११ दिवस पायी चालत घेतले या महाराजांचे दर्शन; इतक्या किलोमीटरची केली भाविकांनी पदयात्रा

| Updated on: Mar 30, 2023 | 12:20 PM

राम नवमीनिमित्त राज्यभरातील महत्त्वाच्या देवस्थानंमध्ये आज गर्दी पाहायला मिळत आहे. यातच तेलंगणामधील हजारो भाविक पालखीसोबत अकरा दिवस पायदळ चालत आले.

११ दिवस पायी चालत घेतले या महाराजांचे दर्शन; इतक्या किलोमीटरची केली भाविकांनी पदयात्रा
Follow us on

वाशिम : देशभरातील भाविक सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. रामनवनीनिमित्त देशभरातील धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी झाली आहे. राज्यात शिर्डी, शेगाव तसेच पोहरादेवी येथी भाविक मोठ्या प्रमाणात आले आहेत. पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी समजली जाते. पोहरादेवी येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. देशभरातील 12 कोटी बंजारा समाज बांधवांची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमीचा मोठा उत्साह आहे.

मंदिर फुलांनी सजवले

रामनवमी निमित्ताने श्री सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक पोहरादेवीत दाखल झालेत. गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतून लाखो भाविक आले. रामनवमी निमित्ताने सेवालाल महाराजांचे मंदिरही आकर्षक फुलांनी सजवले. शेकडो दिंड्या झाल्या पोहरादेवीत दाखल झाल्या.


तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास

राम नवमीनिमित्त राज्यभरातील महत्त्वाच्या देवस्थानंमध्ये आज गर्दी पाहायला मिळत आहे. यातच तेलंगणामधील हजारो भाविक पालखीसोबत अकरा दिवस पायदळ चालत आले. त्यांनी तीनशे किलोमीटरची पदयात्रा करत रामनवमीनिमित्त सेवालाल महाराजांच्या दर्शन घेतले.

हे सुद्धा वाचा

पोहरादेवीत भाविकांच्या रांगा

देशातील बंजारा समाज सेवालाल महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी पोहरादेवी येथे येतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा येथून भाविक येतात. तसेच महाराष्ट्र, मध्ये प्रदेशातील बंजारा समाजबांधव येथे येतात.पोहरादेवी येथे हजारो भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. सेवालाल महाराज, रामलाल महाराज, जगदंबा मातेचे मंदिर आहे. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

गर्दीमुळे ठाकरे यांचा दौरा रद्द

बंजारा समाजाची काशी म्हणून असल्या पोहरादेवी येथे 30 मार्च रोजी रामनवमीच्या निमित्त यात्रेत उद्धव ठाकरे येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी सुनील महाराज यांनी दिली होती. मात्र रामनवमीला यात्रेची गर्दी आहे. यात्रेच्या गर्दीचं स्वरूप लोकांमध्ये गैरसमज न व्हावे म्हणून उद्धव ठाकरे यांनी रामनवमीनिमित्त पोहरादेवी येथील दौरा हा रद्द केला. हा कार्यक्रम पुढे ढकला असल्याची माहिती पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी दिली आहे.