Wardha Curfew | वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद

| Updated on: Feb 19, 2021 | 5:38 PM

वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Wardha Curfew order After Corona Cases Increase)  

Wardha Curfew | वर्ध्यात संचारबंदी लागू, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद
संचारबंदी
Follow us on

वर्धा : संपूर्ण राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने राज्यातील सर्वच पालिका खडबडून जाग्या झाल्या आहेत. वर्धा जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे वर्ध्यात वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच पेट्रोल पंप देखील बंद राहणार आहेत. शनिवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत वर्ध्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (Wardha Curfew order After Corona Cases Increase)

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. वर्धा जिल्ह्यात 36 तास संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. यानुसार शनिवार रात्री 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

या कालावधीत वर्ध्यातील वैद्यकीय सेवा वगळता दुकाने, मॉल्स, मार्केट बंद राहणार आहेत. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट, ट्रॅव्हल्स, खासगी, एसटी, ऑटोरिक्षा सेवा बंद राहील. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू राहील. दुध डेअरी विक्री सकाळी सहा ते दहा आणि सायंकाळी सहा ते दहा वाजतापर्यंत सुरु राहील. एमआयडीसीतील आस्थापना सुरु राहतील. पेट्रोल पंपदेखील बंद राहतील.  (Wardha Curfew order After Corona Cases Increase)

या सर्व नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी वर्ध्यात एकावेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी फक्त 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती. यानंतर आता वर्ध्यात थेट संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला 

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात काल 5 हजार 427 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज नवीन 2543 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1987804 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीत एकूण 40 हजार 858 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.5 टक्के इतके झाले आहे.(Wardha Curfew order After Corona Cases Increase)

संबंधित बातम्या : 

कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार, हॉटेल, लग्न समारंभांवर करडी नजर; ठाणे पालिका आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये!

अमरावती आणि यवतमाळमध्ये कोणताही परदेशी स्ट्रेन आढळला नाही, आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण