Yogesh Kadam : ‘ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना…’ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मोठ वक्तव्य

Yogesh Kadam : नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचाराप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. याच मुद्यावरुन नागपूरच्या महाल भागात राडा झाला. दगडफेक, वाहनांना आगी लावण्याचे प्रकार घडले.

Yogesh Kadam : ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना... गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मोठ वक्तव्य
Yogesh Kadam
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 11:03 AM

“नागपुरात ज्यांनी पोलिसांवर हात उचलला, त्यांना पोलिसांचा धाक काय असतो, हे 100 टक्के दाखवणार. कायदा हातात घेऊन अशी कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. पोलिसांच मनोबल कमी होता कामा नये. ही आमची जबाबदारी आहे. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत” असं गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले. नागपूरात जे काही घडलं, त्यावर सरकारची भूमिका काय? पोलिसांच मनोबल कसं वाढवणार? या प्रश्नावर योगेश कदम यांनी हे उत्तर दिलं.

नागपूर घटनेचे व्हिडिओ व्हायरल होतायत, त्यावर काय म्हणालं? “एकच विनंती आहे, असे व्हिडिओ व्हायरल करुन काहीही साध्य होणार नाही. आपणच आपल्या महाराष्ट्राची बदनामी देशात करतोय. माझी विनंती आहे की, हे थांबलं पाहिजे” “फेसबुक, इन्स्टाग्राम कंट्रोल करता येतं, Whatsapp वर व्हायरल होणारे व्हिडिओ कंट्रोल करणं सायबरला देखील कठीण होतं” असं योगेश कदम म्हणाले.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

“पोलिसांवर ज्यांनी हात उचलला, त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. सरकार त्यांना सोडणार नाही. महाराष्ट्र हा पुरोगामी रहावा. कुठल्याही जाती-धर्मात तेढ निर्माण होऊ नये, हा सरकारचा प्रयत्न आहे” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

व्हिडिओ व्हायरल झालेत

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. नागपूरच्या महाल भागात रस्त्यावर कशा प्रकारे हिंसाचार सुरु होता, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.

महिला पोलिसाचा विनयभंग

नागपूरमध्ये हा राडा सुरु असताना अजून एक धक्कादायक घटना घडली. नागपूरमध्ये जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.