde : पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एकनाथ शिंदे विरोधात जाणार त्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde
| Updated on: Oct 14, 2026 | 9:21 AM

सागर सुरवसे, प्रतिनिधी : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन महायुतीला तडे गेले आहेत. पुण्याची शिक्षक मतदारसंघाची जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवी होती. यासाठी शिंदे सेनेकडून मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्मही देण्यात आला होता. पण नंतर मंगेश चिवटे यांनी माघार घेतली. आता पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिंदे सेना अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी काल शिवसेना नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत सचिन सानप यांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मंगेश चिवटे यांना तातडीने नंदनवन बंगल्याबर बोलवून घेतले होते. या बैठकीला उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, ओमराजे निंबाळकर, भावना ताई गवळी, विजय शिवतरे, शहाजी बापू पाटील, रवींद्र धनगेकर आणि इतर आमदार खासदार व महत्वाचे नेते उपस्थित होते.

पुण्यात शिवसेना भाजपऐवजी दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या बहिष्कारावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मंगेश चिवटेंना उमेदवारी न दिल्याने एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेने मतदानावर बहिष्कार घातला आहे. ‘महायुतीतील कोणत्याही पक्षाच्या संघटनेचा बहिष्कार राहणार नाही’ असं जयकुमार गोरे म्हणाले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बैठक घेतली.निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ आणि मंडल अध्यक्षांवर जबाबदारी देत पहिल्या टप्प्यात काय तयारी केली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.

Loading...

10 हजार शिक्षकांनी काही लिहून दिलं आहे का?

एकनाथ शिंदे शिक्षक सेनेच्या बहिष्काराच्या मुद्यावर जयकुमार गोरे म्हणाले की, “संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला आणि तो निर्णय कोणी जाहीर केला आहे? त्या 10 हजार शिक्षकांनी काही लिहून दिलं आहे का?. महायुती म्हणून आमचा समन्वय राहील आणि त्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल” “असा कोणताही बहिष्कार राहणार नाही. पुणे पदवीधर मतदार संघ मोठा आहे. 16 आणि 18 तारखेला आमचे उमेदवार सोलापूर जिल्ह्यात येतील” असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले. “उजनी धरणातील उजनी पर्यटन प्रस्ताव मंजूर झाला आहे. काम करण्यासंदर्भात जलसंधारण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानंतर उजनी पर्यटन कामाला सुरुवात होईल” असं जयकुमार गोरे यांनी सांगितलं.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us