कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा, 4.4 अंश तापमानाची नोंद

| Updated on: Jan 25, 2024 | 9:14 AM

Rain and Weather update | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाचा इशारा, 4.4 अंश तापमानाची नोंद
Follow us on

पुणे, रत्नागिरी, दि.25 जानेवारी 2024 | राज्यात गेल्या काही चार-पाच दिवसांपासून वातावरण बदलले आहे. राज्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. राज्यातील अनेक शहरांचा पारा दहा अंशाच्या खाली आला आहे. यावेळी शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे. राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे. कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी

राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तापमानात देखील चढ उतार होत आहे. त्याचवेळी हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंताग्रस्त झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुढील 4ते 5 दिवसात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक भागांत थंडीची लाट

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्ट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. राज्यात जळगावात तापमान कमी होते. किमान तापमान 9 अंश तर कमाल 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिकमध्ये 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमान

नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या हिवाळ्यातील हा तापमानाचा नीच्चांक आहे. थंडीमुळे द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर परिणाम होणार आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले आहे.

धुळे शहराचा तापमान 4.6 अंश सेल्सिअस

धुळे शहराचा जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका जाणवत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान 4.6 अंश सेल्सिअसवर गेला आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यांमध्ये तापमानात सतत घट होत आहे.