Rashmi Thackeray Brother: राष्ट्रपती राजवट लागू करू असं वाटत असेल तर झोपेतून जागं व्हा, आम्ही लढू; राऊतांनी ललकारले

| Updated on: Mar 22, 2022 | 7:33 PM

ईडीच्या कारवाया करून दबाव आणू सरकार पडेल आणि राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटत असेल तर झोपेतून जागे व्हा. आम्ही लढू तुमचं राजकीय षडयंत्रं आम्ही लोकांसमोर आणू, असं ललकारतानाच अशा वातावरणात आम्ही न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.

Rashmi Thackeray Brother: राष्ट्रपती राजवट लागू करू असं वाटत असेल तर झोपेतून जागं व्हा, आम्ही लढू; राऊतांनी ललकारले
शिवसेना नेते संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: ईडीच्या कारवाया करून दबाव आणू सरकार पडेल आणि राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटत असेल तर झोपेतून जागे व्हा. आम्ही लढू तुमचं राजकीय षडयंत्रं आम्ही लोकांसमोर आणू, असं ललकारतानाच अशा वातावरणात आम्ही न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. अशा परिस्थितीत न्यायालयेही दबावाखाली आहेत. त्यामुळे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागू. महाराष्ट्रातील जनता ठाकरे परिवाराला ओळखते. कधी ना कधी भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी हा इशारा दिला आहे.

ईडीने 2004 आणि 2005चीही प्रकरणे काढली आहेत. तुम्ही 2017च्या प्रकरणाचं काय घेऊन बसला आहात. पीएमएलए कायदा झाला नव्हता तेव्हाचीही प्रकरणे काढली जात आहेत. अशा प्रकारे कुणाला त्रास देणं देशहितासाठी योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

नैतिकतेची व्याख्या बघावी लागेल

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरच ईडीने कारवाई केल्याने उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले असता, नैतिकतेची व्याख्या काय ते बघावं लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

महाराष्ट्राला बदनाम केलं जातंय

ईडीने आतापर्यंत अनेक कारवाया केल्या. 3 हजार लोकांपैकी फक्त 20 लोकांना कोर्टाने शिक्षा ठोठावली. बाकी केस अधांतरी आहेत. राजकीय सूडाच्या कारवाया अशाच असतात. खोटे साक्षीदार नेमले जातात. भ्रम तयार केला जातो. महाराजाच्या महाराष्ट्राला, ज्यांनी या देशाला राज्य घटना दिली, कायदा दिला त्या आंबेडकराचंया महाराष्ट्राला बदनाम करण्याची संधी भाजपच्या टाचेखाली असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणा सोडत नाहीत, अशी जळजळीत प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

तुम्ही देशाचे मालक बनला नाहीत

ही हुकूमशाहीची खतरनाक सुरुवात आहे. चार राज्यात जिंकलात म्हणून तुम्ही देशाचे मालक बनला नाही. आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर तयारी करा आम्ही तुरुंगात जाऊ. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे Shridhar Patanakar यांचा ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त

कोण आहेत श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय? मुख्यमंत्र्यांचे थेट नातलग?

ED Raids Sridhar Patankar LIVE Updates : ईडीची स्वारी मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याच्या दारी, पुन्ह रान पेटलं