Weather Update : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम? विदर्भासाठी वर्तवलेला अंदाज काळजी वाढवणारा

| Updated on: May 08, 2022 | 8:20 AM

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आकार घेतंय. रविवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Weather Update : बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम? विदर्भासाठी वर्तवलेला अंदाज काळजी वाढवणारा
पारा वाढणार की घसरणार?
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : मॉन्सूनची (Monsoon) यंदा लवकर दाखल होणार, असा दिलासादायक अंदाज हवामान खात्यानं (IMD) वर्तवला होता खरा. पण त्याआधी वाढलेल्या तापमानानं घामाघूम झालेल्या नागरिकांना तूर्तासतरी दिलासा मिळण्याची कोणतीही शक्यता नाहीच. कारण राज्यात पुन्हा एकदा उकाडा वाढणार आहे. हवामान विभागानं तसा अंदाज वर्तवला असून विदर्भात 11 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या वादळाचा (Cyclone Update News) कोणताही थेट परिणाम महाराष्ट्रावर जाणवण्याची शक्यात नाही. मात्र तापमानात अधिक वाढ होईल, असा अंदात वर्तवला जातोय. विदर्भापाठोपाठच पुण्यातही तापमान जवळपास चाळीशीपर्यंत टेकलंय. शनिवारी पुण्यात 39 .6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय. तर विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे.

वादळाचा परिणान शून्य…

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आकार घेतंय. रविवारी संध्याकाळपर्यंत हे वादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला हे वादळ धडकण्याची दाट शक्यता आहे.

या वादळादरम्यान, वाऱ्याचा वेग हा ताशी 75 किलोमीटर राहिल, असंही सांगितलं जातंय. मच्छीमारांनी बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय समुद्रकिनारी जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आलाय, समुद्र किनारी भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यासोबत आपत्काली यंत्रणांही तैनात करण्यात आल्या आहेत.

कोण कोणत्या राज्यात उष्णतेची लाट?

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यताय. तर 10 मे पासून दिल्लीतल पारा आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशसह बिहार, झारखंड या राज्यामध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

पावसाची शक्यता कुठे?

दरम्यान चक्रीवादळामुळे अंदमान निकोबार इथं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. शिवाय पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकातही पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

पाहा महत्त्वाची बातमी :