AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घ्या.. आता होळीत पाऊस! राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात, शेतकरी संकटात, हवामानाचा अंदाज काय?

अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घ्या.. आता होळीत पाऊस! राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात, शेतकरी संकटात, हवामानाचा अंदाज काय?
रात्री गारपीटीसह पाऊस झाला. Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 06, 2023 | 9:52 AM
Share

मुंबई : राज्यात होळी (Holi) आणि धुळवडीचा उत्साह असतानाच अवकाळी पावसाने नागरिकांच्या आनंदावर विरजण टाकल्याचे चित्र आहे. राज्यात काल संध्याकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी रविवारी संध्याकाळीच पावसाला सुरुवात झाली. विदर्भात नंदूरबार, बुलढाणा आदी ठिकाणी कालच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर आज नाशिक, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच हलक्या सरी कोसळू लागल्यात. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाची कुठे कुठे हजेरी?

  • आज पहाटे 4 वाजेच्या दरम्यान लासलगावसह परिसरात विजांचा कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर आठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. या अवकाळी पावसाने काढणीला आलेले कांदा, गहू, हरभरा, द्राक्ष यासह शेती पिकांची नुकसान होणार असल्याने बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्याने गोण्यामध्ये ठेवलेला कांदा या पावसाने ओला झाल्याने नुकसान झाले आहे.
  •  बुलढाण्यात रविवारी जोरदार अवकाळी पाऊस पडला. जवळपास अर्धा तास हा पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या रब्बी पिकाला धोका निर्माण झाला आहे.
  •  नाशिकच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मालेगाव, सटाणा भागात हलक्या सरी तर कळवणच्या पाश्चिम पट्टयात अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. आंबा, गहू, हरबरा, मसूर वाटाणा सह कांदा उत्पादकांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात.
  •  धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यांमध्ये वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला असून, सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
  •  अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे…

8 मार्चपर्यंत पाऊस

अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 5 ते 8 मार्च दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार, बुलढाणा, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण दिसून आले. तर अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. उद्या म्हणजेच ८ मार्चपर्यंत अशी स्थिती राहिल. त्यानंतर ढगाळ वातावरणी हळू हळू कमी होऊन पुन्हा एकदा ऊन चटकू लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल