आर्वीतील अवैध गर्भपात प्रकरण : आरोपीच्या वकिलांनी मागितला वेळ; कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली

| Updated on: Feb 01, 2022 | 12:56 PM

जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश राजश्री विजय अदोणे यांच्यासमक्ष सुनावणी निश्चित होती. पण प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी आणखी वेळ मागितला. आरोपीच्या वकिलांची विनंती न्यायाधीशांनी मान्य केल्याने आता शनिवार पाच फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

आर्वीतील अवैध गर्भपात प्रकरण : आरोपीच्या वकिलांनी मागितला वेळ; कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

वर्धा : आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम व डॉ. नीरज कदम (Dr. Rekha Kadam and Dr. Neeraj Kadam) यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज सादर केला आहे. याच जामीन अर्जावर सोमवारी न्यायाधीश राजश्री विजय अदोणे यांच्यासमक्ष सुनावणी निश्चित होती. पण प्रत्यक्ष सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांनी आणखी वेळ मागितला. आरोपीच्या वकिलांची विनंती न्यायाधीशांनी मान्य केल्याने आता शनिवार पाच फेब्रुवारीला या प्रकरणी सुनावणी होणार आहे. अवैध गर्भपात प्रकरणी (In case of illegal abortion) डॉ. नीरज कदम व रेखा कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर रेखा यांच्या सासू डॉ. शैलेजा व सासरे डॉ. कुमारसिंग कदम यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने पंचेवीस जानेवारीला फेटाळला. शिवाय अवैध गर्भपातासाठी सहकार्य करणाऱ्या आर्वीच्या कदम हॉस्पिटलमधील परिचारिका संगीता संजय काळे व पूजा दयाराम दाहाट यांचा जामीन अर्ज एकवीस जानेवारीला जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष म्हणजे डॉ. रेखा व नीरज कदम यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दुसऱ्यांदा पुढे (The hearing proceeded a second time) ढकलण्यात आली आहे.

केंद्राचा परवाना न्यायालयाच्या निकालापर्यंत निलंबित

आर्वी येथील कदम रुग्णालयातील गर्भपात प्रकरणात आरोग्य विभागानेही कारवाईला सुरवात केली आहे. कदम रुग्णालय परिसरात सुरु असलेले गर्भपात केंद्र, नर्सिंग होम आणि सोनोग्राफी केंद्र न्यायालयाच्या निर्णयापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आर्वीचे वैद्यकीय अधीक्षक मोहन सुटे यांनी ही कारवाई केली आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातून उजेडात आलेल्या कदम रुग्णालयात पोलिसांना तपासदरम्यान बारा कवट्या आणि चौपन्न हाडं सापडली होती. या घटनेने सर्वांचीच झोप उडविली होती.

मशीनमधील डाटा बरेच काही सांगणार

याच प्रकरणाच्या अवैध तपासादरम्यान, आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयातील एक सोनोग्राफी मशीन सील केली होती. एक सोनोग्राफी मशीन आरोग्य विभागाने सील केली आहे. या मशीनमधील डाटा काढण्यासाठी पोलिसांनी न्यायलयाची परवानगी मागितली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर रेडिओलॉजिस्ट मार्फत या मशीनमधून डाटा काढण्यात येणार आहे. हा डाटा काढल्यावर यातून काय पुढे येत हे पाहण महत्वाचं आहे.

वनविभागाकडेही एक गुन्हा

दुसरीकडे बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी पीसीपीएनडीटी समितीने घटनेच्या 10 दिवसांनंतर म्हणजेच तब्बल दोनशे साठ तासांनंतर आर्वीच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण लवकरात लवकर हाती घेण्याची विनंती समितीने न्यायालयाला केली आहे. आर्वी कोर्टाने सुनावणीची आठ फेब्रुवारी तारीख निश्चित केली असल्याची विश्वसनीय माहिती आहे. सोबतच पोलिसांकडे याच प्रकरणात दोन गुन्हे तर वनविभागाकडे एक गुन्हा दाखल आहे. याचा तपास सुरू आहे.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू