Weather update : आयएमडीचा पुन्हा हायअलर्ट; दिला धोक्याचा इशारा, हवामानाबाबत मोठी अपडेट

वातावरणात सतत बदल होत आहे. अचानक थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तपमानात अचानक वाढ होते. आता हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Weather update : आयएमडीचा पुन्हा हायअलर्ट; दिला धोक्याचा इशारा, हवामानाबाबत मोठी अपडेट
| Updated on: Jan 19, 2025 | 9:57 PM

वातावरणात सतत बदल होत आहे. अचानक थंडीचा कडाका वाढतो तर काही वेळेला ढगाळ वातावरणामुळे तपमानात अचानक वाढ होते. अशा वातावरणामुळे सध्या आजारांचं प्रमाण देखील वाढलं आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार येत्या 24 जानेवारीपर्यंत देशातील काही भागांमध्ये बर्फवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच थंडीच्या लाटेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात थंडीचा कडाका वाढणार आहे. तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 36 तासांमध्ये जम्मू काश्मीरच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

थंडींचा कडाका वाढणार

हवामान विभागानुसार पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस जम्मू काश्मीर आणि परिसरातच होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे इतर राज्यात मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. थंडी वाढणार असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये, महाराष्ट्रात हवामान कोरडं राहणार आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मात्र राज्यातील काही भागांमध्ये तापमानात आणखी घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.वाढणारी थंडी ही रब्बी पिकांना पोषक असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

रब्बी पिकांसाठी पोषक वातावरण  

दरम्यान जर राज्यात थंडीचा कडाका वाढला तर वाढणारी थंडी ही रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असणार आहे. पाऊस झाल्यास याचा मोठा फटका हा या पिकांना बसला असता, मात्र थंडीत वाढ होणार असल्यानं ही बातमी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. थंडीचा कडाका वाढल्यास रब्बी हंगामातील पिकांची वाढ अधिक जोमाने होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये.