अनिल देशमुख यांच्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा, चित्रा वाघ यांचं चॅलेंज

विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या क्लीप सार्वजनिक केल्या, आपल्या सूनेला भडकवण्यासाठी आणि माझ्या बदनामीसाठी चित्रा वाघ यांनी व्हिडीओ तयार करण्यास सांगितले, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. त्या क्लीप भर पत्रकार परिषदेत विद्या चव्हाणांनी लावल्या.

अनिल देशमुख यांच्या पेन ड्राईव्हची प्रतिक्षा, चित्रा वाघ यांचं चॅलेंज
| Updated on: Jul 30, 2024 | 9:14 PM

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर ऑडिओ क्लीप बॉम्ब टाकलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकरणात, नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. तसंच सूनेला कशा प्रकारे व्हिडीओ तयार करायचे, याचं षडयंत्र रचल्याचं सांगून सून, चित्रा वाघ आणि एका डॉक्टरांमधील संभाषणच चव्हाणांनी समोर आणलं. या क्लीपनंतर चित्रा वाघांनी, होय आपण विद्या चव्हाणांच्या सूनेला गाईड केलं. कारण विद्या चव्हाणांनी सूनेपासून लहान मुलीला तोडलं, असा आरोप केला.

ज्या क्लीपमधलं संभाषण विद्या चव्हाण यांनी पुढं आणलंय ते संभाषण चित्रा वाघ यांनी नाकारलेलं नाही. उलट चित्रा वाघ यांच्या सूनेला आपण मदतच केल्याचं त्या सांगत आहेत. त्या क्लीपच्या संभाषणात चित्रा वाघ शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव घेवून कसं बोलायचं हेही सांगत आहेत.

विद्या चव्हाणांची सून, चित्रा वाघ आणि संबंधित डॉक्टरचं जे संभाषण पुढं आलंय. त्याच देवेंद्र फडणवीसांशी झालेल्या फोन कॉलचाही समावेश आहे. चित्रा वाघ त्या डॉक्टरला देवेंद्र फोनवर आहेत, असं सांगत आहेत. विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची जी ऑडिओ क्लीप लावली. त्यावरुन चित्रा वाघांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर आरोप केलेत. असे कच्चे खेळाडू पाठवू नका. पुन्हा माझ्याविरोधात महिलांना उभं केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

विद्या चव्हाण यांच्या सूनेने शरद पवारांची आणि जयंत पाटील यांची ही भेट घेतली. पण कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही असा आरोप देखील चित्रा वाघ यांनी केला आहे.

अनिल देशमुखांनी फडणवीसांच्या विरोधात पेन ड्राईव्ह दाखवून, आपल्यावर ठाकरेंना अडकवण्यासाठी कसा दबाव टाकला हे जाहीर करणार असा इशारा दिला. त्यावरुन पेन ड्राईव्हमधले व्हिडीओ समोर आणण्याचं आव्हान चित्रा वाघ यांनी दिलं आहे. ते प्रकरण चित्रा वाघ यांचीच क्लीप सार्वजनिक करण्यापर्यंत आलं आहे.