वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तीन जण जात होते, भरधाव ट्रकने दुचाकी वाहनाला चिरडले

चारमंडळ येथे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. महामार्गावरील कानकाटी शिवारात मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिली.

वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी तीन जण जात होते, भरधाव ट्रकने दुचाकी वाहनाला चिरडले
| Edited By: | Updated on: Apr 13, 2023 | 9:23 AM

वर्धा : नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी तीन जण दुचाकीने निघाले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील कानकाटी येथील ही घटना आहे. आपण कार्यक्रमाला जाऊ. मस्त मजा करू. खाऊन पिऊन येऊ, असा विचार सुरू होता. कोणकोण नातेवाईक येणार. सर्वांच्या भेटी गोटी होतील. अशा विचारात असताना अचानक ट्रकने धडक दिली. त्यात होत्याचे नव्हते झाले. दुचाकीवर तीन जण बसले होते. त्यापैकी दोघांचा जागीच घात झाला.

आईच्या डोळ्यादेखत गेला मुलगा

धुमनखेडा येथील साहील राजेश आडे, पादोरी येथील मंथन परचाके हे दोन युवा दुचाकीवर होते. त्यांच्यासोबत साहीलची आई चंदा राजेश आडे या होत्या. बुधवारी सायंकाळी हे तिघेही वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जात होते. आईच्या डोळ्यासमोरचं मुलाचा अपघाती मृत्यू झाला. ती स्वतः गंभीर जखमी झाली.

महिलेवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार

चारमंडळ येथे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. महामार्गावरील कानकाटी शिवारात मागाहून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात साहील आणि मंथन हे दोघेही घटनास्थळी ठार झाले. चंदा आडे या गंभीर जखमी झाल्या. त्यांना समुद्रपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रथमोपचार करून सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ट्रकच्या धडकेत दोन ठार

कानकाटी शिवारात ट्रकची दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन युवक जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. नातेवाईकाकडे कार्यक्रमानिमित्त जात असताना अपघात झाला. ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला तर महिला जखमी झाली.

दोन्ही युवक या अपघातात ठार झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. साहील आणि मंथन यांचे वय १९ वर्षे होते. ते शिक्षण घेत असताना त्यांचा अपघाती मृ्त्यू झाला. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार त्यांना मिस करत आहे. घरचे लोकंही अतिशय दुःखी झाले आहेत. चांगल्या कार्यक्रमासाठी जात असताना ही वाईट बातमी हाती आली.