Washim : या गावात शाळा भरते, पण एका विद्यार्थ्य्यासाठी…

या शाळेत एका विद्यार्थ्यासाठी एक शिक्षक, विद्यार्थ्यासह शिक्षकाची सुध्दा परिसरात चर्चा

Washim : या गावात शाळा भरते, पण एका विद्यार्थ्य्यासाठी...
वाशिम
Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Jan 21, 2023 | 10:05 AM

वाशिम  : एका विद्यार्थ्यासाठी (one student) शाळेत एक शिक्षक असल्यामुळे वाशिम जिल्ह्यात (Washim) सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad School) एक विद्यार्थी असल्यामुळे शिक्षक सुध्दा एकचं आहे. वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर गावात ही शाळा आहे. मागच्या अनेक दिवसांपासून गावातील जिल्हा परिषदची शाळा अधिक चर्चेत आहे. गावातील लोकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवल्यामुळे गावातील शाळेत एकचं विद्यार्थी आहे. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्यासाठी ही शाळा सुरु ठेवावी लागली आहे.

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर येथील गावात गेल्या काही दशकापासून इंग्रजी शाळेकडे पालकांचा शिक्षण देण्यासाठी कल वाढतोय, त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा ओस पडायला लागल्या आहेत. मात्र घरची परिस्थिती बेताची अन् पालकांना इंग्रजी शाळा न परवडणारी असल्यामुळे एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची शाळा अविरत सुरु असून एकच शिक्षक विद्यार्थ्यांला शिक्षणाचे धडे देतांना पाहायला मिळत आहे.