कॅप्टन्सीवरुन हटवण्यापासून ते पुन्हा कॅप्टन्सी देण्यापर्यंत… रोहित शर्माच्या निवडीवर मालकीण नीता अंबानींची पहिली प्रतिक्रिया
मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. रोहित शर्मा पुन्हा संघाचं नेतृत्व करणार का, याबाबत नीता अंबानी यांच्या प्रतिक्रेकडे लक्ष वेधलं जात आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नेमकं काय संकेत मिळाले?

आज मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. ज्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रेम केलेलं. त्यांना आाता पुन्हा एकदा मुंबईचा राजा हा टीमचे नेतृत्व करताना दिसणार आहे. होय, हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा एकदा आता आयपीएल टीम मुंबईचा कॅप्टन बनलाय. आज अधिकृतपणे त्याच्या नावाची घोषणा फ्रँचायझीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे.
केवळ रोहितचे चाहतेच नाही तर टीम मुंबई इंडियन्सच्या मालकिण सर्वेसर्वा नीता अंबानीही प्रचंड आनंदी झाल्या आहेत. त्यांनी रोहितला पुन्हा एकदा कॅप्टन्सी दिल्यावरुन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या विसाव्या हंगामामध्ये मुंबईचा कर्णधार रोहित बनला असल्याने सगळ्या मुंबईच्या पलटनमध्ये नवी उर्जा संचारली आहे. रोहित हा आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधार अन् खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे या नव्या हंगामात आता रोहित कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या नीता अंबानी?
रोहित शर्मा हा जेव्हा अगदी युवा खेळाडू होता तेव्हा तो मुंबई संघाशी जोडला गेला. आम्ही 2011 साली सर्वात आधी रोहितसाठी बोली लावली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स परिवाराचा सदस्य आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये रोहितने क्रिकेटर, चॅम्पियन, लीडर आणि एक उत्तम शानदार कुटुंबाचा व्यक्ती म्हणून कायम सुधारणा केल्या. हे सर्व मला पाहताना आनंद वाटतोय, एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून घडताना त्याला पाहण हे माढ सौभाग्यच आहे, असं यावेळी नीता यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, रोहित शर्माला पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व तकरताना पाहणं हा आम्हा सर्वांसाठी खास क्षण आहे. त्याने गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला अनेक अविस्मरणिय विजय दिलेत. तो आमच्या संघासाठी किती महत्त्वाचा आहे, हे मला माहिती आहे. मला अपेक्षा आहे की, हा नवा अध्यायही आता त्याच्यासाठी त्याचवेळी आमच्या संघासाठी आणि मुंबईवर प्रेम करणाऱ्या असंख्या चाहत्यांसाठी अभिमानाचे आणखी मोठे क्षण घेऊन येणार आहे. रोहित तुला खूप शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी रोहितला नव्या प्रवासासाठी प्रोत्साहन दिलं आहे.
