मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम असल्यामुळे त्यांनी…, सूनेकडून विनायक राऊत कुटुंबाची पोलखोल

शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सूनेने कुटुंबाची पोलखोल केली आहे. एवढंच नाही तर, मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम असल्यामुळे त्यांनी सूनेचं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त केलं... यावर देखील गिरीजा राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे.

मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम असल्यामुळे त्यांनी..., सूनेकडून विनायक राऊत कुटुंबाची पोलखोल
Girija Raut
| Updated on: Jul 12, 2026 | 12:12 PM

Girija Raut : शिवसेना ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश राऊत खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत सून गिरीजा राऊत यांनी सासरे विनायक राऊत आणि पतीा गितेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. ‘मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यास असक्षम आहे हे, लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलं आहे…’ असं आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहे. एवढंच नाही अघोरी कृत्याच्या नावाखाली काय काय करण्यात आलं याचा देखील मोठा खुलासा करत गिरीजा यांनी राऊत कुटुंबाची पोलखोल केली आहे.

गिरीजा राऊत म्हणाल्या, ‘2017 मध्ये आमचं लग्न झालं. सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नव्हते. यावर दोन्ही कुटुंबाने बसून बोलणी करण्यचा निर्णय घेतला. गणपतीवरून आल्यावर त्यावर बोलणार होते. गणपतीवरून आल्यावर एक घाबरवणारी घटना घडली आणि त्याला अघोरी रूप दिलं. हे त्यांनी सप्टेंबर 2018 पासून 2022 पर्यंत त्यांनी ते सुरूच ठेवलं. मला हायपोथायराईड असूनही औषधे दिली. मला प्रचंड मानसिक त्रास दिला.’

अघोरी कृत्य

कशा प्रकारे अघोरी कृत्य करण्यात आलं? असा प्रश्न विचारतात गिरीजा राऊत म्हणाल्या, ‘अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होते. मासाचे तुकडे अंगावरून उतवरत होते. तांब्याची तार उतरवत होते. कणकेच्या बाहुल्या, माझ्या अंगावरील न धुतलेले वापरलेले कपडे, डोक्याचे केस घेऊन उतारे करत होते. हळद खायला द्यायचे. अगरबत्तीची उदी तीर्थ म्हणून पेलाभरून प्यायला द्यायचे. गोमूत्र द्यायचे. त्यांचा मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी प्लानिंग करून माझं आयुष्य बर्बाद केलं आहे… असा धक्कादायक खुलासा गिरीजा राऊत यांनी केला आहे.

नवरा मारहाण करायचा – गिरीजा राऊत

सासरी मिळत असलेल्या वागणुकीबद्दल गिरीजा राऊत म्हणाल्या, ‘मला मेंटल ट्रॉमा केला जात होता. नवरा मारहाण करायचा. दोन कोटी रुपये खर्च करून वडिलांनी निवडणूक लढवली. त्यांची इमेज खराब होऊ नये अशी धमकी नवरा सतत देत होता. सात वर्षात त्यांनी ट्रॉमा दिला आहे…’ असा खुलासा देखील गिरीजा राऊत नुकताच केला आहे.

 

Follow Us